केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री पदासाठी महाराष्ट्रातून आणि देशातून या खासदारांना फोन महाराष्ट्रातील चार ते पाच खासदारांना फोन

लोकसभा निवडणूकीत इंडिया आघाडीला २७२ हा जादूई आकडा गाठता आला नाही. भाजपालाही या ही वेळी ४०० पारचा नारा देऊन साधा २५० चाही आकडा गाठता आला नाही. मात्र एनडीए आघाडीला २९० जागा मिळाल्याने भाजपाला केंद्रात सत्ता स्थापन करणे सहज शक्य झाले. आज रविवारी रात्री ७.१५ वाजता भाजपाचे नेते नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान म्हणून शपथविधी राष्ट्रपती भवनात पार पडणार आहे. नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री म्हणून जवळपास ६८ जणांचा शपथविधी होणार आहे. या पार्श्वभूमीवर ४३ जणांची नावे मराठी ई-बातम्याच्या हाती आली आहेत.

नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या टर्मच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, एकनाथ खडसे यांच्या स्नुषा तथा रावेरच्या खासदार रक्षा खडसे, पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ, आरपीआयचे राज्यसभेतील खासदार रामदास आठवले, मुंबईतून पियुष गोयल, यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे प्रतापराव जाधव यांना मंत्रिपदासाठी दिल्लीतून फोन आले आहेत.

त्याचबरोबर माजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राजनाथ सिंग, मनसुख मांडवीय, अश्विनी वैष्णव, माजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन, जितेंद्र सिंग, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान, माजी नगरविकास मंत्री हरदीपसिंग पुरी, जनता दल सेक्युलरचे एच डी कुमार स्वामी, जनता दलाचे चिराग पास्वान,किरेन रिजूजी, ज्योर्तिदित्य सिंधिया, गिरीराज सिंग, जयंत चौधरी, तामीळनाडूचे भाजपा नेते अन्नामलाई, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, सुरेश गोपी, हिंदूस्तान आवामी लीगचे प्रमुख जीतन राम मांझी, रामनाथ ठाकूर, जी कृष्णन रेड्डी, बंडी संजय, अर्जून राम मेघवाल, प्रल्हाद जोशी, एजेएसयु खासदार चंद्रशेखर चौधरी, डॉ चंद्रशेखर पेम्मसानी, राम मोहन नायडू किंजरापू, रावनीत सिंग बिट्टू, जतीन प्रसाद, पंकज चौधरी, बीएल वर्मा, लालन सिंग, सर्बानंद सोनोवाल, अनुप्रिया पटेल, अन्नपूर्न्ना देवी, शोभा कारंदालजे, कामलजीत शेहरावत, राव इंद्रजीत सिंग, हर्ष मल्होत्रा, एस जयशंकर आदींचे नाव केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

About Editor

Check Also

अनिल देशमुख यांची टीका, परमबीर सिंगाच्या “पापाचा घडा” भरला लीलावती रूग्णालय़ाने अपमानास्पदरित्या बदतर्फ केल्याने त्यांचे चारित्र्य जनतेसमोर

ज्या परमबीर सिंग याने मी गृहमंत्री असतांना माझ्यावर खोटे आरोप करून मला बदनाम करण्याचे षडयंत्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *