महायुतीच्या या ३३ आमदारांनी कॅबिनेट मंत्री तर ६ आमदारांनी घेतली राज्यमंत्री पदाची शपथ भाजपा आणि शिवसेनेकडून नव्या चेहऱ्यांना संधी

हिवाळी अधिवेशन आणि नव्या सरकारच्या सत्ता स्थापनेनंतर आज राज्य मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार पार पडला. आज रविवारी संध्याकांळी ४ वाजता राज्यपालांच्या उपस्थितीत हा शपथविधी पार पडला. यावेळी तिन्ही पक्षाचे मिळून ३३ आमदारांना कॅबिनेट मंत्री पदाची शपथ दिली. तर ६ राज्यमंत्री पदाचा शपथ देण्यात आली.

भाजपा आणि शिंदे गटाच्या शिवसेनेकडून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. भाजपाकडून जवळपास ९ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. तर भाजपाकडूनही अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. मात्र अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून जुन्याच चेहऱ्यांना संधी देण्यात आली. भाजपाकडून १९ आमदारांना शपथ दिली.

भाजपाकडून विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, गिरिष महाजन, अशोक उईके, आकाश फुंडकर, पंकजा मुंडे, जय कुमार रावल, राधाकृष्ण विखे पाटील, मंगल प्रभात लोढ़ा, शिवेंद्र राजे भोसले, नितेश राणे, गणेश नाईक, आशिष शेलार, संजय सावकारे, जयकुमार गोरे, अतुल सावे यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ देण्यात आली.

तसेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून प्रताप सरनाईक, शंभुराज देसाई, उदय सामंत, गुलाबराव पाटील, संजय सिरसाठ, भरत गोगावले, प्रकाश आबीटकर, संजय राठोड, दादा भुसे, मोहन पाटील यांना कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली.

तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून कॅबिनेट मंत्री म्हणून नरहरी झिरवाळ, हसन मुश्रीफ, संजय बन्सोड, दत्ता भरणे, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, मकरंद पाटील, बाबासाहेब पाटील, माणिकराव कोकाटे आदीना कॅबिनेट मंत्री मंत्री पदाची शपथ दिली.

त्यानंतर राज्यपालांच्या मान्यतेने राज्यमंत्री पदी भाजपाच्या माधुरी मिसाळ, आशिष देशमुख, मेघना बोर्डीकर, पंकज भोयार यांना संधी देण्यात आली आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून इंद्रनील नाईक आणि शिंदे शिवसेनेचे आशिष जयस्वाल, योगेश कदम यांना राज्यमंत्री म्हणून शपथ देण्यात आली.

About Editor

Check Also

आशिष शेलार यांची माहिती, मुंबईत मराठीसाठी लवकरच स्वतंत्र चित्रनाट्यगृह उभारणार १६४ मराठी चित्रपटांना २४ कोटी १० लाख रुपयांचे अर्थसहाय्य

दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य योजनेच्या अंतर्गत ऑक्टोबर २०२५ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत परीक्षण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *