Breaking News

लोकसभेत खासदाराने केलेल्या निंदनीय वक्तव्यावर भाजपाने उचललं पाऊल कारणे दाखवा नोटीस बजावली

काही दिवसांपूर्वी देशातील महत्वपूर्ण असलेल्या चंद्रयान-३ मोहिमेच्या यशस्वी चाचणीनंतर इस्त्रोचे अभिनंदन करण्याच्या प्रस्तावावरील चर्चेवेळी भाजपाचे दक्षिण दिल्लीचे खासदार रमेश बुधारी यांनी भर संसदेतच बसपाचे मुस्लिम खासदार दानिश अली यांना लक्ष्य करत हेट स्पिचचा वापर करत अशलाघ्य भाषेचा वापर केला. सध्या देशात राजकिय निवडणूकांचे वातावरण चांगलेच तापलेले आहे. मात्र भर लोकसभेत …

Read More »

मुंबई – सेंट पीटर्सबर्ग सिस्टर सिटीमध्ये सामंज्यस्य करार करारामुळे उभय देशातील मैत्रीसंबंध दृढ होणार- अध्यक्ष राहुल नार्वेकर

भारत – रशियामध्ये राजकीय आणि वैचारिक नाते आहे. याचबरोबर मुंबई आणि सेंट पीटर्सबर्ग या शहराला सिस्टर सिटीची परंपरा लाभली आहे. या सिस्टर सिटी संदर्भात भविष्यात होणाऱ्या सामंजस्य करारामुळे रशिया आणि भारताचे मैत्रीपूर्ण संबंध दृढ होतील असे, विधानसभेचे अध्यक्ष ॲङ राहुल नार्वेकर यांनी सांगितले. विधिमंडळात रशियाच्या शिष्टमंडळाने आज विधानसभेचे अध्यक्ष ॲड. …

Read More »

जयंत पाटील यांची टीका, देशात अमृतकाळ साजरा आणि शेतकरी आत्महत्या करतोय राज्य आणि केंद्र सरकारला लगावला टोला

राज्यात शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या अधिकच वाढत चालल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत सहा शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. एकीकडे देश अमृतकाळ साजरा करतोय तर दुसरीकडे राज्यातील शेतकरी आत्महत्या करतोय असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला लगावला आहे. यासंदर्भात जयंत पाटील यांनी एक ट्विट केले असून यात …

Read More »

भारत-युके उच्च शिक्षणाच्या संधीचे नवे दालन शिक्षण, संशोधन आणि नवोपक्रमात युके- भारत भागीदारीचे होणार सक्षमीकरण

शिक्षण, संशोधन आणि नवोपक्रमात भारत-युके भागीदारीचे सक्षमीकरणाच्या उद्देशाने मुंबई विद्यापीठात उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि ब्रिटीश कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार २१ सप्टेंबर रोजी मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील फिरोजशाह मेहता सभागृहात महाराष्ट्र- युनायटेड किंगडम उच्च शिक्षण परिषद पार पडली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, भारत-युके रोडमॅप २०३० आणि जी-२० नुसार उच्च …

Read More »

मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या भागभांडवलात भरीव वाढ उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

महाज्योती, सारथी, बार्टी यासारख्या संस्थांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये समानता आणण्यासाठी गठित करण्यात आलेल्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारशी मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळालाही लागू करण्याचा आणि न्यायालयाचा कोणताही अडसर नसलेल्या पाच टक्के शैक्षणिक आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, असे …

Read More »

उद्योग कर्जासाठी १० ऑक्टोबरपर्यंत अर्ज करावेत अनुसूचित समाजाच्या वैयक्तिक अर्जदारांनी

सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागांतर्गत अनुसूचित समाजाच्या सामाजिक व आर्थिक विकासाकरिता स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने वैयक्तिक अर्जदारांना उद्योग अथवा व्यवसाय करण्यासाठी कर्ज उपलब्ध केले जाते. मुंबई शहर व उपनगरातील अर्जदारांनी १० ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक अंगद कांबळे यांनी केले …

Read More »

शेतकऱ्यांना मिळणार ‘रासायनिक व सेंद्रीय खते’ मंत्री संदिपान भुमरे यांची माहिती

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत ‘ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे’ या बाबीऐवजी या वर्षी ‘रासायनिक व सेंद्रीय खते देणे’ ही बाब समाविष्ट करण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी दिली. मंत्री संदिपान भुमरे म्हणाले की, भाऊसाहेब फुंडकर फळबाग या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना ठिबक सिंचन …

Read More »

भाजपा खासदाराची मुक्ताफळे, लोकसभेतच बसपाच्या मुस्लिम खासदाराविरोधात निंदनीय वक्तव्ये आंतकवादी, कटवे, भडवे शब्दाचा वापर

दक्षिण दिल्लीतील आणखी एका भाजपा खासदारांकडून भरलोकसभेत संसदेचे विशेष अधिवेशनात बसपा खासदाराच्या विरोधात अंत्यत निंदनीय शब्दांचा वापर केला. तसेच संबधित खासदाराचा नामोल्लेखक केला. परंतु संबधित भाजपा खासदाराला थांबविण्याचे काम पीठासीन अधिकाऱ्याने केले नसल्याची माहिती पुढ आली आहे. विशेष म्हणजे तृणमुल काँग्रेसच्या खासदार मोईना मित्रा यांच्यासह अनेक पक्षाच्या नेत्यांनी तो व्हिडिओ …

Read More »

आयडीबीआय बँकेने अमृत महोत्सव एफडीची मुदत वाढवली ३१ ऑक्टोंबर पर्यंत मुदतीचा कालावधी वाढविला

आयडीबीआय बँकेने अमृत महोत्सव एफडीमधील गुंतवणुकीची मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. बँकेच्या या योजनेत गुंतवणूकदारांना मोठा परतावा मिळेल. आयडीबीआय बँक ४४४ दिवसांच्या अमृत महोत्सव एफडी योजनेत ७.१५ टक्के व्याज दर देत आहेत. ज्येष्ठ नागरिकांना ७.६५ टक्के दराने व्याज मिळत आहे. या एफडीतून मुदतीपूर्वी गुंतवणूककाढण्याची आणि बंद करण्याची परवानगी आहे. आयडीबीआय …

Read More »

बॉण्ड म्युच्युअल फंडातून गुंतवणूकदारांची मोठी विक्री ऑगस्टमध्ये २५,८७२ कोटी रुपये काढले

गुंतवणूकदारांनी गेल्या महिन्यात ऑगस्टमध्ये बाँड म्युच्युअल फंड (डेट म्युच्युअल फंड) योजनांमधून मोठ्या प्रमाणात पैसे काढले आहेत. या कालावधीत गुंतवणूकदारांनी २५,८७२ कोटी रुपये काढले आहेत. गुंतवणूकदारांची सावध वृत्ती आणि अमेरिकेतील सध्याचे व्याजदर डेट म्युच्युअल फंडातून गुंतवणूक काढण्यात आली आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (Amfi) च्या आकडेवारीनुसार, ऑगस्ट महिन्यामध्ये १६ …

Read More »