हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, पूर्णेकर हत्याकांडाचा तपास ठाण्याबाहेरील आयपीएसअधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली करा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ठाण्यात घेतली पूर्णेकरांच्या कुटुंबियांची भेट

शिवसेना (UBT) चे पदाधिकारी प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येमागे कोणती शक्ती आहे ते चौकशीतून समोर आले पाहिजे परंतु पोलिसांचा आतापर्यंतचा तपास पाहता कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न होत आहे, असे स्पष्ट दिसत आहे. सध्याची एसआयटी ही केवळ धूळफेक असून ठाण्याबाहेरील आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करावी व हत्येचा संपूर्ण तपास उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज ठाण्यात पूर्णेकर यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, पूर्णेकर यांच्या हत्येचा तपासात काहीही प्रगती दिसत नाही. पूर्णेकर कुटुंबानी जे पुरावे दिले, ज्यांचा या हत्येमागे संशय आहे त्यांची नावे दिली पण त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. एफआयआर दाखल करून घेण्यापासूनच हा तपास भरकटलेला आहे. आताची चौकशी ही वरवरची असून मुख्य आरोपींना अभय दिले जात आहे. जी एसआयटी स्थापन केली आहे ती स्थानिक पोलिसांची आहे. पूर्णेकर कुटुंब व ठाणेकरांचा या एसआयटीवर विश्वास नाही. ही हत्या अत्यंत गंभीर असून हत्येपूर्वी प्रदीप पूर्णेकर यांनीही त्यांच्या जीवाला धोका आहे हे सांगितले होते, त्याकडे तपासाची चक्रे फिरत नाहीत. सरकारने पूर्णेकर कुटुंबाला न्याय दिला पाहिजे. या कठीण प्रसंगात काँग्रेस पक्ष पुर्णेकर कुटुंबियांसोबत आहे असा विश्वासही सपकाळ यांनी व्यक्त केला.

यावेळी त्यांच्यासोबत ठाणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल पिंगळे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे, माजी अध्यक्ष विक्रांत चव्हाण, काँग्रेस तालुकाध्यक्ष संगीता कोटल, सेवादलाचे अध्यक्ष रविंद्र कोळी यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About Editor

Check Also

मकरंद पाटील यांची घोषणा, बळीराजाची दिवाळी गोड होणार; शासनाकडुन ७५०० कोटींची मदत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीचा शासन निर्णय तातडीने निर्गमित करणार

कधी आभाळाकडं डोळे लावून बसायचं, कधी पावसाच्या लहरीपणाशी झुंज द्यायची, तर कधी हातातोंडाशी आलेलं पीक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *