मुलुंड न्यायालयात साप आढळल्याने एकच गोंधळ तासाभराच्या नाट्यानंतर कामकाज सुरळीत सुरू

मुलुंड न्यायालयातील न्यायदालनातील फायलींच्या ढिगाऱ्यावर साप आढळून आला आणि न्यायालयाच्या परिसरात एकच गोंधळ उडाला. या घटनेमुळे मंगळवारी सुमारे तासभर न्यायालयीन कामकाज विस्कळीत झाले होते. सर्पमित्रांनी सापाचा शोध घेऊनही तो सापडला नाही. अखेर तासभर खोळंब्यानंतर न्यायालयीन कामकाज पुन्हा सुरळीत झाले.

मुलुंड येथील न्यायदंडाधिकारी न्यायालयाच्या २७ क्रमांकाच्या न्यायदालनात मंगळवारी दुपारपर्यंत नेहमीप्रमाणे कामकाज सुरू असताना एक पोलीस कर्मचारी प्रकरणाशी संबंधित फाईल शोधताना फायलींच्या ढिगाऱ्यावर दोन फूट लांबीचा साप आढळला आणि न्यायदालनात उपस्थितांमध्ये एकच गोंधळ उडाला. न्यायाधीशांनीही तात्पुरते कामकाज तहकूब केले. त्यानंतर, सर्पमित्र संघटनांना पाचारण केले. त्यांनी सापाचा सर्वत्र शोध घेतला, मात्र तो सापडला नाही. न्यायदालनातील एका बिळातून साप न्यायालयात आला असावा, असे एका वकिलाने घटनेनंतर सांगितले. मुलुंड न्यायदंडाधिकारी न्यायालय झाडांनी वेढलेले असून न्यायदालनात साप दिसणे ही काही दुर्मीळ घटना नाही. याआधीही न्यायदालनाच्या खिडकीवर साप दिसला होता. दोन महिन्यांपूर्वी न्यायाधीशांच्या दालनातही साप आढळून आल्याचे न्यायदालनात उपस्थित वकिलांनी सांगितले.

About Editor

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, वृद्ध पालकांसाठी मुलांना घर खाली करण्याचे आदेश देण्याचा अधिकार न्यायाधीकरणाला ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षितता, प्रतिष्ठा आणि कल्याण यांचे रक्षण करणे आवश्यक,देखभाल न्यायाधिकरण मुलांना आदेश देऊ शकते

सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी असा निर्णय दिला की, जर वृद्ध पालक आपल्या मुलांचा किंवा नातेवाईकांचा आदर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *