ज्येष्ठ अभिनेत्री तथा निवेदिका तब्बसुम काळाच्या पडद्याआड

हिंदी चित्रपटातून बालकलाकार ते अभिनेत्री आणि पुढे स्वतंत्र निवेदीका, सूत्रसंचालिका म्हणून स्वत:चा आगळा वेगळा ठसा उमटविणाऱ्या आणि आपल्या मधाळ आवाजाच्या जोरावर दूरदर्शनवर फुल खिले है गुलशन गुलशन हा कार्यक्रम गाजवणाऱ्या अभिनेत्री आणि निवेदिका तबस्सूम यांचे शुक्रवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्या ७८ वर्षाच्या होत्या. दरम्यान मुंबईतील सांताक्रुज येथे २१ नोव्हेंबर रोजी प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्या अचानक निधनाने कुटुंबियांनाही धक्का बसला आहे.

रामायण मालिकेतील रामाची भूमिका साकारणारे अरूण गोविल यांचे बंधू विजय गोविल यांच्या त्या पत्नी होत्या.

तबस्सूम यांच्याबरोबर एका कार्यक्रमासाठी चित्रीकरण सुरू होते. काही भाग पूर्ण झाला होता आणि उर्वरित भागाचे चित्रीकरण पुढच्या आठवड्यात करण्यात येणार होते. मात्र त्याआधीच त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते अशी माहिती त्यांचा मुलगा होशांगने दिली.

त्या रुग्णालयातून घरी परतल्या होत्या. मात्र शुक्रवारी त्यांना पुन्हा प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथेच त्यांना दोनदा हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवल्याचे त्यांनी सांगितले.

१९४७ साली बालकलाकार म्हणून तबस्सुम यांनी त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरूवात केली. १७७२ ते १९९३ या सलग २१ वर्ष चालणाऱ्या दुरदर्शन वाहिनीवरील ‘फूल खिले हैं गुलशन गुलशन’ या कार्यक्रमाचे त्यांनी सुत्रसंचलन केले होते. वयाच्या तिसऱ्या वर्षी त्यांनी कॅमेऱ्यासमोर उभे राहून त्यांनी नर्गिस चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले. त्यानंतर बैजू बावरा चित्रपटातही त्यांनी मीना कुमारी यांच्या बालपणीची भूमिका साकारली होती. ‘तला’, ‘हिर रांझा’,’गॅम्बलर’, ‘जॉनी मेरा नाम’, ‘तेरे मेरे सपने’, ‘सूरसंगम’, ‘अग्निपथ’,’नाचे मयुरी’ अशा अनेक चित्रपटांतून त्यांनी काम केले.

About Editor

Check Also

सतलज चित्रपटानंतर आता हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता अन्न सुरक्षा व सार्वजनिक आरोग्यावर आधारीत द इंडिया स्टोरी: स्लो पॉयझन इन प्रोग्रेस कोर्टरूम ड्रामा

दलजीत दोसांझ अभिनीत ‘सतलज’ चित्रपटाभोवतीचा वाद शमण्याआधीच, आणखी एका चित्रपटासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. पंजाबमधील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *