स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आणि महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांना ५० वर्षे पूर्ण झाली असून या विद्यापीठांनी आतापर्यंत केलेली वाटचाल व त्यांची संशोधने ही शेतक-यांपर्यंत पोहोचली पाहिजेत, यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेत १ जानेवारी ते ५ जानेवारी, २०२३ या कालावधीत सिल्लोड (जि. औरंगाबाद) येथे राज्यस्तरीय सिल्लोड कृषी महोत्सव -२०२३ चे आयोजन केले आहे. राज्यातील कृषी विद्यापीठांनी केलेले …
Read More »सोमय्या पिता-पुत्राच्या क्लीनचिटनंतर संजय राऊत म्हणाले, हिशोब केला जाईल.. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दिली माहिती
भारतीय नौदलाची युध्दनौका आयएनएस विक्रांत सैन्यदलातून निवृत्त करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यानंतर भाजपाचे खासदार किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांनी विक्रांत खरेदी करून त्याचे स्मारकात रूपांतर करण्यासाठी मुंबईत निधी गोळा केला. या निधीप्रकरणी मुंबई पोलिसांनी शिवसेनेच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद केला. मात्र निधी अपहार प्रकरणी सोमय्यांच्या विरोधात कोणतेही …
Read More »मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, अमेरिकेची सिलिकॉन व्हॅली महाराष्ट्राच्या आयटी क्षेत्राला जोडणार मुंबई ते सॅनफ्रान्सिस्को थेट विमानसेवेचा शुभारंभ
मुंबई ते सॅनफ्रान्सिस्को थेट विमानसेवेमुळे महाराष्ट्रातील औद्योगिक आणि पर्यटन क्षेत्राला चालना मिळणार आहे. थेट सेवेमुळे अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली मुंबई, पुणे शहराला जोडली जाणार असून त्याचा महाराष्ट्रातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला मोठा लाभ होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. एअर इंडियाच्या मुंबई ते सॅनफ्रान्सिस्को थेट विमानसेवेचा शुभारंभ केंद्रीय नागरी …
Read More »नाना पटोलेंचा सवाल, गुजरातच्या मुंद्रा बंदरात हजारो टन ड्रग्ज राजरोस कसे येतात? देशातील तरुणपिढीला नशेच्या आहारी घालवण्याचे भाजपा सरकारचे षडयंत्र
भारताकडे तरुणांचा देश म्हणून पाहिले जात असून १६ ते ४० वयोगटातील देशातील लोकसंख्या ५० टक्के आहे, ही तरुणपिढी देशाचे भवितव्य आहे. देशाचे भवितव्य असेलली ही पिढीच नशेखोर बनत असून देशातील १० ते १७ वयोगटातील दीड कोटी मुले व्यसनाधीन असल्याचे प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केल्याने त्याची दाहकता किती आहे …
Read More »दोन्ही मुख्यमंत्र्यांबरोबरील बैठकीनंतर अमित शाह म्हणाले,.. तोपर्यंत कोणीही बोलणार नाही पंचसूत्री वापर करत दोन्ही राज्याच्या मिळून सहा मंत्र्यांची समिती प्रश्न सोडवेल
मागील काही दिवसांपासून कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडून महाराष्ट्राच्या विरोधात सातत्याने विधाने करत महाराष्ट्रातील काही भागांवर दावा केला. तसेच महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्लेही झाले. यापार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री बोम्मई यांच्या विरोधात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर आज अमित शाह यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि महाराष्ट्राचे …
Read More »जयंत पाटील म्हणाले, समृध्दीचा रस्ता चांगलाच, मग विमानही आहेच की… ५२० किमीच्या मार्गासाठी इतका टोल सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर
समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नागपूरमध्ये झाले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. नागपूर ते शिर्डी असा पहिला टप्पा आता नागरिकांसाठी खुला करण्यात आला. मात्र, या महामार्गासाठी भरावा लागणारा टोल चर्चेचा …
Read More »प्रेतयात्रा काढण्यावरून सुषमा अंधारे म्हणाल्या, मी एकाही राजकिय पक्षाची क्षमा…. आळंदीत प्रतिकात्मक काढली प्रेतयात्रा
शिवसेना ( ठाकरे गट ) नेत्या सुषमा अंधारे यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून सुषमा अंधारेंनी हिंदू देवी-देवतांना आणि साधु संतांबद्दल करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यावरून महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ आक्रमक झाला आहे. वारकरी महामंडळाकडून सुषमा अंधारेंविरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आल्याची माहिती …
Read More »महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांना २ जानेवारीपासून प्रारंभ क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन
महाराष्ट्र राज्य ऑलम्पिक क्रीडा स्पर्धांना २ जानेवारी २०२३ पासून शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे, बालेवाडी, पुणे येथून सुरूवात होणार आहे. क्रीडा प्रकारानुसार राज्यातील निवडक शहरांच्या ठिकाणी या स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून या स्पर्धांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांकरिता खेळाडूंना उत्तम कामगिरी करण्याची संधी मिळणार असल्याचे प्रतिपादन क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांनी …
Read More »चंद्रकांत पाटील यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा भारतीय बौद्ध महासभेची मागणी
छत्रपती शिवाजी महाराज ,महात्मा जोतीराव फुले ,डॉ बाबासाहेब आंबेडकर इत्यादी महापुरुषांबाबत अपमान कारक वक्तव्ये काही राजकीय व्यक्ती, सरकारचे प्रतिनिधी, मंत्री इत्यादी मात्तबर लोक करत असून त्यामुळे समाजातील वातावरण बिघडविन्याचे काम होत आहे. चंद्रकांत पाटील यांनी महात्मा जोतिराव फुले,डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागितली असे अपमानकारक शब्द वापरून या महापुरुषांचा अपमान केल्याने त्यांच्यावर अँट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा आणि …
Read More »प्रकाश आंबेडकर म्हणाले, इंदू मिलमधील स्मारकातील पुतळ्याला विरोध डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्राचा समावेश
दादर येथील इंदू मिलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक होत आहे. मात्र या स्मारकात सर्वाधिक उंच पुतळा असावा ही जनतेची मागणी नव्हे तर काँग्रेसची आहे. तसेच स्मारकातील पुतळ्याला आपला विरोध असून स्मारकात पुतळ्याऐवजी आंबेडकरांचा वैचारिक वारसा सांगणारे ऑक्सफर्ड आणि बॉन सारख वैचारीकतेची देवाण-घेवाण करणारी संस्था असावी असे भूमिका वंचित …
Read More »
Marathi e-Batmya