शरद पवारांना आधी फोनवरून त्रास नंतर जीवे मारण्याची धमकी अखेर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दिवाळीच्या आधीपासून एका उत्तर भारतातील नारायण सोनी नामक व्यक्तीकडून सिल्व्हर ओकवरील निवासस्थानावरील फोनवरून सातत्याने त्रास दिला जात होता. विशेषतः दिवाळीत तर या व्यक्तीकडून दिवसाला शंबभरवेळा फोन करून त्रास देत अर्वाच्च भाषेचा वापर केला जात होता. त्यानंतर सोनी नामक व्यक्तीकडून शरद पवारांना मुंबईत येऊन देशी कट्ट्याने जीवे मारण्याची धमकी दिली. यासंदर्भात शरद पवार यांनी स्वतःच पत्र लिहित याची माहिती दिली असून सदरचे पत्र पोलिस आयुक्तांना २ डिसेंबर रोजी ही धमकी दिल्याचे पत्र लिहिले आहे.

फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीने हिंदीतून ही धमकी दिली. सिल्वर ओकवरील टेलिफोन ऑपरेटर पोलीस कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार या प्रकरणी ग्रामदेवी पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या आरोपीचा शोध घेत आहेत.

पवार यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या सिल्वर ओकवर अनोळखी व्यक्तीने दूरध्वनी केला होता. पोलीस हवलदार कृष्णा देऊळकर यांनी याप्रकरणी तक्रार केली आहे. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने पवार यांना मुंबईत येऊन देशी कट्ट्याने ठार मारण्याची धमकी दिली आहे. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने हिंदीतून ही धमकी दिली. तक्रारीनुसार गावदेवी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात २९४, ५०६ (२) भादंवि कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Editor

Check Also

पंढरपुरात मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या भक्तनिवासाचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते लोकार्पण वारकऱ्यांसोबत पंगतीला बसून घेतले जेवण

पंढरपूर येथे मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या वतीने उभारण्यात आलेल्या धर्मशाळा-भक्तनिवासाच्या नूतन वास्तूचे उद्घाटन व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *