आरोग्य विभाग भरती

खुशखबर! आरोग्य विभाग भरती प्रक्रिया सुरू… आरोग्य विभागात ११ हजार पदं भरली जाणार आहेत. भरतीप्रक्रियेसाठी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आरोग्य विभाग भरती ही माहिती दिली

गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या आरोग्य विभागातील जवळपास ११ हजार पदांसाठीची जाहिरात आज आली आहे. राज्यातील आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया ही गेल्या तीन वर्षांपासून रखडली होती. आरोग्य विभाग ग्रुप क आणि ग्रुप ड या दोन विविध जिल्ह्यांच्या जाहिराती आज म्हणजेच मंगळवारी प्रसिद्ध झाल्या आहेत. या भरती अंतर्गत गट क’ संवर्गात परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्यसेवक, आस्थापनेवरील पदे यामध्ये लिपिक, टंकलेखक, वाहनचालक यासारख्या पदांचा समावेश आहे. तर ‘गट ड’ संवर्गात शिपाई, सफाई कामगार, कक्षसेवक यासारख्या पदांचा समावेश आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया २९ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी ३.०० पासून सुरु होत आहे, तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ सप्टेंबर २०२३ आहे.

Maharashtra Health Department Recruitment 2023 : येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात नोकरीच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या पाठोपाठ आरोग्यमंत्री तानाजी सांवत यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्याच्या शिक्षण खात्यानंतर आता आरोग्य विभागात मेगा भरती होणार आहे. उद्यापासून भरती होणार असल्याची मोठी घोषणा आरोग्यमंत्री तानाजी सांवत यांनी केली आहे.

आरोग्य विभागात ११ हजार पदांची भरती

राज्याचा आरोग्य विभागत उद्यापासून भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. आरोग्य विभागात  ११ हजार पदांची मेगा भरती होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री तानाजी सांवत यांनी दिली. गेल्या अनेक दिवसांपासून आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया रखडली आहे. राज्याच्या आरोग्य खात्यात अनेक पदे रिक्त आहेत. याचा परिणाम आरोग्य विभागावर होत असल्याचा आरोप केला जात आहे. यामुळेच सरकारने तातडीने आरोग्य विभागात 11000 पदांची मेगा भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

आरोग्य विभाग भरती  ‘क’ आणि ‘ड’ श्रेणीतील पद भरली जाणार

‘क’ आणि ‘ड’ श्रेणीतील  हजार पदासाठी ही जाहिरात काढली जाणार आहे. रिक्त जागा एमपीएससी, राज्य निवड मंडळ आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्यामार्फत भरल्या जाणार आहेत. गट क’ संवर्गात परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्यसेवक, आस्थापनेवरील पदे यामध्ये लिपिक, टंकलेखक, वाहनचालक यांसारख्या पदांचा समावेश असेल. तर ‘गट ड’ संवर्गात शिपाई, सफाई कामगार, कक्षसेवक यांसारख्या पदांचा समावेश आहे.

ठाण्यात रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर आरोग्य खात्याच्या भरती प्रक्रियेला वेग

ठाण्यातील कळवा येथील सरकारी रुग्णालयात 10 पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. रुग्णलयात पुरेशे मनुष्यबळ नसल्यामुळे ही घटना घडल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेनंतर सरकारला जाग आल्यानंतर भरती प्रक्रियेला वेग आला आहे.

About Marathi E Batmya

Check Also

प्रकाश आबिटकर यांचे निर्देश, हिमोफिलीया उपचारासाठी एका महिन्यात समिती स्थापन करा राज्यात ५ हजार ४९७ रुग्णांची नोंद; प्रत्येक जिल्ह्यात डे-केअर सेंटर कार्यान्वित

हिमोफिलीया रुग्णांचे ऑनलाईन पोर्टल द्वारे ट्रॅकिंग करून त्यांना देण्यात येणाऱ्या उपचाराची  अद्ययावत नोंद ठेवावी तसेच एका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *