३ विद्यमान खासदारांसह १२ जण राष्ट्रवादीकडून रिंगणात राजू शेट्टी यांना पाठिंबा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची घोषणा

मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे, साताराचे उद्यनराजे भोसले, कोल्हापूरचे धनंजय महाडीक या विद्यमान खासदारांना पुन्हा एकदा लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारी जाहीर करत रायगड लोकसभा मतदारसंघातून सुनिल तटकरे यांना उमेदवारी जाहीर करत असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी करत राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर केली.
याशिवाय ठाणे लोकसभेसाठी आनंद परांजपे, जळगांव मधून गुलाबराव देवकर, बुलढाण्यातून राजेंद्र शिंगणे, परभणीतून राजेस विटेकर, ईशान्य मुंबईतून मागील निवडणूकीतील पराभूत उमेदवार संजय दिना पाटील, कल्याणमधून बाबाजी बाळाराम पाटील, लक्षव्दीपमधून मोहम्मद पी.पी.फैजल यांच्या नावाची पहिली यादी जाहीर करत असल्याचे त्यांनी सांगितले.
तर हातकणंगलेची लोकसभेची जागा स्वाभिमानी शेतकरी पक्षासाठी सोडण्यात आली असून तेथील जो उमेदवार असेल त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तर उर्वरीत नावांची यादी लवकरचं जाहीर करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

राज्यात नऊ नवीन कारागृहे प्रस्तावित; बंदी क्षमतेत वाढ कैद्यांच्या क्षमतेते १२ हजार २५८ ने वाढ होणार

राज्यात पालघर, अहिल्यानगर, बारामती, येरवडा क्र.०२ व क्र. ०३ जि. पुणे, गोंदिया, हिंगोली, भुसावळ (जि. जळगाव) व अंबाजोगाई (जि. बीड) अशा एकूण नऊ ठिकाणी नवीन मध्यवर्ती व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *