मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, पाच वर्षात २६ टक्के वीज दर कमी राज्य नियामक आयोगाच्या निकालानंतर दिली माहिती

राज्याच्या इतिहासात प्रथमच पहिल्यावर्षी १० टक्के आणि टप्प्याटप्प्याने कपात करीत ५ वर्षांत २६ टक्के वीजदर कमी होणार आहेत. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) हा निकाल महावितरणच्या याचिकेवर दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ट्विट मध्ये म्हणाले की, साधारणत: पूर्वीचा काळ पाहिला तर १० टक्के वीजदरवाढीच्या याचिका सादर व्हायच्या. पण, राज्याच्या इतिहासात प्रथमच महावितरणने वीजदर कमी करण्यासाठी याचिका केली. त्यावरच हा आदेश एमईआरसीने दिला. या आदेशाचा लाभ घरगुती ग्राहक, औद्योगिक ग्राहक आणि व्यावसायिक ग्राहक अशा तिन्ही वर्गवारीत होणार आहे. राज्यात १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरणार्‍यांचे प्रमाण हे ७० टक्के आहे.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, त्यांच्यासाठी १० टक्के इतके सर्वाधिक दर कमी होतील. आमच्या बळीराजाला दिवसा आणि खात्रीचा वीजपुरवठा होण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 चे काम युद्धपातळीवर सुरु आहे. सोबतच आगामी काळात वीजखरेदी करारांमध्ये हरितऊर्जेवर मोठ्या प्रमाणात भर दिल्यामुळे वीजखरेदी खर्चात बचत होणार आहे. त्यामुळेच हा दर कमी करण्याचा प्रस्ताव महावितरणला मांडता आला. ही बातमी राज्यातील जनतेला देताना मला आनंद होत असल्याचेही यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

एकनाथ शिंदे यांची मागणी, चड्डी-बनियान गँगच्या असभ्य गोंधळाबाबत काँग्रेसने जनतेची माफी मागावी भारत मंडपममधील आंदोलनातून काँग्रेस देशद्रोही चेहरा समोर आला

इंडिया एआय इम्पॅक्ट समिटमधून जगापुढे भारताचे तंत्रवैभव सादर केले जात असताना भारत मंडपममध्ये युथ काँग्रेसच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *