Editor

राज्यातील २९ महानगरपालिका निवडणूक क्षेत्रात १५ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी राज्य सरकारने जारी केली सुट्टीची अधिसूचना

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी गुरुवार, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित मतदान क्षेत्रात १५ जानेवारी २०२६रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आल्याची अधिसूचना राज्य शासनाने प्रसिद्ध केली आहे. अधिसूचना सर्व विभागांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, मंडळे इत्यादींच्या निदर्शनास आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही …

Read More »

ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ज्ञ डॉ माधव गाडगीळ यांना मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली व्रतस्थ पर्यावरण शास्त्रज्ञाला मुकलो

पर्यावरण संतुलनाच्या क्षेत्रासाठी आयुष्य वेचणारे डॉ. माधव गाडगीळ व्रतस्थ पर्यावरण शास्त्रज्ज्ञ म्हणून सदैव स्मरणात राहतील, अशी शोकभावना व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पद्मभूषण डॉ. माधव गाडगीळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस शोक संदेशात म्हणतात, डॉ माधव गाडगीळ यांनी पर्यावरण विषयक जाणीव जागृती व्हावी यासाठी विशेष …

Read More »

वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल मृत मुलाच्या इच्छा पुर्तीसाठी करणार ७५ टक्के संपत्ती दान ४९ वर्षिय अग्नीवेश मुलाचे अमेरिकेच्या रूग्णालयात निधन

अमेरिकेत मुलगा अग्निवेशच्या अचानक झालेल्या निधनानंतर, अब्जाधीश उद्योगपती आणि वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी आपली ७५% पेक्षा जास्त संपत्ती समाजाला दान करण्याच्या आपल्या जुन्या संकल्पाचा पुनरुच्चार केला आहे. आपल्या आयुष्यातील ‘सर्वात काळा दिवस’ असे संबोधत अनिल अग्रवाल म्हणाले की, स्कीइंग अपघातात झालेल्या दुखापतींमधून बरे होत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांच्या …

Read More »

बाजार ७८० अंकानी कोसळला, अमेरिका टॅरिफ वाढवणार असल्याचा चर्चेचा परिणाम आयटी आणि धातू क्षेत्रातील समभागही दबावाखाली राहिले

बुधवारी दुपारच्या सत्रात दलाल स्ट्रीटवर मोठी घसरण झाली, विविध क्षेत्रांमध्ये विक्रीचा दबाव वाढल्याने प्रमुख निर्देशांक जवळपास १% घसरले. लार्ज-कॅप समभागांमधील तोटा वाढल्याने गुंतवणूकदार सावध झाले, तर आयटी आणि धातू क्षेत्रातील समभागही दबावाखाली राहिले. एस अँड पी बीएसई सेन्सेक्स ७८०.१८ अंकांनी घसरून ८४,१८०.९६ अंकांवर बंद झाला, तर एनएसई निफ्टी ५० २६३.९० …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहिरनामा प्रकाशनावेळी सुनिल तटकरे म्हणाले, मुंबईकरांनी सहकार्य करावे जनसहभागासह मुंबईकरांचे स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या त्रिसूत्रीनुसार शहरात सलोखा राखणार

आम्हाला आमच्या मर्यादेची…शक्तीस्थळाची कल्पना आहे… तरीपण आमचे एक वेगळे अस्तित्व आहे ते घेऊन आम्ही यावेळेला मुंबई शहरात निवडणूकीला सामोरे जात असून आज मुंबईकरांसाठी जाहिरनामा प्रसिद्ध करत त्यामुळे तमाम मुंबईकरांनी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सहकार्य करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत केले. राष्ट्रवादी काँग्रेसने …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाची शंका, न्या. वर्मा यांच्या विरोधातील प्रस्ताव राज्यसभेने फेटाळल्यास सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने व्यक्त केली शंका

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या महाभियोगासाठी लोकसभेने स्वीकारलेला प्रस्ताव, त्याच दिवशी राज्यसभेत मांडलेला असाच प्रस्ताव फेटाळला गेल्यास, तो अयशस्वी मानला जावा, या मतावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी शंका व्यक्त केली. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती एस. सी. शर्मा यांच्या खंडपीठासमोर न्यायमूर्ती वर्मा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी …

Read More »

अमेरिकेने व्हेनेझुएलाशी संबधित तेलाचे टँकर केले जप्त अंटार्टीकच्या समुद्रात रशियाबरोबर स्टॅडं ऑफ

अमेरिकेने बुधवारी उत्तर अटलांटिक महासागरातून, व्हेनेझुएलाशी संबंधित असलेल्या आणि रशियन ध्वज लावलेल्या एका तेल टँकरला अनेक आठवडे मागोवा घेतल्यानंतर यशस्वीरित्या ताब्यात घेतले. मूळतः ‘बेला १’ म्हणून ओळखले जाणारे आणि आता ‘मॅरिनेरा’ म्हणून नोंदणीकृत असलेले हे जहाज, अमेरिकेच्या निर्बंधांचे उल्लंघन केल्याबद्दल फेडरल न्यायालयाच्या वॉरंटच्या आधारे अमेरिकेच्या नियंत्रणाखाली घेण्यात आले, असे अमेरिकेच्या …

Read More »

सचिन सावंत यांची टीका, भाजपा हा ‘ढ’ पक्ष; अभ्यास न करता बरळण्याचे काम मुंबईत मुस्लीम लोकसंख्या वाढल्याचा आरोप ध्रुवीकरणाच्या अजेंड्याकरिता

भारतीय जनता पक्ष हा विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करत नाही कारण त्यांच्याकडे विकासावर बोलण्यासारखे काहीच नाही म्हणून ते सातत्याने हिंदू मुस्लीम मुद्दा उकरून काढतात. मुंबईत मुस्लीमांची लोकसंख्या वाढली हा मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांचा आरोप अभ्यासात कच्च्या असणाऱ्या व्यक्तीचा आहे. भाजपा व अमित साटम यांना झोपेत व स्वप्नातही मुस्लीमच दिसतात. …

Read More »

महिलांसाठी मुंबई देशातील टॉप ५ शहरांमध्ये; बेंगळुरू पुन्हा एकदा अव्वल टॉप सिटीज फॉर वुमेन इन इंडिया २०२५ च्या अहवाल माहिती

भारतातील महिलांसाठी राहण्यायोग्य आणि करिअरसाठी पोषक शहरांच्या यादीत मुंबईने आपले स्थान अधिक भक्कम केले आहे. प्रसिद्ध ‘वर्कप्लेस कल्चर’ कन्सल्टिंग फर्म ‘अवतार ग्रुप’ तर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘टॉप सिटीज फॉर विमेन इन इंडिया’ (TCWI) २०२५ च्या अहवालात मुंबईने ५ वे स्थान पटकावले आहे. या यादीत कर्नाटकची राजधानी बेंगळुरूने आपले पहिले स्थान …

Read More »

आचार्य देवव्रत यांचे आवाहन, युवकांनी भारताला विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत योगदान द्यावे भारतीय संस्कृतीचा वारसा युवकांनी जपावा

भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची व मोलाची आहे. देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी युवकांनी विचार, कृती आणि नव कल्पनांच्य माध्यमातून पुढे येऊन भारतीय संस्कृतीचा वारसा जपत भारताला विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले. राष्ट्रीय युवा महोत्सव-विकसित भारत यंग लीडर्स …

Read More »