शिवाजी पार्क परिसरातील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना ठाकरे बंधू आक्रमक, समाजकंटकांना अटक करण्याची मागणी

दादर पश्चिममधील छ. शिवाजी पार्क परिसरात असलेल्या मीनाताई ठाकरे यांच्या स्मारकाची अज्ञाताकडून विटंबना करण्यात आल्याचा प्रकार बुधवारी घडला. प्रबोधनकार ठाकरे यांच्या स्मृतीदिनी ही घटना घातल्याने एकच खळबळ उडाली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बंधूंनी यानंतर पाहणी घटना स्थळाची पाहणी करून आक्रमक पवित्रा घेतला. दरम्यान, समाजकंटकांना शोधून २४ तासाच्या आत कठोर कारवाई करण्याची मागणी ठाकरे बंधूंनी केली. मागील वर्षी देखील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती.

शिवाजी पार्क येथील मीनाताई ठाकरे यांच्या स्मारकावर सकाळी सात तासाच्या सुमारास अज्ञातांकडून लाल रंग टाकल्याची घटना घडली. ऑइल पेंट सदृश्य लाल रंग असल्याचे समोर आले. शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी पुतळ्याला गराडा घालून जोरदार घोषणाबाजी करत घटनेचा निषेध केला. या घटनेची माहिती शिवाजी पार्क पोलिसांना मिळताच, आरोपीचा शोध घेण्यासाठी २५ पथके तैनात केली असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध घेण्यात येतो आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पाठोपाठ शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुतळ्याच्या ठिकाणी पाहणी केली.

दरम्यान, राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क पोलिसांकडून घटनेची माहिती घेऊन २४ तासांत समाजकंटकांना शोधून काढा, अशी मागणी केली. तर उद्धव ठाकरे यांनी प्रकरणाचा निषेध केला. हा अत्यंत निदनीय प्रकार घडला असून ज्याला आपल्या आई-वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते, किंवा बेवारस व्यक्तीने हे कृत्य केले असावे. तसेच बिहारमध्ये पंतप्रधान मोदींच्या मातोश्रींचा अपमान केला म्हणून बिहार बंद करण्याचा असफल प्रयत्न झाला. त्या प्रकारे महाराष्ट्र बंद करण्याचा कोणाचा तरी प्रयत्न असू शकेल, असा संशय व्यक्त केला. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी देखील या घटनेचा निषेध व्यक्त करत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली.

About Editor

Check Also

मुंबईत पोलिसाची विद्यार्थ्यांना ड्रग्जच्या पुढ्या खिशात ठेवून अडकविण्याची धमकी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेस आणि आपकडून टीका

नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी मुंबईत झालेल्या नाट्यमय विद्यार्थी आंदोलनानंतर आणि विद्यार्थ्यांना ताब्यात घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *