जिथे सत्ता तिथे राधाकृष्ण विखे पाटील राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी
राधाकृष्ण विखे पाटील यांचं कुटुंब जिथे सत्ता तिथे, त्यामुळे ते सत्तेशिवाय राहू शकत नाही असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला.
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आमदारपदाच्या राजीनाम्याबाबत पत्रकारांनी विचारलं असता नवाब मलिक यांनी वरील आरोप केला.
९५ मध्ये शिवसेनेची सत्ता आली. त्यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वडीलांना मंत्रीपद मिळाले होते, नंतर युपीएचं सरकार आलं त्यावेळी पुन्हा राधाकृष्ण विखे पाटील आणि आता भाजपची सत्ता आल्यावर राधाकृष्ण विखे पाटील भाजपकडे वळल्याचा टीका त्यांनी केली.
विखे पाटील यांचा मुलगा ज्यावेळी भाजपमध्ये गेला त्याचवेळी राधाकृष्ण विखे पाटील भाजपात गेल्यासारखं होते. पब्लीसिटीसाठी टप्प्याटप्प्याने ते निर्णय जाहीर करत आहेत. विरोधी पक्षनेता गेला हे सांगण्यासाठी आज त्यांनी राजीनामा दिल्याचे त्यांनी टीका केली.

About Editor

Check Also

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अनुदानात वाढ राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील, शासकीय वसतिगृहासाठी पात्र असूनही वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना उच्च …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *