शरद पवार यांना उद्देशून सुनेत्रा पवार म्हणाल्या की, हीच यशाची खरी ताकद शरद पवार यांच्या राजकीय जीवनाला ६० वर्षे पूर्ण, सुनेत्रा पवार यांची खास पोस्ट

महाराष्ट्राचे लाडके जाणते राजे म्हणून ओळखले जाणारे नेते अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्या सार्वजनिक आणि संसदीय राजकारणाला २२ फेब्रुवारी १९६७ साली सुरुवात झाली. त्यास आज ६० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी एक खास पोस्ट लिहित हीच यशाची खरी ताकद असल्याचे सांगत शरद पवार यांच्या राजकिय कारकिर्दीचे कौतुक केले.

शरद पवार यांच्या सार्वजनिक आणि संसदीय राजकारणाला आज ६० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोस्ट लिहिताना सुनेत्रा पवार पुढे म्हणाल्या की, १९८७ पासून सुरु झालेला प्रवास आजही तितक्याच उर्जेने आणि निष्ठेने पुढे जात आहेत. महाराष्ट्र विधानसभेपासून ते संसद भवनापर्यंतच्या विविध जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळत त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून सातत्याने जनतेचा विश्वास संपादन केला.

पुढे सुनेत्रा पवार म्हणाल्या की, या दिर्घ वाटचालीत त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहिलेले कार्यकर्ते, सहकारी, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जनतेची साथ, हीच त्यांच्या यशाची खरी ताकद आहे. पवार साहेबांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा आगामी काळातही सर्वांना नवी ऊर्जा देत राहो असे सांगत शरद पवार यांना सदिच्छा व्यक्त केली.

सुनेत्रा पवार यांच्याबरोबरच शरद पवार यांच्या कन्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनीही एक्सवर पोस्ट लिहित म्हणाल्या की, शरद पवार यांच्या सार्वजनिक आणि संसदीय राजकारणास आज ६० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे अनेकांनी शुभेच्छा दिल्या. या सहा दशकांच्या काळात कित्येक महत्वाच्या घडामोडींचे ते साक्षीदार आहेत. महाराष्ट्र विधानसभेचे त्यांनी सहा वेळा तर एकदा विधान परिषदेचे सदस्य म्हणून शपथ घेतली. तसेच तब्बल सात वेळा लोकसभेवर निवडूण गेले तर दोन वेळा राज्यसभेवर प्रतिनिधीत्व केले. १९६७ साली सुरु झालेला हा अविजीत प्रवास आजही अव्याहतपणे सुरु आहे. या संपूर्ण प्रवासात त्यांच्यासोबत त्यांच्या जीवाभावाचे सोबती कार्यकर्त्ये आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मायबाप जनता ठामपणे उभी राहिली, जनतेने त्यांच्यावर अलोट प्रेम केले. प्रचंड विश्वास टाकला, या विश्वासाच्या बळावरच हा प्रवास शक्य झाला आहे. या बद्दल सर्वांचे कृतज्ञतापूर्वक आभार अशा भावना व्यक्त केल्या.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, SIR च्या माध्यमातून ३ कोटी २८ लाख मतदारांची नावे वगळली; लोकशाहीचा गळा घोटण्याचा डाव संशयास्पद मतदारांची नावे मतदारसंघ व बुथनिहाय प्रसिद्ध करा, दावे व हरकतीसाठी तीन महिन्यांची मुदत वाढवून द्या

भारतीय जनता पक्ष निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मतदारांची नावे वगळून, त्यांना मतदानाच्या संवैधानिक अधिकारापासून वंचित ठेवत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *