Breaking News

सणासुदीच्या तोंडावर सोने-चांदीच्या किंमतीत मोठी वाढ जागतिक घडामोडींचा परिणाम सोने-चांदीच्या किंमतींवर; दसरा दिवाळीच्या तोंडावर मोजावे लागणार अधिक पैसे

जागतिक घडामोडींचे परिणाम आता सोने-चांदीवर दिसून येत आहे. मध्य-पूर्वेतील अशांतता, युक्रेन-रशियात १९ महिन्यांपासून सुरु असलेले युद्ध याचा परिणाम आता सोन्या चांदीच्या किमतीवर दिसून येत आहे. त्यामुळे अनेक वस्तू महागण्याची शक्यता आहे. त्यात सोने-चांदीने पहिला क्रमांक लावला आहे. गेल्या आठवड्यात सोने-चांदीच्या किमतीने उच्चांकी झेप घेतली होती. पण मंगळवारी किंमतीत मोठी घसरण …

Read More »

ऑक्टोबर हिट तापदायक, सूर्य ओकणार आग ऑक्टोबर हिटच्या झळा आणखी वाढणार; वाचा कसं असेल हवामान

ऑक्टोबर झाल्यानंतर तापमानाचा ताप अधिक वाढला असून आर्द्रतेमुळे होणारी काहिली, सातत्याने पाणी पिऊनही घशाला पडणारी कोरड अशी अवस्था ऑक्टोबरच्या पहिल्याच पंधरवड्यात अनुभवायला मिळत आहेत. मुंबईमध्ये किंचित कमी तापमान असूनही ताप मात्र अधिक जाणवत होता. मुंबईत सांताक्रूझ येथे कमाल तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरीपेक्षा २.१ अंशांनी अधिक होते. हे तापमान …

Read More »

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ

सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) ४ टक्के वाढवून ४६ टक्के केला आहे. याचा थेट फायदा सुमारे ४८.६७ लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६७.९५ लाख पेन्शनधारकांना होणार आहे. बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. सरकारने दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठी भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या …

Read More »

कच्चे तेल आणि डिझेलच्या निर्यातीवरील विंडफॉल टॅक्स घटवला डिझेलवरील विंडफॉल टॅक्सही कमी

केंद्र सरकारने देशात उत्पादित होणाऱ्या कच्च्या तेलावरील विंडफॉल टॅकल कमी करून ९.०५० रुपये प्रति टन केले. यापूर्वी, २९ सप्टेंबर रोजी संपलेल्या १५ दिवसांच्या आढाव्यात, देशातील क्रूडवरील अनपेक्षित विंडफॉल कर १२,२०० रुपये प्रति टन करण्यात आला होता. डिझेलवरील विंडफॉल टॅक्सही कमी याशिवाय डिझेलच्या निर्यातीवरील विंडफॉल टॅक्स ५ रुपये प्रति लिटरवरून ४ …

Read More »

मुंबई : खिचडी घोटाळ्यात ७ ठिकाणी ईडीची छापेमारी खिचडी वाटपामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा आरोप किरीट सोमैया यांनी केला होता.

मुंबई, 18 ऑक्टोबर : मुंबई महापालिकेच्या खिचडी वाटप घोटाळा प्रकरणी आज, बुधवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शहरात ७ ठिकाणी छापेमारी केली. एकूण १३२ कोटी रुपयांच्या खिचडी घोटाळ्याप्रकरणी खासदार संजय राऊत यांचा मुलगा, मुलगी, आणि अमोल कीर्तिकर यांच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्याचा आरोप खासदार किरीट सोमय्यांनी केला होता. मुंबईतील महापालिकेच्या गरीब …

Read More »

“अँटनी” Antony चा भव्य टीझर १९ ऑक्टोबर रोजी होणार प्रदर्शित चित्रपटाचे नेत्र दिपवणारे चित्रीकरण रेनादिव्ह यांनी केले असून जेक्स बेजॉय यांनी मंत्रमुग्ध करणारे संगीत दिले आहे. तसेच श्याम शशिधरन यांनी संकलन केले आहे आणि आर जे शान यांचे मोलाचे सृजनशील सहकार्य चित्रपटास लाभले आहे.

मुंबई, 18 ऑक्टोबर: ‘अँटनी’ हा चित्रपट अत्यंत विलक्षण असून याआधी चित्रपटाच्या फर्स्ट लूक पोस्टरला चित्रपट रसिक आणि समीक्षकांकडून प्रचंड प्रशंसा मिळाली आहे. प्रतिभावान चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक जोशी यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात अष्टपैलू पुरस्कार विजेता अभिनेता जोजू जॉर्ज आहे, तसेच कल्याणी प्रियदर्शन, चेंबा विनोद जोस आणि नायला उषा …

Read More »

मराठी सिनेसृष्टीला मिळाला नवा सृजनशील संगीतकार रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्याच्या वाटचालीत असणारा संगीतकार 'ऋषी.बी' आपल्या शब्दांनी आणि स्वरांनी महाराष्ट्रातल्या मनामनाचा ठाव घेण्यासाठी सिनेसृष्टीत जोमाने पदार्पण करत आहे.

मुंबई, 18 ऑक्टोबर  संगीत म्हटलं की स्वर आणि ताल यांचं विलक्षण मिश्रण आणि सृजनशील मिश्रण करणारे संगीतकार नेहमीच प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण करत असतात. असाच एक संगीतकार ज्याने ‘थाटामाटात’ ‘माझ्या गोविंदा रे’ ‘ट्रिंग ट्रिंग’ सारख्या गीतांना स्वर आणि ताल देऊन लयबध्द केले तो म्हणजे ‘ऋषी.बी’. रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य …

Read More »

महायुती सरकारमधील कोणत्या मंत्र्यांचा आशीर्वाद पाटीलला होता? विजय वडेट्टीवार यांचा सवाल आरोपीला पळायला कोणी मदत केली होती? काँग्रेसने उपस्थित केला सवाल

ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्करीचा आरोप असलेला पळून गेलेला आरोपी ललित पाटील याला १५ दिवसांचा कालावधी होऊन देखील पोलिसांना शोध लागत नव्हता. अखेर ललित पाटील याला अटक करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. यामुद्यावरून विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काही सवाल उपस्थित करत सरकारवर टिकेची झोड उठवली आहे. …

Read More »

दिव्यांगांच्या सेवेसाठी महामंडळाचे बळकटीकरण करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक संपन्न

राज्यातील दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी करण्यासाठी ६६७ हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकानांची खरेदी करण्यास तसेच महामंडळाच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मान्यता दिली, दरम्यान, दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ देऊन त्यामाध्यमातून त्यांची सेवा करण्याकरिता कार्यरत दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे बळकटीकरण करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी अत्यंत चांगली परिस्थिती; जयंत पाटलांचे सुतोवचन फुटून गेलेल्या आमदारांपैकी अनेक जण संपर्कात आहे. परत घ्यायचं की नाही त्याबाबत पवार साहेब निर्णय घेतील

राष्ट्रवादी काँग्रेसचे गेल्या अनेक वर्षांपासून ज्या मतदारसंघात निवडणूक लढत आहे. तसेच ज्या मतदारसंघांमध्ये निवडून आलेले आहे. त्या मतदारसंघाचा आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघनिहाय आढावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या उपस्थितीत आज घेण्यात आला आहे. कोल्हापूर, जळगाव, पुणे, सातारा, सोलापूर या जिल्ह्य़ात लोकसभा मतदारसंघाचा आढावा आज घेण्यात …

Read More »