पुणे, २८ जानेवारी: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान बुधवारी सकाळी कोसळले. पुणे जिल्ह्यातील बारामती येथे लँडिंग करताना हा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, अजित पवार मुंबईहून बारामतीला निवडणूक रॅलीसाठी जात होते. या अपघातात अजित पवारांसह सहा जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, …
Read More »१५० दिवस ई गर्व्हनन्स कार्यक्रमात कामगार विभाग अव्वल कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी केले अधिकाऱ्यांचे अभिनंदन
राज्य शासनाने १५० दिवसांचा ई गर्व्हनन्स व सेवाकर्मी पुरस्कार कार्यक्रम शासकीय विभाग, संचालक, आयुक्तालय, क्षेत्रीय कार्यालय आदींसाठी जाहीर केला. यामध्ये ३ हजारपेक्षा कमी मंजूर पदसंख्या असलेल्या विभागांच्या प्रकारात २०० गुणांपैकी १८५ गुण मिळवित कामगार विभाग राज्यात अव्वल ठरला आहे. विशेष प्रशंसनीय वर्गवारीमध्ये विभागाला स्थान मिळाले आहे. कार्यालयीन मूल्यमापनात १५० दिवसांचा ई-गव्हर्नन्स कार्यकम अंतर्गत राज्यातील ६८ सर्वोत्तम आयुक्त, संचालक प्रकारात कामगार विभागअंतर्गत कार्यरत बाष्पके …
Read More »अखेर भारत आणि युरोपियन युनियनच्या वाणिज्य करारावर शिक्कामोर्तब पंतप्रधान मोदी, उर्सुला वॉन डेर लेयन आणि युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनिया कोस्टा यांनी केल्या करारावर सह्या
युरोपियन युनियनच्या प्रमुख उर्सुला वॉन डेर लेयन यांनी मंगळवारी भारतासोबतच्या ऐतिहासिक व्यापार कराराचे कौतुक केले आणि त्याला “सर्व करारांची जननी” असे संबोधले. ७७ व्या प्रजासत्ताक दिनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारतात आलेल्या ईयू प्रमुखांनी सांगितले की, हा करार दोन्ही बाजूंमधील भागीदारीत एक नवीन अध्याय आहे. “पंतप्रधान, प्रतिष्ठित मित्र, आम्ही ते केले, …
Read More »राधाकृष्ण विखे-पाटील यांचे निर्देश, मराठा कुणबी जात प्रमाणपत्रांसाठी प्राप्त अर्ज प्रलंबित राहू नयेत मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत निर्देश
मराठा कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने हैदराबाद गॅझेटिअरच्या संदर्भात सप्टेंबर २०२५ मध्ये जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानंतर मराठवाडा महसूल विभागातील आठही जिल्ह्यांत प्रमाणपत्रांसाठी अर्ज प्राप्त होत असून, हे अर्ज प्रलंबित राहू नयेत यासाठी कार्यवाहीस गती देण्यात यावी, असे निर्देश जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे निर्णय, १३ मंत्री गैरहजर एकनाथ शिंदे यांच्यासह १३ मंत्र्यांची गैरहजेरी
राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १३ मंत्री गैरहजर राहिले. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे पुढील निर्णय घेण्यात आले. मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील आयटीआयचे आधुनिकीकरण, पीएम – सेतू योजना राबविणार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देयकांसाठी ट्रेड …
Read More »वर्षा गायकवाड यांचे आवाहन, पराभवाने खचून जाऊ नका, मुंबईकरांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवा निवडणुकीतील पराभूत उमेदवारांबरोबर वर्षा गायकवाड यांची राजीव गांधी भवनमध्ये बैठक
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या जिद्दीने व दबावाला बळी न पडता लढा दिला आहे. मुंबईकरांनी काँग्रेसचे २४ नगरसेवक महानगरपालिकेत पाठवले आहेत, हे २४ जण जनतेच्या प्रश्नावर काम करतील पण जे पराभूत झाले त्यांनी खचून जाऊ नये, आपल्या वार्डातील जनतेचे प्रश्न, समस्या यावर आवाज उठवा, काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी आहे, असल्याची ग्वाही मुंबई काँग्रेस अध्यक्ष …
Read More »जयकुमार रावल यांची माहिती, राज्यात ३.३७ लाख मेट्रिक टन तूर खरेदीला केंद्राची मान्यता केंद्राने मंजूरी दिल्याची माहिती
महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, राज्यात ३.३७ लाख मेट्रिक टन तूर खरेदीस केंद्र सरकारने मंजुरी दिली असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासोबत पणन मंत्री जयकुमार रावल यांची उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत हा …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई विमानतळास मेट्रो जोडणार भूसंपादनासह सर्व परवानग्यांची कार्यवाही प्रकल्प सुरू होण्यापूर्वी पूर्ण करावी
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दरम्यान मेट्रो मार्गिका ८ च्या ३५ किलोमीटरच्या जोडणीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यासोबतच ६६ किलोमीटर लांबीचा नाशिक शहर परिक्रमा मार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून करण्यास आणि गडचिरोली …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, आचारसंहिता भंग प्रकरणी चंद्रकांत पाटील यांच्यावर कठोर कारवाई करा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची राज्य निवडणूक आयुक्तांकडे पत्राद्वारे तक्रार
राज्यात सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहिता लागू आहे, असे असताना सत्ताधारी पक्षातील मंत्री जाणीवपूर्वक आणि उघडपणे या आचारसंहितेचे उल्लंघन करत असल्याचे गंभीर प्रकार समोर येत आहेत. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेच्या पूर्वसंध्येला सांगली जिल्ह्यात झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात, …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, हिरव्या व भगव्या रंगावरून काही शक्तींचा राजकीय स्वार्थ साधण्याचा डाव तिरंगा देशाची आन, बान आणि शान; महाराष्ट्रात सर्वदूर तिरंगा पोहचवण्याचा संकल्प करा
तिरंगा देशाची आन, बान आणि शान आहे, तिरंग्यासाठी अनेकांनी आपले रक्त सांडले आहे पण सध्या काही जातीवादी व धर्मांध शक्ती आपल्या स्वार्थी राजकारणासाठी हिरव्या व भगव्या रंगाचे राजकारण करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम करत आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांनी व संविधानवादी लोकांनी मात्र भारतासह संपूर्ण महाराष्ट्रात मनामनात, घराघरात तिरंगा पोहोचवण्याचा संकल्प करावा, …
Read More »
Marathi e-Batmya