आजार कितीही गंभीर आणि मोठा असला तरी केवळ पैसे नाही म्हणून गरिबांचे उपचार थांबू नये, यासाठी राज्य शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून आवश्यक निधी उपलब्ध केला आहे. येथे आयोजित महाआरोग्य शिबिर हे गरीब रुग्णांसाठी एक वरदान असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत …
Read More »देशातील सर्वात मोठे ॲग्रीकल्चरल कन्व्हेंशन सेंटर नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली पाहणी
अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असे देशातील सर्वात मोठे इंटरनॅशनल ॲग्रीकल्चरल कन्व्हेंशन अँड एक्झिबिशन सेंटर नागपुरातील दाभा परिसरात उभारले जात असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या कामाची पाहणी करून कामाच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. कृषी प्रदर्शनाशिवाय अन्य प्रदर्शने, परिषदा याकरिता कन्व्हेंशन व्हेन्यू म्हणून हे सेंटर जगभर ख्यात होईल आणि नागपूर शहराला …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, देशातील पहिल्या कचरामुक्त शहराची संकल्पना साकार खासगी गुंतवणुकीतून पहिला प्रकल्प, ·तीनशे कोटी रुपयांची गुंतवणूक १ हजार २०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया ; २८ टन गॅसची निर्मिती
देशातील पहिला एकिकृत शहर घनकचरा प्रक्रिया प्रकल्प भांडेवाडी येथे खासगी गुंतवणुकीतून साकारत असून या प्रकल्पामुळे कचरामुक्त शहराची संकल्पना प्रत्यक्षात येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे १ हजार २०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया होऊन २८ टन प्रतिदिन गॅसची निर्मिती होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. भांडेवाडी परिसरात केवा सुस …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, प्रादेशिक मानसिक आरोग्य रुग्णालयांचे अध्यापन संस्थांमध्ये रूपांतर येरवडा, ठाणे, रत्नागिरी, नागपूर येथील मानसिक रूग्णालयांचे अध्यापन संस्थांमध्ये रूपांतर
महाराष्ट्रातील येरवडा, ठाणे, रत्नागिरी आणि नागपूर येथील प्रादेशिक मानसिक आरोग्य रुग्णालयांचे अध्यापन संस्थांमध्ये रूपांतर करणे हा केवळ आरोग्य व्यवस्थेचा विस्तार नसून, गुणवत्तापूर्ण उपचार, संशोधन आणि प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मितीच्या दिशेने टाकलेला दूरदर्शी आणि मानवकेंद्री पाऊल आहे. यामुळे समाजातील वंचित घटकांपर्यंत अधिक सक्षम, सुलभ आणि आधुनिक मानसिक आरोग्य सेवा पोहोचविण्याचा आमचा संकल्प …
Read More »हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, एपस्टिन फाईलमध्ये पंतप्रधानांचे नाव रा. स्व. संघाने नरेंद्र मोदींचा राजीनामा घ्यावा नरेंद्र मोदी का घाबरतात? सरसंघचालकांनी १५ दिवसात नरेंद्र मोदींना जाब विचारावा: अॅड. प्रकाश आंबेडकर
माणुसकीला काळीमा फासणाऱ्या विकृत एपस्टिन फाईल मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव आले आहे, हे अत्यंत गंभीर व लाजीरवाणे आहे. एपस्टिन फाईलमध्ये जगभरात ज्यांची नावे आली त्यांनी राजीनामे दिले आहेत तर काहींना अटकही करण्यात आलेली आहे. पण भारतात मात्र अद्याप काहीच कारवाई झालेली नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे पंतप्रधान झालो, असे मोदी सांगत …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, महालक्ष्मी सरस महिलांसाठी बाजारपेठेचा मोठा ब्रँड महालक्ष्मी सरस मध्ये १० कोटी रुपयाची विक्री, राज्यातील ३६ जिल्ह्यात उमेद मॉल
महालक्ष्मी सरस प्रदर्शन हे केवळ विक्रीचे ठिकाण नसून महिला बचत गटांसाठी प्रभावी बाजारपेठ म्हणून कार्य करत आहे. राज्यातील ३६ जिल्ह्यात उमेद मॉल उभारण्यात येत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. या प्रदर्शनाला नागरिकांचा वाढता प्रतिसाद मिळत असून महालक्ष्मी सरस हा प्रदर्शनाचा ब्रँड अधिक मजबूत होत आहे. राज्यात शंभर कोटी …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नागपूरच्या राष्ट्राभिमानाचे प्रतीक ठरेल भव्य राष्ट्रध्वज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कस्तुरचंद पार्कवर भव्य राष्ट्रध्वजाचे लोकार्पण
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणांची आहुती दिली याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. याची सदैव जाण ठेवून नागपुरात उभारण्यात आलेला हा भव्य राष्ट्रध्वज येथील जनतेच्या राष्ट्राभिमानाचे प्रतीक ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला. येथील ऐतिहासिक कस्तुरचंद पार्कवर नागपूर महानगरपालिका आणि लोकमत वृत्तपत्र समूह …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची अपेक्षा, उद्योगाचे मॅग्नेट म्हणून नागपूरच्या विकासात एक्सएसआयओने भूमिका महाराष्ट्रातील पहिल्या एक्सएसआयओ बुद्धीमत्ता एकीकृत प्रगत औद्योगिक व निर्मिती पार्कचे भूमिपूजन
राज्य शासनाच्या उद्योग पूरक धोरणामुळे निर्मिती क्षेत्र सकारात्मक दिशेने वळण घेत आहे. उद्योगाला चालना देत विदर्भाच्या विकासासाठी नागपूरला उद्योगाचे मॅग्नेट बनविण्याच्या दिशेने पाऊल टाकले असून त्यात एक्सएसआयओ कंपनीने महत्वाची भूमिका वठवावी असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. नागपूर-अमरावती महामार्गावर स्थित लिंगा परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते महाराष्ट्रातील …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, विदर्भाच्या सर्वांगीण विकासावर भर केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘खासदार औद्योगिक महोत्सव- ॲडव्हान्टेज विदर्भ’चे थाटात उद्घाटन
गडचिरोली येथे जगातील सर्वात मोठे ग्रीन स्टिल हब, नागपुरात सोलर मॉडयुल आणि अमरावतीमध्ये आशिया खंडातील सर्वात मोठे वैमानिक प्रशिक्षण केंद्र उभारण्याच्या दिशेने महत्त्वाची पावले पडली आहेत. निर्मिती आणि सेवा क्षेत्रात विदर्भाची घोडदौड सुरु आहे. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीसोबत झालेल्या सामंजस्य करारातून नागपूरमध्ये ऑटोमोबाईल उद्योगाचे पदार्पण झाले आहे, या सर्व प्रयत्नांतून येत्या ५ …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही, राज्याचा विकास थांबणार नाही महाराष्ट्राच्या अमृत महोत्सवाकडे वाटचाल करताना रचनात्मक कार्यासाठी एकत्र येऊया
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आजही देशातील सर्वाधिक सक्षम आणि स्थिर असून, सर्व आर्थिक निकषांवर राज्य पात्र ठरत आहे. कर्ज, राजकोषीय तूट, गुंतवणूक, रोजगारनिर्मिती, सिंचन, वीज, दळणवळण आणि कायदा-सुव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रात राज्याने भरीव काम केले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना सांगितले. राज्याची अमृत महोत्सवाकडे वाटचाल सुरू …
Read More »
Marathi e-Batmya