सामाजिक न्याय विभागाच्या रिक्त पदाच्यासाठीच्या परिक्षेचे वेळापत्रक जाहीर ४ मार्चे ते १९ मार्च या कालावधीत ऑनलाईन परिक्षा होणार

सामाजिक न्याय विभागांतर्गत समाज कल्याण आयुक्तालय, पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग-३ संवर्गातील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. या भरती प्रक्रियेचे ऑनलाईन परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. कॉम्प्युटरबेस ऑनलाईन परीक्षा ४ मार्च २०२५ ते १९ मार्च २०२५ रोजी विविध सत्रांमध्ये आयोजित करण्यात आली असल्याची माहिती आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी दिली आहे.

वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल/अधिक्षक, समाज कल्याण निरीक्षक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक व लघु टंकलेखक या संवर्गासाठी ही ऑनलाइन परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे. उमेदवारांना २५ फेब्रुवारी २०२५ पासून प्रवेश पत्र ऑनलाइन पद्धतीने या https://sjsa.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामध्ये महत्त्वाच्या सूचनांसंदर्भात माहितीचा समावेश असेल.

भरती प्रक्रियेबाबत अधिकृत माहितीकरिता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या https://sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला उमेदवारांनी भेट द्यावी तसेच भरती प्रक्रियाच्या अनुषंगाने ऑनलाइन अर्जात नमूद केलेल्या भ्रमणध्वनी व ई-मेल ने वेळोवेळी पाठविण्यात येणाऱ्या सूचनांचे उमेदवारांनी पालन करावे.

ही भरती प्रक्रियेशी संबंधित हॉल तिकीट ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून घेताना तांत्रिक अडचण असल्यास संबंधित उमेदवारांनी 91-9986638901 या क्रमांकावर संपर्क करावा, हा क्रमांक सोमवार ते शनिवार सकाळी ९ ते सायंकाळी ६ या कालावधीत सुरू राहील.

ही भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडण्यात येत असून उमेदवारांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच कोणत्याही व्यक्तीने या भरती प्रक्रियेबाबत गैरमार्गाने नोकरी देण्याचे/परीक्षा पास करून देण्याचे किंवा तत्सम स्वरूपाचे आमिष दाखविल्यास अशा भूलथापांना बळी न पडता त्याबाबत जवळच्या पोलीस स्टेशनकडे तात्काळ संपर्क करावा, असे आवाहन आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी केले आहे.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, किमान ७० किलोमीटर मेट्रो मार्गिकांच्या पूर्णत्वातून २०२७ हे ‘मेट्रो वर्ष’ मुंबईच्या दळणवळणाला गती देण्यासाठी मेट्रो आणि उन्नत मार्गिकांच्या कामांना वेग

२०२७ हे ‘मेट्रो वर्ष’ ठरवून यंदाच्या प्रलंबित कामांसह पुढील वर्षी किमान ७० किलोमीटर लांबीच्या मेट्रो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *