योगेश कदम यांची माहिती, पोलीस कोठडीतील आरोपी पळून जाऊ नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाय ससून रूग्णालयात पोलिस चौकीची स्थापना

पाचगणी पोलीस स्टेशन येथे पोक्सो अन्वये दाखल गुन्ह्यातील न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीच्या पलायनास जबाबदार असलेल्या पोलीस अंमलदार यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तसेच कर्तव्यात केलेल्या कसुरीबाबत त्यांच्यावर खातेनिहाय विभागीय चौकशीची कारवाई करण्यात आलेली आहे. अशा घटना टाळण्यासाठी बंडगार्डन पोलीस स्टेशन अंतर्गत ससून रुग्णालय पोलीस चौकीची स्थापना करण्यात आली असल्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले.

सातारा जिल्ह्यातील पाचगणी पोलीस स्टेशन येथे पोक्सो अन्वये दाखल गुन्ह्यातील न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीस पोलीस संरक्षणात उपचारार्थ ससून रुग्णालय येथे दाखल केले होते. हा आरोपी पळून जाऊन पुन्हा स्वतः हजर झाला. याबाबत संबधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई तसेच आरोपींसाठी शासकीय रूग्णालयात स्वतंत्र कक्ष उभारण्याबाबत सदस्य हारून खान यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

याबाबत अधिक माहिती देताना गृह राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, अशा घटना टाळण्यासाठी बंडगार्डन पोलीस स्टेशन अंतर्गत ससून रुग्णालय पोलीस चौकीची स्थापना करण्यात आलेली आहे. पुणे पोलीस आयुक्तालयमार्फत ससून पोलीस चौकीचे प्रभारी अधिकारी यांच्याकहरता व चौकीच्या कामकाजासंदर्भात कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे.

या लक्षवेधीच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेत विधानसभा सदस्य सर्वश्री बापूसाहेब पठारे, विकास ठाकरे, नितीन राऊत, सिद्धार्थ शिरोळे, वरूण सरदेसाई, हरीष पिंपळे, मोहन मते यांनी सहभाग घेतला.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची स्पष्टोक्ती, कर्जत भीमाशंकरचा प्रकल्प उद्योगपतीच्या भल्यासाठी, विकासाला नाही विनाशाला विरोध महाराष्ट्राला झाडखाऊ मुख्यमंत्री नको, ३३ कोटी वृक्ष लागवडीचे काय झाले? ते आधी सांगा व नंतर लाखो वृक्ष लागवडीचे बोला

कर्जत भिमाशंकर भागात होणारा टोरंटचा प्रकल्प हा पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी करणारा आहे. विकासाला कोणाचाही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *