पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक न्यायालयातून अटक करून नेतानाचा व्हिडिओ व्हायरल

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ (पीटीआय) पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. इस्लामाबाद न्यायालयाबाहेर ही कारवाई करण्यात आली. इम्रान खान यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. या प्रकरणी न्यायालयात हजर राहिल्यानंतर पोलिसांनी अटकेची कारवाई केली.

पीटीआयने जारी केलेल्या व्हिडीओत पोलीस इम्रान खान यांना न्यायालयाबाहेरून अटक करून पोलीस गाडीत नेताना दिसत आहेत. हा व्हिडीओ ट्वीट करताना पीटीआयने म्हटलं, ज्याला त्याच्या जीवापेक्षाही तुमच्या स्वातंत्र्याची काळजी आहे त्याच्यासाठी घराबाहेर पडा.

पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ (पीटीआय) पक्षाच्या वकील मुसरत चीमा यांनीही इम्रान खान यांच्या अटकेला दुजोरा दिला आहे. पीटीआयने वकिलांचा व्हिडीओ ट्वीट करत याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. यात वकील मुसरत यांनी इम्रान इस्लामाबाद न्यायालयाबाहेर जखमी झाल्याचा आरोप केला आहे.

वकील मुसरत यांनी इस्लामाबाद न्यायालयाबाहेरच व्हिडीओ शूट केला आणि घाबरलेल्या स्थितीत म्हणाल्या, इम्रान खान यांना मारहाण होत आहे, अत्याचार होत आहे. त्यांनी इम्रान खान यांचं काय केलं हे मला माहिती नाही.

About Editor

Check Also

भाजपाच्या डिलीमिटेशन विधेयकाच्या पाठिंब्यासाठी राष्ट्रवादीचा कोणता नेता आग्रहीः शरद पवार तर रुग्णालयात दाखल राष्ट्रवादी पक्षाचा ताबा मिळविण्यासाठी ही खटपट सुरु असल्याची कार्यकर्त्यांमध्ये चर्चा

राज्यात सत्तेची ताकद राखण्यासाठी शिवसेना उबाठामध्ये भाजपाने तोडफोड केली. त्यानंतर शिवसेना फोडताना जी पद्धत वापरण्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *