रिपाईचा डेमोक्रेटीक टीएम कांबळे ग्रुप लढणार विधानसभेच्या १० जागा आरपीआय डेमोक्रेटीकचे कनिष्क कांबळे यांची माहिती

नुकत्याच जाहीर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी रिपाई अर्थात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटीक) पक्षाच्या वतीने २८८ विधानसभा मतदारसंघापैकी मुंबई, विदर्भासह मराठवाडयातील दहा जागा लढवणार असल्याची घोषणा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा नंदाताई टी. कांबळे यांच्या आदेशानुसार पक्षाच्या युवक आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष कनिष्क टी. कांबळे यांनी जाहिर केले आहे.

पक्षाची मुंबई, विदर्भ व मराठवाडयात मोठी ताकद असून मुंबईतील १७८- धारावी, विधानसभा मतदारसंघ विदर्भातील २४ सिंदखेड राजा, ५१ उमरेड, तर मराठवाडयातील १०८ – औरंगाबाद पश्चिम, १०९ – औरंगाबाद पूर्व, १०२- बदनापूर, ९० देगलूर, ९१ – मुखेड, २३४ – लातूर ग्रामीण, २३७ – उदगीर या विधानसभा मतदारसंघात पक्षाच्यावतीने स्वबळावर निवडणूक लढविण्यात येणार आहे. या संबधी लवकरच उमेदवारांची यादी पक्षाच्या प्रदेश कमिटीच्यावतीने जाहीर करण्यात येईल अशी माहिती कांबळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.

About Editor

Check Also

आकाश फुंडकर यांची माहिती, स्थानिक माथाडी भूमिपुत्रांना रोजगारात प्राधान्य द्या भारत पेट्रोलियम कार्पोरेशन आस्थापनेत माथाडी कामगारांना काम

राज्यात कुठल्याही आस्थापनेत माथाडी कामगारांची आवश्यकता असल्यास त्या ठिकाणी स्थानिक माथाडी भूमिपुत्र असलेल्या कामगारांना रोजगारात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *