नितेश राणे यांची माहिती, जलवाहतूक सेवा होणार डिजिटल ऑनलाईन तिकीट व्यवस्थेची अंमलबजावणी करणार

मुंबई महानगर प्रदेशातील जलवाहतूक सेवा अधिक आधुनिक, पारदर्शक आणि प्रवासी-अनुकूल करण्यासाठी ऑनलाईन तिकीट व्यवस्थेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. वर्सोवा-मढ पारंपरिक तिकीट प्रणाली आधुनिक डिजिटल प्रणालीमध्ये रूपांतरित करण्यात येणार असल्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

मुंबई महानगर प्रदेश मधील प्रवासी जलवाहतूकीसाठी ऑनलाईन तिकीट वितरण, विक्री प्रणाली सुरु करणेबाबत आढावा बैठक मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात  झाली. या बैठकीस महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप यांच्यासह  संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री नितेश राणे म्हणाले, वर्सोवा-मढ पारंपरिक तिकीट प्रणाली आधुनिक डिजिटल प्रणालीमध्ये रूपांतरित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड आणि खासगी भागीदारांच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पाअंतर्गत मासिक, तिमाही आणि वार्षिक डिजिटल पास सुरू करण्याचे नियोजन आहे. पुढील तीन महिन्यांत किमान ५० टक्के व्यवहार ऑनलाइन माध्यमातून करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, दररोज होणाऱ्या सुमारे २२ हजार तिकीट व्यवहारांपैकी किमान ११ हजार व्यवहार डिजिटल पद्धतीने करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.

पुढे बोलताना नितेश राणे म्हणाले की, मुंबई महानगर प्रदेशातील वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता जलवाहतुकीमध्ये डिजिटल प्रणालीचा प्रभावी वापर करणे गरजेचे आहे. प्रवाशांना तिकीट खरेदीसाठी रांगेत उभे राहावे लागू नये, तिकीट प्रक्रिया अधिक वेगवान व्हावी तसेच संपूर्ण व्यवस्थेमध्ये पारदर्शकता निर्माण व्हावी, यासाठी ऑनलाईन तिकीट प्रणाली अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

पुढे बोलताना नितेश राणे म्हणाले की, मान्सूनपूर्व काळात जलवाहतूक सेवा अधिक वेगाने सुरू करणे. गेटवे ऑफ इंडिया, बेलापूर, एलिफंटा आणि डीसीडी टर्मिनल मार्गांवरील सेवा लवकर सुरू करण्याबाबत यावेळी सविस्तर चर्चा झाली.

शेवटी बोलताना नितेश राणे म्हणाले की, तिकीट प्रणालीमधून जाहिरात आणि कमर्शियल ब्रँडिंगद्वारे अतिरिक्त महसूल निर्माण करण्याचे पर्यायही विचाराधीन आहेत. जेट्टी परिसरात गॅझेबो, डिजिटल माहिती व्यवस्था आणि प्रवाशांसाठी इतर सुविधा उभारण्याचे नियोजनही करण्यात आले आहे. या बैठकीत स्मार्ट ऑटोमॅटिक गेट्स, क्यूआर कोड आधारित प्रवेश व्यवस्था, हँडहेल्ड तिकीट यंत्रणा आणि मल्टी-मोडल पेमेंट प्रणालीचे सादरीकरण करण्यात आले.

 

About Editor

Check Also

धनंजय शिंदे यांची मागणी, एमएमआरडीए अभियांत्रिकी भरती परीक्षेतील घोटाळ्याची न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करा परिक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्याचे पालक नगरविकास विभागात कार्यरत

भाजपा सरकारच्या काळात परिक्षांना पेपरफुटीचे ग्रहण लागले असून सरकार एकही परीक्षा व्यवस्थित घेऊ शकत नाही. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *