Breaking News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे का राजीनामा देतील? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मांडली भूमिका सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर सविस्तर भूमिका मांडली

सर्वोच्च न्यायालय उद्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील निकाल देणार असल्याचे स्पष्ट संकेत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड यांनी दिले. त्यानंतर न्यायालय काय निर्णय देणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यातच विविध पक्षांकडून आणि कायदेतज्ञांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अपात्र ठरतील आणि आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतील असे भाकित वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर …

Read More »

आदित्य ठाकरे यांची मागणी, महापालिकेतील रस्ते घोटाळ्याची लोकायुक्तांकडून चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

मुंबई महानगरपालिकेत गेल्या सहा-सात महिन्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. रस्त्यांच्या कामांमध्ये मोठा घोटाळा झाला आहे. त्याची तक्रार करूनही महापालिकेच्या प्रशासकांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे राज्यपालांनी याप्रकरणी गंभीर दखल घेऊन मुंबईतील रस्ते घोटाळा व अन्य भ्रष्टाचाराची लोकायुक्तांकडून चौकशी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे नेते, आमदार …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश, अंमली पदार्थ विरोधी ‘मिशन थर्टी डेज’ मोहिम राबवा ड्रग्ज्स फ्री मुंबई’साठी धडक मोहिम

मुंबई अंमली पदार्थ मुक्त करण्याची धडक मोहिम हाती घेण्यात आली आहे. गेल्या दहा दिवसात सुमारे ७ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून गेल्या आठवडाभरात मुंबई पोलिसांनी विविध ठिकाणांहून ३५० पेक्षा अधिक जणांना अटक केली आहे. या मोहिमेला अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी ‘मिशन थर्टी डेज’ मोहिम हाती घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री …

Read More »

कंत्राटदारांनी कर्मचाऱ्यांची थकीत पीएफ रक्कम जमा न केल्यास थेट बेस्टवर कारवाई करा कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांचे आदेश

नियुक्त कंत्राटदारांने बेस्टच्या आस्थापनेकडून कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी प्राप्त झालेल्या रकमेतून नियमानुसार कर्मचाऱ्यांच्या पीएफ-भविष्य निर्वाह निधीची रक्कम जमा केली नसल्याने मुख्य आस्थापना म्हणून बेस्टने महिन्याभरात ही रक्कम भविष्य निर्वाह निधी कार्यालयात जमा करावी, असे निर्देश कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांनी आज येथे दिले. मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन उपक्रम (बेस्ट), व्यवस्थापनेचे …

Read More »

उद्या सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल? राज्यपालांचा ‘तो’ निर्णय की, नबाम रेबियाच्या निर्णयाची पुर्नरावृत्ती राज्यपालांची पत्रे अद्यापही त्यांच्या वैयक्तिक कस्टडीत

राज्यात महाविकास आघाडी सरकार पासून विधिमंडळातील शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील १६ जणांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतून वेगळे होत भाजपाच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन केले. विशेष म्हणजे या सगळ्या घडामोडीत राज्यपालाचे कार्यालय हे केंद्रस्थानी राहिले होते अशी चर्चा सुरु झाली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या ठाकरे गटाने …

Read More »

चर्चगेट ते विधानभवन मेट्रो-३ भुयारी मार्गाची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी: जाणून घ्या प्रकल्पाची स्थिती मेट्रो रेल्वे खऱ्या अर्थाने मुंबईची जीवनरेषा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सर्वोत्तम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असणे गरजेचे आहे. मेट्रो रेल्वेच्या माध्यमातून मुंबईकरांची ती गरज पूर्ण होणार आहे. सध्या मेट्रो-३ हा मार्ग जवळपास ९० टक्के पूर्ण झाला असून येत्या डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत मेट्रो रेल्वेचा हा टप्पा पूर्ण होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मंगळवारी रात्री …

Read More »

रिकाम्या भूखंडावर इमारती किंवा टाऊनशीप उभी करताय तर नवे नियम माहित आहेत का? आता जमिन लेव्हल पेक्षा जास्त खोदकाम कराल तर त्याची गौण खनिज संपत्ती कर भरावा लागणार महसूल विभागाकडून नवा आदेश जारी

देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात नागरीकरणाचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे ग्रामीण भागात राहणारी जनता मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या निमित्ताने शहरांमध्ये स्थलांतरीत होत आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्राला अद्यापही चांगले दिवस आहे. याच पार्श्वभूमीवर एखाद्या रिक्त भूखंडावर किंवा शेत जमिनीवर इमारती उभारण्याचे आणि टाईनशीप प्रकल्प राबविण्याकडे नागरिकांचा कल वाढत आहे. मात्र या इमारती-टाऊनशीप उभारताना जमिन …

Read More »

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक न्यायालयातून अटक करून नेतानाचा व्हिडिओ व्हायरल

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ (पीटीआय) पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. इस्लामाबाद न्यायालयाबाहेर ही कारवाई करण्यात आली. इम्रान खान यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. या प्रकरणी न्यायालयात हजर राहिल्यानंतर पोलिसांनी अटकेची कारवाई केली. पीटीआयने जारी केलेल्या व्हिडीओत पोलीस इम्रान खान यांना न्यायालयाबाहेरून अटक करून …

Read More »

शरद पवार म्हणाले, भाजपात आदेश देण्याची संस्कृती; बिच्चारे शिंदे कर्नाटक निवडणूकीसाठी मुख्यमंत्री शिंदे दौऱ्यावर गेले त्यावर शरद पवारांची उपरोधिक टीका

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी १० मे रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीत महाराष्ट्रातील नेत्यांनीही प्रचार केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा सोमवारी ८ मे कर्नाटकात प्रचाराला गेले होते. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे. केंद्रातून जो आदेश येतो, तो बिचाऱ्या शिंदेंना पाळावा लागतो, …

Read More »

मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे आदेश, बेस्टची बस सेवा नवी मुंबई ते कफ परेड सुरू करा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिरात १३२ तक्रारींचे निराकरण

बेस्टची बस सेवा नवी मुंबई ते कफ परेड सुरू करावी अशी मागणी लक्षात घेता याबाबत स्थानिक प्रशासनाने कार्यवाही करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले. फोर्ट येथील मुंबई महापालिकेच्या ए वॉर्ड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (सरकार आपल्या दारी) कार्यक्रमात महिला व बालविकास मंत्री …

Read More »