महावितरण अर्थात एमएसईडीसीएल मध्ये तब्बल २३ हजारांवर विविध पदांसाठी कोणतीही परीक्षा किंवा मुलाखत न घेता थेट भरती सुरू असल्याच्या खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती किंवा माहिती सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. केवळ दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही भरती असल्याचे सांगत हजारो रुपयांच्या वेतनाचे आमिष दाखवले जात आहे. मात्र …
Read More »प्रताप सरनाईक यांचे निर्देश, एसटीच्या कंत्राटी भरती प्रक्रियेत पारदर्शकता राखा उमेदवारांची फसवणूक झाल्यास कठोर कारवाई करा, बेरोजगार तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून पैसे उकळणाऱ्या खासगी संस्थांची चौकशी करण्याचे निर्देश
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) लवकरच सुमारे १३ हजार ९८० चालक व यांत्रिकी कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि नियमानुसार पार पडावी. बाह्य संस्थेमार्फत करण्यात येणारी उमेदवारांची निवड एसटी महामंडळाने निर्धारित केलेल्या पात्रता निकषांनुसारच व्हावी, याची संबंधित संस्थेने आणि एसटी प्रशासनाने …
Read More »प्रकाश आबिटकर यांचे निर्देश, पदभरती, पदोन्नतीला गती द्या पदोन्नतीची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे आदेश
राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ तातडीने उपलब्ध करून देण्याबरोबरच प्रलंबित पदभरती आणि पदोन्नतीच्या प्रक्रियांना गती देण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. आरोग्य भवन येथे आयोजित बैठकीत आस्थापना विषयक विविध बाबींचा सविस्तर आढावा घेत त्यांनी विभागातील कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक …
Read More »मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलिफ-लिपिक परीक्षा ६ सप्टेंबरला ६ जिल्ह्यात घेण्यात येणार परिक्षा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मुंबईचे नगरपाल (शेरीफ) कार्यालयातील बेलिफ-लिपिक, गट-क स्पर्धा परीक्षा २०२६ रविवार, ६ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. ही परीक्षा अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई आणि पुणे या जिल्हा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. परीक्षेचा पेपर एक सकाळी ११ ते दुपारी १२ आणि पेपर दोन दुपारी ३ ते …
Read More »अतुल लोंढे यांचा आरोप, एमपीएससी मधून सरळ सेवा भरतीने अधिकारी बनवण्याच्या तरुणांच्या स्वप्नावर भाजपा बुलडोझर
भाजपाचे मनुवादी सरकार जेन-झी विरोधी आहे. नीट पेपर फुटी प्रकरण अद्याप ताजे असताना राज्यातील भाजपा महायुती सरकारने या तरुणाईंच्या स्वप्नांवर, आशा अकांक्षांवर वरवंटा फिरवला आहे. एमपीएससी मधून सरळ सेवा भरतीतून थेट अधिकारी होण्याचे तरुणांचे स्वप्न भाजपा सरकारच्या नव्या जीआरमुळे अंधाकारमय झाले आहे. अधिकारी भरतीचे ६०-४० प्रमाण बदलणारा जीआर सरकारने आणला असून …
Read More »दत्तात्रय भरणे यांचे निर्देश, पेसा क्षेत्रातील कृषी सेवक पदभरती प्रक्रिया गतीने पूर्ण करा कृषी मंत्र्यांचे पद भरती बाबत निर्देश
राज्यातील पेसा क्षेत्रातील कृषी विभागातील रिक्त पदे तातडीने भरून कृषी सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक कार्यवाही वेगाने पूर्ण करावी असे निर्देश कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. मंत्रालयात पेसा अंतर्गत कृषी सेवक पदभरती, रिक्त जागा भरणे आणि मानधन तत्वावरील कृषी सेवकांच्या नियमितीकरणासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार नारायण तोडसाम, कृषी विभागाचे सचिव …
Read More »भरत गोगावले यांचे आवाहन, रोहयो विभागामार्फत भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहा सोशल मिडीयाच्या माध्यमातून भरतीच्या जाहिराती
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू असल्याची बोगस जाहिरात सोशल मीडियाद्वारे प्रसारित करण्यात येत आहे. अशा जाहिरातींना बळी पडून सर्वसामान्य नागरिक व बेरोजगार युवकांचे आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी दक्षता घेण्याचे आवाहन रोजगार हमी योजना विभागाचे मंत्री भरत गोगावले यांनी केले आहे. …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शासनाच्या भरती प्रक्रियेत सुधारणेचा निर्णय संयुक्त परीक्षा योजनेमध्ये नव्याने १८ सेवांचा, ९३ संवर्गाचा समावेश
शासनाच्या विविध पदांवरील भरती प्रक्रिया सुटसुटीत, सक्षम आणि उमेदवारांच्या दृष्टीने सुलभ व्हावी, याकरिता पदभरती प्रक्रियेत सुधारणा करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी देवेंद्र फडणवीस होते. या सुधारणेमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या विविध सेवांतर्गत संवर्गांची संख्या १०२ होणार आहे. तर संयुक्त परीक्षा योजनेमध्ये नव्याने १८ सेवांचा आणि ९३ संवर्गाचा …
Read More »सैनिक कल्याण विभागात लिपिक-टंकलेखक पदभरतीसाठी अर्ज सादरीकरणास मुदतवाढ ९ जानेवारी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत मुदत वाढ
सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्यामार्फत लिपिक टंकलेखक (गट-क) सरळसेवेतील पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे, अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ९ जानेवारी २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत वाढविण्यात आली असल्याचे मुंबई शहराचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. या भरतीसंदर्भातील जाहिरात १२ …
Read More »महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात २९० पदांची भरती कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) १४४ पदांसह विविध जागा
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मध्ये मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया सुरू करण्यात येत असून एकूण २९० पदांची भरती आयबीपीएस मार्फत केली जाणार आहे. यासंदर्भातील सविस्तर जाहिरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.mjp.maharashtra.gov.in) प्रसिद्ध करण्यात आली आहे, अशी माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. या भरतीत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या …
Read More »
Marathi e-Batmya