राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना शिवसेनेचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर साई रिसॉर्ट प्रकरणी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी आरोप केले. त्यानंतर ईडीने अनिल परब यांची दोन ते तीन वेळा चौकशी केली. परंतु त्यांच्यावर अटकेची कारवाई झाली नाही. अखेर आज ईडीने अनिल परब यांची साई रिसॉर्टसह १० कोटी २० लाख …
Read More »अजित पवार म्हणाले,… पण आजही मी स्वराज्य रक्षक भूमिकेवर ठाम महापुरुषांचा अवमान करणाऱ्या राज्यपालांसह भाजपाच्या वाचाळवीरांना वाचविण्यासाठी आंदोलनाचे षडयंत्र...
‘स्वराज्यरक्षक’ छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भात मी कोणतंही वादग्रस्त विधान केलेले नाही. ‘स्वराज्यरक्षक’ ही संकल्पना व्यापक, सर्वसमावेशक, छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला ती शोभणारी आहे, त्यामुळे स्वराज्यरक्षक या भूमिकेवर मी आजही ठाम आहे. सातत्याने महापुरुषांचा अवमान करणाऱ्या राज्यपालांसह भाजपाच्या वाचाळवीरांना वाचविण्यासाठी, त्यांच्या बेतालपणापासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजपाकडून माझ्याविरोधात आंदोलनाचे षडयंत्र रचण्यात …
Read More »नाना पटोले यांचा आरोप, धारावी प्रकल्पानंतर वीज कंपनीही अदानीच्या घशात शिंदे-फडणवीस सरकारने महाराष्ट्रच विक्रीस काढला आहे का ?
महावितरण कंपनीवर खाजगी कंपन्यांचा डोळा असून या कंपनीचे खाजगीकरण होऊ नये म्हणूनच राज्यातील वीज कंपन्यांचे कर्मचारी संपावर गेले. महावितरण ही महत्वाची तसेच फायद्यात असलेली कंपनी अदानीसारख्या खाजगी उद्योगपतीच्या घशात घालण्याचा शिंदे-फडणवीस सरकारचा डाव आहे. महावितरणचे खाजगीकरण सुलभ व्हावे यासाठीच अंबानी-अदानीच्या मुलांची राज्याच्या आर्थिक सल्लागार मंडळावर निवड केल्याचे दिसत असून शिंदे-फडणवीस …
Read More »वीज कंपनी वाचविण्यासाठी कर्मचारी रस्त्यावर तर संचालक म्हणतात महावितरण गरज लागणार नाही भाजपा पदाधिकारी आणि एमएसईबी संचालकाची मुक्ताफळे
कोविड काळात झालेले आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी नरेंद्री मोदी सरकारने केंद्र सरकारच्या मालकीच्या आणि फायद्यातील कंपन्या विकायला सुरुवात केलेली आहे. त्याचधर्तीवर राज्यातील सरकारी वीज कंपनी आता तोट्यात असल्याचे कारण पुढे करत भाजपा समर्थक असलेल्या गौतम अदानी यांच्या अदानी इलेक्ट्रीकल्स कंपनीला मुंबई उपनगरासह राज्यात वीज पुरवठ्याचा ठेका देण्याच्या हालचाली सुरु आहेत. …
Read More »भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणाले, आमच्या त्यांना शुभेच्छा चुकीने ३ जागा कमी सांगितल्या
मागील दोन दिवसांपासून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यांनी लोकसभेच्या ४५ तर लोकसभेच्या २०० जागा जिंकण्याचा संकल्प जाहिर केला. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या समन्वयाने लोकसभेत घवघवीत यश मिळवू अशी घोषणाही नड्डा यांनी केली. नड्डा यांच्या या घोषणेबद्दल आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार …
Read More »शेतजमिनीचा वाद सोडविण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने आणली ‘सलोखा योजना’ शेतजमिन अदलाबदल करण्यासाठी फक्त एक हजार रूपये मुद्रांक शुल्क
राज्यातील अर्ध्याहून अधिक भागात शेतजमिनीच्या ताब्यावरून आणि वहिवाटीवरून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांमध्ये वाद आहे. या वादामुळे अनेक वेळा खून किंवा मारामाऱ्या तर कधी कोर्टकज्जे आदी होत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी बघायला मिळते. यापार्श्वभूमीवर राज्यातील बांधाला बांध लागून असलेल्या शेतकऱ्यांमधील वाद मिटावा या उद्देशाने राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने ‘सलोखा योजना’ जाहीर केली. शेतकर्यांमध्ये …
Read More »धर्मवीर की स्वराज्यरक्षक ? वादावर शरद पवारांचे महत्वपूर्ण विधान ठाण्यात जातो तेव्हा धर्मवीर म्हणून काही नेत्यांची नावे पुढे येतात
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नसून स्वराज्यरक्षक असल्याचा उल्लेख विधानसभेत केला. त्यानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले. भाजपाने आक्रमक पवित्रा घेत राज्यभर आंदोलन सुरु केले आहे. दोन दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी आंदोलन होत आहेत. दरम्यान स्वतः अजित पवार हे दोन दिवसांपासून कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात किंवा माध्यमांसमोर …
Read More »संजय राऊत यांची टीका, टोळी गँगवारमध्ये किंवा पोलिस एनकाऊंटरमध्ये मारले जातात शिंदे गट एक टोळी असल्याने त्यांना स्वतंत्र अस्तित्व नाही
हिवाळी अधिवेशनानंतर राज्यातील राजकिय वातावरण काही काळ शांत राहिल असे वाटत असतानाच भाजपाने संभाजी महाराजांबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून राजकिय वातावरण गरम करण्याचा प्रयत्न सुरु केला. त्यात आज शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आणखीनच भर घालत राजकिय वातावरण चांगलेच तापविले. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे …
Read More »सुषमा अंधारे यांचा चित्रा वाघ यांना सवाल, मग यांना मारहाणीची भाषा कराल का? कंगना राणावत, केतकी चितळे, अमृता फडणवीस यांचे फोटो शेअर करत केला सवाल
मॉडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेद हीच्या चित्र-विचित्र फॅशनवरून भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी नुकतीच उर्फी हिच्यावर टीकेची झोड उठवत तीला थोबडविण्याची धमकी दिली. त्यास प्रत्युत्तर म्हणून उर्फी जावेद हीनेही चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर दिले. त्यामुळे या दोघांमध्ये वाद निर्माण झाल्याचे चित्र पहायला मिळात असताना शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी या …
Read More »काँग्रेसची टीका, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मोदी सरकारने गरिबांच्या तोंडचा घास हिरावला रेशनच्या धान्यात ५०% कपात करून गरिबांना नवीन वर्षाची ‘अनोखी भेट’
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबांच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत गरिबांना अतिरिक्त ५ किलो अन्नधान्य पुरवणारी प्रधानमंत्री गरीब अन्न कल्याण योजना मोदी सरकारने बंद केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून ८१ कोटी गरिबांना महिन्याला १० किलो धान्य मिळत होते परंतु आता फक्त ५ किलोच …
Read More »
Marathi e-Batmya