माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याचा मुद्दा, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले… अंबादास दानवे यांनी मुद्दा उपस्थित करत कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली

अर्थसंकल्पिय अधिवेशनाचा आजचा पहिलाच दिवस मागील राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने दोषी ठरविल्यानंतरही राज्य सरकारने अद्याप माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्द केली नाही की मंत्री पदाचा राजीनामा घेतला नाही यावरून दोषी ठरलेल्या माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा कधी घेणार असा सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेचे कामकाज सुरु होताच केला.

अंबादास दानवे यांनी उपस्थित केलेल्या मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मुद्यावर सभागृहातच उपस्थित असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे या प्रकरणात न्यायालयने सुनावणी घेत जे आदेश दिले. ते आदेश अद्याप सरकारपर्यंत पोहोचले नाहीत. तसेच त्यांनी याप्रकरणी सत्र न्यायालयात त्यांनी केलेल्या अपीलावर अद्याप निर्णय झालेला नाही. सत्र न्यायालया त्यांच्या अपीलावर निकाल देईल त्यावेळी त्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले.

पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जेव्हा न्यायालयाचा निर्णय घेतला जात नाही तेव्हा आता काही बोलणे ठीक होईल. तसेच माणिकराव कोकाटे यांच्याबाबत न्यायालयाने दिलेले आदेश अद्याप राज्य सरकारपर्यंत पोहोचले नाहीत. तेव्हा तो आदेश पोहोचेल त्यावेळी राज्याचे राज्यपालच यासंदर्भात निर्णय घेतील असेही यावेळी सांगितले.

दरम्यान, अंबादास दानवे यांनी कृषी मंत्री कोकाटे यांच्या राजीनाम्यावरून आक्रमक भूमिका घेत कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

यावेळी सभागृहात माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र हा शोक प्रस्ताव मध्येच थांबवून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यावरून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, डॉ पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्तावावर चर्चा सुरु असताना मध्येच राजीनाम्याचा मुद्दा पुढे केला जातो. यावरून विरोधक डॉ मनमोहन सिंग यांच्या शोक प्रस्तावाबाबत गंभीर नाहीत अशी टीकाही यावेळी केली.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, एमपीएससीच्या अनागोंदी कारभाराप्रकरणी अध्यक्ष व सचिवांची हकालपट्टी करा एमपीएससीच्या भोंगळ कारभाराला कंटाळून धाराशीव जिल्ह्यातील प्रथमेश देशमुखची आत्महत्या हा सरकारने घेतलेला बळी, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

भाजपा सरकारच्या काळात पेपरफुटीने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळखंडोबा करून ठेवला आहे. पेपरफुटीने त्रस्त विद्यार्थ्यांना MPSC च्या भोंगळ कारभाराचाही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *