हेमंत सोरेन यांचा राजीनामा, तर चंम्पाई सोरेन नवे विधिमंडळ गटनेते

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा पॅटर्न झारखंड राज्यातही राबवित झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्यात आले. मात्र मागील काही दिवसांपासून सातत्याने कथित कोळसाखाण घोटाळ्याप्रकरणी हेमंत सोरेन यांची ईडीकडून सातत्याने चौकशी सुरु होती. तसेच आजही ईडी अधिकाऱ्यांनी सात तास चौकशी केली. त्यानंतर अखेर हेमंत सोरेन यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी राजभवनावर नेत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. हेमंत सोरेन यांच्या राजीनाम्यानंतर ट्रान्सपोर्ट मंत्री चंम्पाई सोरेन यांची लगेच झारखंडच्या विधिमंडळ गटाच्या नेते पदी नाव जाहिर करण्यात आले.

झारखंड मध्ये झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील सरकारला काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाने पाठिंबा दिला आहे. परंतु लोकसभा निवडणूकांच्या तोंडावर ईडीकडून विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात कारवाईचा फास आळवण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान झारखंड मुक्ती मोर्चाच्या राज्यसभा खासदार महुआ माझी यांनी सांगितले की हेमंत सोरेन यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच त्यांची रवानगी ईडी कोठडीत करण्यात आली आहे. त्यामुळे राज्याच्या झारखंड मुक्ती मोर्चाच्या पुढील विधिमंडळ गटनेते पदी चंम्पाई सोरेन यांचे नाव पक्षाकडून निश्चित करण्यात आले आहे.

About Editor

Check Also

कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक यांनी आज महाराष्ट्र प्रदेश …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *