‘बिग बॉस’ फेम उर्फी जावेद परिधान करत असलेल्या तोकड्या कपड्यांच्या मुद्द्यावरून भाजपा नेत्या चित्रा वाघ आक्रमक झाल्या आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांकडे उर्फी जावेदवर कारवाई करण्याची मागणी केली. यावरून चित्रा वाघ यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना लक्ष्य केलं होतं. मुंबईतल्या भर रस्त्यात उर्फीच्या या शरीरप्रदर्शनाचं जे अतिशय बिभत्स आहे. …
Read More »मुंबई व महाराष्ट्राचे महत्व कमी करण्यासाठी योगी आदित्यनाथांना पायघड्या धर्माचे राजकारण करण्याऱ्या योगी आदित्यनाथ यांच्या राज्यात कोण गुंतवणूक करेल? !:- नाना पटोले
महाराष्ट्र देशातील प्रगत राज्य असून मुंबई हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शहर आहे. मुंबई व महाराष्ट्राचे महत्व कमी करणे हे भाजपाचे षडयंत्र असून गुजरातला उद्योग पाठवल्यानंतर आता भाजपाशासित उत्तर प्रदेशमध्ये महाराष्ट्रातील गुंतवणूक पाठवण्याचा कुटील डाव आहे. केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर महाराष्ट्रातील ईडी सरकार काम करत असून त्याचाच एक भाग म्हणून गुंतवणुकीच्या नावाखाली उत्तर …
Read More »राज्यातील नवतरूण मतदारांमध्ये १२.८४ टक्क्यांची तर सर्वाधिक वाढ ३०-३९ वयोगटात केंद्रीय निवडणूक आयोगाचे राज्य मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे यांची माहिती
आगामी सार्वत्रिक आणि विधानसभा निवडणूकीच्यादृष्टीने केंद्रीय निवडणूक आयोगाकडून नवमतदारांची नोंदणी, मतदार यादीतील दुबार नावे डिलीट करण्याची मोहिम सुरु केली. त्याशिवाय सध्या लोकसभा मतदार संघापूरती मर्यादीत असलेली ही मोहिम आता विधानसभा मतदारसंघातही सुरु करणार असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली. मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघात आयोजित पत्रकार …
Read More »शिंदे-फडणवीस सरकारची खेळीः आश्वासन देत संप मिटविला, मात्र ६ महिन्यासाठी घातली बंदी वीज कर्मचाऱ्यांना मेस्मा कायद्यातंर्गत पुढील ६ महिने आंदोलन करण्यास बंदी
वीज कंपनीचे खासगीकरण करणार नसल्याचे आश्वासन देत संप संपुष्टात आणला, मात्र वीज कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी संप मागे घेताच, शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील वीज कर्मचाऱ्यांना मेस्मा कायदा लागू करत पुढील ६ महिने कोणत्याही प्रकारचे आंदोलन करण्यावर बंदी घातली. विशेष म्हणजे संपकरी वीज कर्मचाऱ्यांबरोबर चर्चा झाल्यानंतर रात्री उशीराने यासंदर्भातील अध्यादेश उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री …
Read More »मुंबईच्या विशेष पोलिस आयुक्त पदी देवेन भारती, गृह खात्याची नव पद निर्मिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या आदेशान्वये नियुक्ती
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थानापन्न झाल्यानंतर पहिल्या तीन महिन्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मुंबई पोलिस आयुक्तावर कोणाची नियुक्ती करावी यावरून वाद झाल्याची चर्चा सुरु झाली. या वादाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अचानकपणे आपल्या साताऱ्यातील मूळ गावी गेल्याची माहिती पुढे आली होती. त्या …
Read More »मुंबईला विशेष पोलीस आयुक्त नेमून समांतर प्रशासन चालवण्याचा फडणवीसांचा प्रयत्न राजकीय महत्वाकांक्षेपोटी प्रशासकीय यंत्रणेचे वाट्टोळे करु नका-अतुल लोंढे
मुंबई पोलीस दलात आयुक्त हेच सर्वोच्च पद असताना विशेष पोलीस आयुक्त नेमून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली स्वतःची वेगळी यंत्रणा उभी करण्याचा प्रयत्न चालवला आहे. आपल्या राजकीय महत्वाकांक्षेपोटी शिस्तीचा प्रशासकीय विभाग असलेल्या पोलीस दलात मोडतोड करून विशेष पोलीस आयुक्त नियुक्त करणे चुकीचे आहे, अशी विशेष नेमणुक करून देवेंद्र फडणवीस हे …
Read More »अजित पवारांचे समर्थन करणाऱ्यांना बाळासाहेब ठाकरेंचे नाव लिहिण्याचा अधिकार नाही भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका
छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते असे म्हणणाऱ्या विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे समर्थन सामनाने केले. मतांच्या राजकारणासाठी हिंदुत्वाशी तडजोड करणाऱ्या सामनात हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव लिहिण्याचा अधिकार नाही अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी पालघर येथे केली. पालघर जिल्ह्याच्या संघटनात्मक प्रवासात असताना पत्रकार परिषदेत …
Read More »देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, या मागण्यांवर एकमत, वीज कर्मचाऱ्यांचा संप मागे ४० हजार कर्मचारी पुन्हा कामावर हजर होणार
राज्यातील ८६ हजार कर्मचारी, अभियंते व अधिकारी तसेच ४० हजाराच्या वर कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांनी ३.१.२०२३ रोजीच्या मध्यरात्री पासून ३१ कामगार संघटना ७२ तासाच्या संपावर गेले होते. संपकऱ्यांच्या प्रतिनिधीशी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक चर्चा केल्यानंतर लेखी स्वरूपात कार्यवृत्त दिल्यानंतर संप मागे घेण्यात आला. राज्यातील विज …
Read More »मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, कवाडेंचा लाँग मार्च योग्य ठिकाणी येऊन थांबला अखेर गटाची कवाडेंच्या पीआरपीसोबत युती बाळासाहेबांची शिवसेनेशी युती
शिवसेना उद्धव ठाकरे गटासोबत वंचित बहुजन आघाडीची चर्चा सुरु असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना आणि प्रा जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वखालील पीपल्स रिपब्लिकन पक्षाची अर्थात पीआरपी आज युती झाल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पीआरपीचे प्रमुख प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेत केली. मंत्रालयासमोरील बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार …
Read More »अजित पवार म्हणाले, मी युक्तीवाद करणार नाही विरोधी पक्षनेते पद भाजपाने नव्हे तर राष्ट्रवादीने दिले
हिवाळी अधिवेशन काळात संभाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरून अधिवेशन संपताच भाजपाने अजित पवार यांना लक्ष्य करत त्यांच्या वक्तव्याच्या विरोधात राज्यभर आंदोलन केले. त्याचबरोबर भाजपाकडून अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणीही केली. या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काल मंगळवारी वाद संपविण्याचे आवाहन पत्रकार परिषदेत केले. त्यानंतर आज बुधवारी विरोधी …
Read More »
Marathi e-Batmya