Tag Archives: महायुती

सुनिल तटकरे यांचा टोला, कोकणात ठाकरे सेनेचं अस्तित्व काय, दुर्बिन घेऊन पहा राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंचा विनायक राऊतांना टोला

राष्ट्रवादीचे काँग्रेस (अप) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदर सुनील तटकरे यांनी ठाकरे शिवसेनेवर बाळा माने प्रकरणावरून जोरदार हल्लाबोल केला. ठाकरे सेना कोकणात दोन अंकी संख्या गाठण्यात अपयशी ठरली आहे. त्या ठिकाणी आता उद्धव सेनेचे काहीच प्राबल्य नाही. त्यामुळे खासदार विनायक राऊतांनी अगोदर त्याचे आत्मपरीक्षण करावे आणि मग पैसे वाटल्याचा आरोप करावा असा …

Read More »

१७ पैकी ६ ठिकाणी बंडखोरांचा थंडोबा करण्यात महायुतीला यश १२ जागांवर महायुती आणि महाविकास आघाडीत थेट लढत

राज्यातील १७ स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील विधान परिषदेच्या निवडणूकीत महायुतीच्या उमेदवारांचे बंड शमवण्यात कुठे काही नेत्यांना यश आलं, तर कुठे ऐनवेळी उमेदवारांनी माघार घेतल्याने राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलून गेली आहेत. या सर्व घडामोडींनंतर १७ पैकी ५ जागांवर निकाल आधीच स्पष्ट झाला असून उर्वरित १२ जागांवर आता महायुती आणि महाविकास …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, ८० लाख लाडक्या बहिणी अपात्र- महायुती सरकारचा निर्णय म्हणजे ‘गरज सरो आणि वैद्य मरो’ सत्तेतील भावांकडून लाडक्या बहिणींचा विश्वासघात, मते घेताना निकष आठवले नाहीत का?

भारतीय जनता पक्ष महायुतीने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहिण योजनेतून महिना १५०० रुपये देऊन विधानसभा निवडणुकीत महिलांची मते घेतली. आता सत्तेत आल्यानंतर या सरकारला निकष, अटी, शर्थी दिसू लागल्या आहेत. सरकारने निकष लागू करत ८० लाख महिलांना अपात्र ठरवण्याचा क्रूर निर्णय घेतला आहे. मते हवी होती त्यावेळी कोणतेही निकष न पाहता योजना जाहीर …

Read More »

महाविकास आघाडीच्या काँग्रेसकडून आणि महायुतीतून भाजपा-शिवसेनेने यांना दिली उमेदवारी विधान परिषद निवडणूकीसाठी दिली उमेदवारी

राज्य विधिमंडळाच्या रिक्त झालेल्या १७ जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी आपापले उमेदवार जाहिर केले. या निवडणूकीसाठी   स्थानिक स्वराज्य संस्थेंत निवडून गेलेल्या सदस्यांकडून मतदान करण्यात येणार आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या मतदारांना आता भलताच भाव आला आहे. त्यातच राज्यातील अनेक भागातील जिल्हा परिषदा आणि महानगरपालिकांवर भाजपा, काँग्रेस, शिवसेनाओएफसी, महाराष्ट्रवादी …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची आरोप, सत्तापिपासू भाजपा महायुतीकडून घोडेबाजार, सत्ता व पैशांचा प्रचंड गैरवापर विधान परिषदेच्या १७ पैकी १५ जागांवर मविआचे एकमत, काँग्रेस ८, शिवसेना ४ तर एनसीपी ३ जागांवर लढणार

राज्यातील १७ जागांसाठी होत असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे १७ पैकी १५ जागांवर एकमत झाले असून दोन जागांवरही लवकरच निर्णय होईल. काँग्रेस पक्ष चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव-लातूर-बीड या जागा लढवणार आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्ष पुणे, ठाणे व सांगली-सातारा या ३ जागा आणि शिवसेना (उबाठा) रायगड, …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, दिल्लीत गेलेल्या महाराष्ट्राच्या अर्धा डझन मंत्र्यांच्या हाती वाटाण्याच्या अक्षता कांद्याला १५०० रुपये नाही तर ३००० रुपयेच भाव द्या, बकरी ईदच्या निमित्ताने दंगली भडकवण्याचे भाजपाचे षडयंत्र, भाजपाच्या भूमिकेमुळे पशुपालन करणाऱ्या लाखो शेतकऱ्यांचे नुकसान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भरतेचे गाजर दाखवून अर्थव्यवस्थेकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्यानेच इंधन संकट ओढवले आहे. कोणतेही ठोस धोरण नसल्याने पेट्रोल, डिझेल, सीएनजी, एलपीजी गॅसची मोठ्या प्रमाणात भाववाढ करावी लागत आहे. इंधन कमतरता होणार हे दिसत असतानाही नरेंद्र मोदी पाच राज्याच्या निवडणूक प्रचारात व्यस्त होते, त्याची मोठी किंमत देशातील जनतेला मोजावी …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, भाजपा महायुती सरकारकडून ‘डुबता महाराष्ट्र’ करण्याचे पाप ड्रग्जचा काळाधंदा, खरात प्रकरण, नाशिक व अमरावतीतील महिलांच्या लैंगिक शोषणाच्या घटना हे गृहविभागाचे अपयश

महाराष्ट्रातील तरुणपिढीला बरबाद करणारे ड्रग्जचे विष आता मुंबई-पुणे सारख्या मोठ्या शहरातच नाही तर तालुक्यापर्यंत पोहोचलेले आहे. गुजरातच्या कांडला बंदरातून महाराष्ट्रापर्यंतच्या ड्रग्ज कॉरिडॉरमधून हे विष आपल्या राज्यात येत आहे. राजकीय आशिर्वादामुळेच ‘उडता पंजाब’ प्रमाणे ‘डुबता महाराष्ट्र’ बनवण्याचे पाप महायुतीने केले आहे. महाराष्ट्राच्या तरुणाईला बरबाद करणाऱ्या महायुती सरकारला जनता कदापी माफ करणार …

Read More »

धार्मिक स्वातंत्र्य विधेयकावरून वादळी चर्चा, सभागृहाचे कामकाज तहकूब जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावरून सत्ताधाऱ्यांचा गोंधळ

कुठल्या पद्धतीने धर्मांतर होतं तर ज्याच्यामध्ये अमिष असेल, जबरदस्ती असेल, त्या ठिकाणी फसवणूक असेल, बळजबरी असेल, लबाडी असेल किंवा अल्पवयीन अशा पद्धतीचं धर्मांतरण असेल. गैरवाजवी प्रभाव असेल अशा धर्मांतरणाला बेकायदेशीर धर्मांतरण ठरवण्यात आलेल आहे. या पद्धतीनं केलेलं कुठलंही धर्मांतरण हेच फक्त या ठिकाणी बेकायदा धर्मांतरण होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »

एकनाथ शिंदे यांचे विरोधकांना आवाहन, ‘सभागृहात या, पायऱ्यांवर आंदोलन नको’ स्थगिती नव्हे तर राज्याला प्रगतीकडे नेणारे सरकार

साडेतीन वर्षात राज्य सरकारने केलेल्या कामांचा आढावा घेत राज्यातील महायुती सरकार हे स्थगिती सरकार नसून प्रगती सरकार असल्याचे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विरोधकांच्या आरोपांचा समाचार घेतला. यावेळी बोलताना, दावोस मध्ये झालेले ३० लाख कोटींचे औद्योगिक करार त्यातून ४० ते ५० …

Read More »

रविंद्र चव्हाण म्हणाले, महायुतीच्या विकासाच्या राजकारणाला मतदारांचा स्पष्ट कौल जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालानंतर केले प्रतिपादन

१२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समिती निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी राज्यभरात क्रमांक एकचा पक्ष ठरला असून, या निकालांमधून भाजपा – महायुतीच्या विकासाच्या राजकारणाला मतदारांनी स्पष्ट पसंती दिली आहे. १२ जिल्हा परिषदांपैकी सर्व ठिकाणी भाजपा आणि महायुतीचीच सत्ता येणार असून १२५ पंचायत समित्यांपैकी ५० पेक्षा अधिक ठिकाणी भाजपा सत्ता स्थापन करेल, असे प्रतिपादन भारतीय …

Read More »