पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक न्यायालयातून अटक करून नेतानाचा व्हिडिओ व्हायरल

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ (पीटीआय) पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. इस्लामाबाद न्यायालयाबाहेर ही कारवाई करण्यात आली. इम्रान खान यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. या प्रकरणी न्यायालयात हजर राहिल्यानंतर पोलिसांनी अटकेची कारवाई केली.

पीटीआयने जारी केलेल्या व्हिडीओत पोलीस इम्रान खान यांना न्यायालयाबाहेरून अटक करून पोलीस गाडीत नेताना दिसत आहेत. हा व्हिडीओ ट्वीट करताना पीटीआयने म्हटलं, ज्याला त्याच्या जीवापेक्षाही तुमच्या स्वातंत्र्याची काळजी आहे त्याच्यासाठी घराबाहेर पडा.

पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ (पीटीआय) पक्षाच्या वकील मुसरत चीमा यांनीही इम्रान खान यांच्या अटकेला दुजोरा दिला आहे. पीटीआयने वकिलांचा व्हिडीओ ट्वीट करत याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. यात वकील मुसरत यांनी इम्रान इस्लामाबाद न्यायालयाबाहेर जखमी झाल्याचा आरोप केला आहे.

वकील मुसरत यांनी इस्लामाबाद न्यायालयाबाहेरच व्हिडीओ शूट केला आणि घाबरलेल्या स्थितीत म्हणाल्या, इम्रान खान यांना मारहाण होत आहे, अत्याचार होत आहे. त्यांनी इम्रान खान यांचं काय केलं हे मला माहिती नाही.

About Editor

Check Also

कर्नाटकच्या मंत्र्यांनाच सुट्टे पैसे नसल्याने बसमधून खाली उतरण्यास बस कंडक्टरने सांगितले प्रवाशांच्या दैंनदिन अनुभवाचा घेतला प्रत्यक्ष अनुभव

कर्नाटकचे परिवहन मंत्री बायराथी सुरेश यांनी केलेली अचानक तपासणी (सरप्राईज इन्स्पेक्शन) त्यांच्यासाठीच एक ‘वास्तविकतेची जाणीव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *