शशिकांत शिंदे यांची स्पष्टोक्ती, हा आरोप बालिशपणाचा, आम्ही कोणाच्याही पक्षाला सुपारी दिली नाही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्षांची स्पष्टोक्ती

आम्ही कोणाच्याही पक्षाला नुकसान पोहोचविण्यासाठी सुपारी दिली, असा आरोप करणं हा निव्वळ बालिशपणा आहे. खरं तर त्यांना कोण अडचणीत आणतंय, याचा शोध त्यांनी त्यांच्या मित्रपक्षात घ्यावा, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार शशिकांत शिंदे यांनी मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.

शशिकांत शिंदे बोलताना म्हणाले की, अजितदादांच्या विमान दुर्घटनेत ब्लॅक बॉक्सचा अहवाल अद्याप आलेला नाही, CID चौकशीचा खुलासा नाही मग सत्य बाहेर कसं आणि केव्हा येणार? रोहित पवार यांनी व्यक्त केलेल्या शंकांच तपास यंत्रणांनी गंभीरपणे विचार करणं गरजेचं आहे असे बोलताना म्हटले आहे.

शशिकांत शिंदे म्हणाले की,भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये काही मोठ्या नेत्यांच्या फोटोवर ‘फुल्या चर्चा आहेत, चौकशी झाली पाहिजे,अंधश्रद्धेविरोधी कायदा अधिक कडक करण्याची गरज आहे, अशी परिस्थिती निर्माण होत आहे. तसंच धर्माच्या नावावर समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्ये टाळली पाहिजेत,अन्यथा समाजात तणाव वाढू शकतो असेही स्पष्टपणे सांगितले.

पुढे बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले की,राष्ट्रवादी एकत्रीकरणाबाबत पूर्वी चर्चाच झाली नव्हती असं सांगितलं जात होतं, पण आता ती चर्चा झाली होती हे मान्य करण्यात आलं आहे. आम्ही एकत्रीकरणाबाबतचा विषय थांबवला असून सध्या आमचा पक्ष बळकट करण्यावर आमचा भर आहे. असल्याचे शेवटी सांगितले.

About Editor

Check Also

उदय सामंत यांची माहिती, छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी ३५० कोटींचा आराखडा आवश्यकतेनुसार अधिक जमीनही संपादित करणार

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर कसबा येथे छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्यास राज्य सरकार कटिबद्ध असून, या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *