नागरिकांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी लोकप्रतिनिधींची गरज असते. त्यांच्या माध्यमातून आवाज उठविला जातो. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लवकर होणे आवश्यक असल्याचे सांगत सध्या ज्या सुविधा महापालिकेकडून नागरिकांना देणे गरजेचे आहे, त्या सुविधा बांधकाम व्यावसायिक पैसे घेऊन नागरिकांना देत आहेत. त्यामुळे शहरे महापालिका नाही तर बांधकाम व्यावसायिक चालवित असल्याची मत महाराष्ट्र …
Read More »जी – 20 परिषदेच्या माध्यमातून पर्यटनस्थळांची माहिती जगभर पोहोचविण्याचा प्रयत्न मंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती
जी-20 परिषदेसाठी जगभरातून आलेल्या विविध देशाच्या प्रतिनिधींना राज्यातील पर्यटनस्थळ, ऐतिहासिक वारसास्थळे, कृषी पर्यटन, वन्यजीव पर्यटनाची माहिती मिळावी, यासाठी सांताक्रूझ येथील ग्रँड हयात येथे छोटेखानी प्रदर्शन (स्टॉल) उभारण्यात आले आहे. या माध्यमातून पर्यटन स्थळांची माहिती जागतिक पातळीवर पोहचण्यास मदत होईल, असे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले. मंत्री लोढा म्हणाले की, राज्याला लाभलेला समुद्रकिनारा, विविध पर्यटन …
Read More »दिपक केसरकर म्हणाले, नक्षलवादी चळवळीतील व्यक्तीच्या पुस्तकाला पुरस्कार नाहीच कोबाद गांधी यांच्या फ्रॅक्चरड् फ्रिडम पुस्तकाला दिलेल्या पुरस्कार रद्द
राज्य सरकारच्या राज्य साहित्य, संस्कृती मंडळाने कोबाद गांधी यांच्या फ्रॅक्चरड फ्रिडम या मराठी अनुदावित पुस्तकाला पुरस्कार जाहीर केला. मात्र हे पुस्तक एका नक्षलवादी चळवळीत कोबाद गांधी यांनी काम केलेले असून १० वर्षे झाले तुरुंगात आहेत. देशात नक्षलवादावर बंदी आहे. त्यामुळे या नक्षलवादी चळवळीतील व्यक्तीच्या पुस्तकाला राज्य सरकारचा पाठिंबा असणे शक्य …
Read More »अजित पवार यांचा आरोप, आताचे सरकार साहित्य, संस्कृती क्षेत्राला नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करतेय प्रज्ञा दया पवार, निरजा यांनी निवड समितीचे राजीनामे दिले हे सरकारसाठी लांच्छनास्पद नाहीय का?...
अनुवादित साहित्यासाठी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी वाड्मय पुरस्कार अनघा लेले यांना कोबाद गांधी यांच्या ‘फ्रॅक्चर्ड फ्रिडम’ या पुस्तकाच्या अनुवादासाठी जाहीर झाला. हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मागील सहा दिवसात पडद्यामागे काही बर्याच घडामोडी झालेल्या दिसत असून १२ डिसेंबरला अचानक राज्य सरकारने आदेश काढत पुरस्कार निवड समिती बरखास्त केली आणि कोबाद गांधी यांच्या …
Read More »आशुतोष कुंभकोणी यांचा राजीनामा मंजूर, कामगार कायद्यात होणार सुधारणा राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
देवेंद्र फडणवीस सरकारचे लाडके महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांचा राजीनामा स्वीकृत करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. आता आशुतोष कुंभकोणी यांच्या ठिकाणी अँड. विरेंद्र सराफ यांची महाधिवक्ता पदी नियुक्ती करण्यात येणार असल्याची चर्चा मंत्रालयात सुरु झाली आहे. सराफ हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे निर्णय दोन आठवड्यानंतर झाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक
गुजरात निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जवळपास दोन आठवडे राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली नाही. त्यामुळे आज शिंदे-फडणवीस सरकारने राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेत एकदम १५ निर्णय घेतले. यामध्ये कोकणातील काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या अनुषंगाने आणि शाळा आणि ग्रंथालय अनुदान मंजूर, यासह अनेक महत्वाचे निर्णय राज्य सरकारने घेतले. जवळपास १५ निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतले ते …
Read More »फडणवीस सरकारच्या काळातील त्या दोन निर्णयाची पुन्हा नव्याने अमंलबजावणी जलयुक्त शिवार अभियान परत सुरु करणार आणि मुख्यमंत्री फेलोशिप प्रोग्राम
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार राज्यात स्थानापन्न झाल्यानंतर पुन्हा एकदा फडणवीस सरकारच्या काळात घेण्यात आलेल्या निर्णयांची परत अमंलबजावणी करण्यास सुरुवात करण्यात येत आहे. यापूर्वी आणिबाणी काळात तुरुंगवास भोगलेल्या अनेकांना राज्य सरकारने पेन्शन देण्याचा निर्णय फडणवीस सरकारच्या काळात घेण्यात आला होता. तो महाविकास आघाडी सरकारच्या काळात रद्द करण्यात आला होता. तो निर्णय पुन्हा …
Read More »महाराष्ट्रातही आता रंगणार फुलबॉलचा खेळः जर्मनीबरोबर केला करार जी- 20 देशांतील सहकार्य वाढीच्या दृष्टीने एक महत्वाचे पाऊल-क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन
राज्यातील फुटबॉल खेळाच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्य क्रीडा विभाग व एफ.सी बायर्न म्युनिक (FC Bayern Munich) जर्मनी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला . हा होणारा सामंजस्य करार जी 20 देशांतील सहकार्य वाढीच्या दृष्टीने एक महत्वाचे पाऊल असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. आज मंत्रालयात क्रीडा व युवक …
Read More »मंत्रिमंडळ उपसमितीने ७० हजार कोटी गुंतवणुकीच्या प्रकल्पांना दिली मान्यता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय
राज्यातील विदर्भ, मराठवाडा, नाशिक, पुणे या भागातील औद्योगिक विकासाला चालना देत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या चौथ्या बैठकीत ७० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. यामुळे सुमारे ५५ हजार रोजगार निर्मिती होणार आहे. राज्यात औद्योगिक गुंतवणुकीस पोषक वातावरण असून उद्योगांना सवलत देण्याचं राज्य शासनाचे धोरण आहे. सकारात्मक …
Read More »शरद पवारांना आधी फोनवरून त्रास नंतर जीवे मारण्याची धमकी अखेर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दिवाळीच्या आधीपासून एका उत्तर भारतातील नारायण सोनी नामक व्यक्तीकडून सिल्व्हर ओकवरील निवासस्थानावरील फोनवरून सातत्याने त्रास दिला जात होता. विशेषतः दिवाळीत तर या व्यक्तीकडून दिवसाला शंबभरवेळा फोन करून त्रास देत अर्वाच्च भाषेचा वापर केला जात होता. त्यानंतर सोनी नामक व्यक्तीकडून शरद पवारांना मुंबईत येऊन देशी कट्ट्याने …
Read More »
Marathi e-Batmya