राज्याचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी केली. यापूर्वीही राज्यपाल कोश्यारी यांनी शिवाजी महाराज यांच्या गुरूविषयी असेच वक्तव्य करून राज्यात गहजब माजविला होता. त्यानंत कधी सावित्रीबाई फुले-ज्योतिबा फुले आदींबाबतही असेच वक्तव्य केले होते. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार …
Read More »संजय राऊत यांचा सवाल, आता ते जोडे कोणाला मारणार भाजपा प्रवक्ता की राज्यपालांना?
राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या टीकेनंतर शिंदे गट, मनसे आणि भाजपाने राहुल गांधी यांच्यासह शिवसेनेवर टीकेची झोड उठविली. तसेच राहुल गांधी यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केले. मात्र महाराष्ट्राचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणारे वक्तव्य भाजपा प्रवक्ते आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले. त्यावरून उध्दव …
Read More »भाजपा माफी मागा, अन्यथा रस्त्यावर फिरु देणार नाही
भारतीय जनता पक्ष व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे महापुरुषांचा सातत्याने अपमान करत आहेत. राज्यपाल कोश्यारी यांनी पुन्हा एकदा छत्रपतीबद्दल अवमानकारक वक्तव्य केले आहे. छत्रपतींची तुलना भाजपाच्या नितीन गडकरींशी करण्याचे पाप त्यांनी केले आहे. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कदापी सहन केला जाणार नाही, अशा वादग्रस्त राज्यपालांची तात्काळ हकालपट्टी करा तसेच …
Read More »संजय राऊत यांचा मुख्यमंत्री शिंदेंना सवाल, कुठे गेला आता तुमचा स्वाभिमान?
तीन-चार दिवसांपूर्वी भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या माफीनाम्यावर टीका केली. राहुल गांधी यांच्या या टीकेवर राज्यात चांगलेच रणकंदन माजले. त्यामुळे राज्यातील राजकिय वातावरण ऐन थंडीतही चांगलेच तापले. त्यातच आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपाचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने उध्दव …
Read More »राहुल गांधींची टीका, पंतप्रधानांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला असता तर…
भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये शेतकरी चारीबाजूंनी नाडवला जात आहे. आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांना व शेतीला उद्ध्वस्त करणारे तीन काळे कृषी कायदे मोदी सरकारने आणले होते. या जुलमी कायद्यांविरोधात देशातील शेतकऱ्यांनी आवाज बुलंद करत दिल्लीला घेराव घालून ऐतिहासिक आंदोलन केले. मोदी सरकारला अखेर शेतकऱ्यांच्या आवाजासमोर झुकावे लागले व तीन काळे कायदे …
Read More »संजय राऊतांची स्पष्टोक्ती, अन्यथा देशाचा पाकिस्तान व्हायला वेळ लागला नसता
मागील तीन-चार दिवसांपासून भारत जोडो यात्रे दरम्यान आणि नुकतेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वा.वि.दा सावरकर यांच्या माफीनाफ्यावरून टीका केल्याने राज्यातील राजकिय वातावरण चांगलेच तापलेले आहे. या पार्श्वभूमीवर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांनीही राहुल गांधी यांच्यावर टीका करताना थेट पंडित नेहरू यांच्यावर टीका केली. या टीकेला उध्दव ठाकरे गटाचे …
Read More »भाजपाचा प्रवक्ता म्हणतो, छत्रपती शिवाजीने पाच बार माफी मागी
भारत जोडो यात्रेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वा.वि.दा. सावरकर यांनी ब्रिटीशांची माफी मागितल्याचे वक्तव्य केले. यावरून महाराष्ट्रात आरोप-प्रत्यारोपाचे राजकिय नाट्य रंगले असतानाच दिल्लीतील एका वृत्तवाहिनीवरील चर्चे दरम्यान भाजपाच्या प्रवक्त्याने सावरकरांच्या माफीचे समर्थन करताना छत्रपती शिवाजी महाराज यांनी पाच वेळा औरंगजेब यांची माफी मागितल्याचा दावा केला. त्यामुळे एकच खळबळ माजली …
Read More »ज्येष्ठ अभिनेत्री तथा निवेदिका तब्बसुम काळाच्या पडद्याआड
हिंदी चित्रपटातून बालकलाकार ते अभिनेत्री आणि पुढे स्वतंत्र निवेदीका, सूत्रसंचालिका म्हणून स्वत:चा आगळा वेगळा ठसा उमटविणाऱ्या आणि आपल्या मधाळ आवाजाच्या जोरावर दूरदर्शनवर फुल खिले है गुलशन गुलशन हा कार्यक्रम गाजवणाऱ्या अभिनेत्री आणि निवेदिका तबस्सूम यांचे शुक्रवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्या ७८ वर्षाच्या होत्या. दरम्यान मुंबईतील सांताक्रुज येथे २१ …
Read More »मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नातून दोन लाखा कोटींचे प्रकल्प येणार
जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रास चालना देणारे पोषक वातावरण आहे. त्यादृष्टीने उद्योगांच्या वृद्धीसाठी आवश्यक पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याकरिता शासन कटिबद्ध आहे. स्थानिक औद्योगिक क्षेत्रातील समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी उद्योजकांसोबत वेळोवेळी बैठका घेवून कालबद्धरीत्या प्रश्नांचे निराकरण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. नाशिक औद्योगिक व एसएमई यांच्यातर्फे आयोजित परिषदेत मुख्यमंत्री शिंदे यांनी आज …
Read More »राज्यघटनेच्या एक लाख प्रती वाटण्याच्या कार्यक्रमाची राहुल गांधींच्या हस्ते सुरुवात
केंद्रात भाजपाचे सरकार आल्यापासून मागील ८ वर्षात लोकशाही व राज्यघटना धोक्यात आली आहे. लोकशाही व राज्यघटनेचे रक्षण व्हावे यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या एस. सी. विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांच्या पुढाकाराने राज्यघटनेच्या एक लाख प्रती वाटण्याचा संकल्प केला असून या अभियानाची सुरूवात काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांच्या हस्ते आज …
Read More »
Marathi e-Batmya