Breaking News

दसरा मेळाव्यासाठी कोट्यवधीची रक्कम जमा करणाऱ्यांची नावे जाहीर करा

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी ११ लाख रुपये रक्कम सापडल्यावर त्यांच्यावर ईडीची चौकशी करण्यात आली. मग शिंदे गटाने आयोजित केलेल्या दसऱ्या मेळाव्यासाठी आरक्षित केलेल्या एसटी महामंडळाच्या विशेष बसेससाठी भरण्यात आलेल्या ९ कोटी ९९ लाख रुपयांची रक्कम भरलेल्या व्यक्तीची चौकशी करणार का असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी …

Read More »

संजय गांधी योजनेसाठी ६२५, श्रावणबाळ निवृत्ती वेतनसाठी १ हजार १९४ कोटी रुपयांचे वितरण राज्य सरकारकडून अनुदानाचे वाटप

संजय गांधी निराधार अनुदान योजनेतंर्गत ६२५ कोटी रुपये तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतंर्गत ११९४ कोटी रुपये निधी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना ऑक्टोबर २०२२ मध्ये वितरीत करण्यात आला आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजनेतर्गत किमान १८ ते ६५ वर्षाखालील निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, दिव्यांगातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, …

Read More »

लहान मुलांसाठी ‘खिलखिलाहट’ रुग्णवाहिका उपलब्ध करून देणार मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती

लहान मुलांना रुग्णालयात दाखल करताना मुंबई उपनगर परिसरात तत्काळ रुग्णवाहिका मिळावी यासाठी गुजरात शासनाच्या धर्तीवर ‘खिलखिलाहट’ रुग्णवाहिका सुरू करणार असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. घाटकोपर येथील एन वॉर्ड येथे पार पडलेल्या ‘पालकमंत्री आपल्या दारी’ या उपक्रमात अर्जदार पूनम नायर …

Read More »

जयदेव ठाकरे, स्मिता ठाकरे , निहार ठाकरे यांच्या उपस्थितीने काय साधले ? शिंदे गटातील मेळाव्यातील ठाकरे कुटुंबियांच्या सहभागावरून शिवसैनिकांचा सवाल

लक्झरी बसेस, एसटीच्या बसगाड्या खाना खजाना, आणखीवर बक्षिसी रक्कम, दिवसभर सगळ्या टीव्ही चँनेल्स अन्य समाजमाध्यातून जाहिराती आणि अन्य वृत्तपत्राच्या माध्यमांतून नंबर १ च्या मोठ्ठ्या जाहिराती देऊन मोठा गाजावाजा करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीकेसीवर मैदानावर आयोजित केलेल्या दसरा मेळाव्याचा सपशेल फ्लॉप शो झाला. तर जयदेव ठाकरे, स्मिता ठाकरे, निहार ठाकरे …

Read More »

‘ना खाऊंगा ना खाने दूंगा’ म्हणणार्‍या मोदींच्या रेल्वे मंत्रालयात चार लाख डॉलरची लाच

‘ना खाऊंगा ना खाने दूंगा’ असं घोषवाक्य घेत सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदींच्या रेल्वे मंत्रालयात कंत्राट मिळवण्यासाठी चार लाख डॉलरची लाच ओरॅकल कंपनीने दिल्याप्रकरणी २३ मिलियन डॉलरचा दंड युनायटेड स्टेट्स सिक्युरिटी ॲंड एक्स्चेंज कमिशनने कंपनीला ठोठावला असून याप्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी आज …

Read More »

डॉ श्रीकांत शिंदे यांचे उध्दव ठाकरे यांना खुले पत्र, हे तुमच्या धगधगत्या हिंदूत्वात बसतं का? पापाचे धनी होवू नका अशी कळकळीची विनंती

दसरा दिनाचे औचित्य साधत आपलीच शिवसेना खरी असल्याचे दाखविण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्यावतीने दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी शिवाजी पार्क येथे झालेल्या दसरा मेळाव्यात बोलताना उध्दव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांचे दिड वर्षाचे चिरंजीव रूद्रांश याच्यावरही टीका केली. …

Read More »

नाना पटोले यांनी लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र, जनतेच्या बँक खात्यात ‘दिवाळी भेट’ जमा करा

राज्य मंत्रिमंडळाने रेशनकार्ड धारकांना दिवाळीसाठी १०० रुपयामध्ये रेशन दुकानातून एक किलो चणाडाळ, साखर, रवा व एक लिटर पामतेल देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारची ही दिवाळी भेट अत्यंत तुटपुंजी आहे. सरकारने महागाईचा विचार करून प्रत्येक कुटुंबाच्या बँक खात्यातच तीन हजार रुपये दिवाळी भेट जमा करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सेंद्रिय शेतीला चालना सेंद्रिय शेतीला लोकचळवळीचे स्वरूप देणार

महाराष्ट्रात सेंद्रिय शेतीवर भर देण्यात येत असुन शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी डॉ.पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती अभियानाची स्थापना करण्यात आली आहे. सेंद्रिय शेतीला जनआंदोलनाचे स्वरूप देण्यासाठी प्रयत्न असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राष्ट्रीय नैसर्गिक शेती आणि डिजिटल शेती यावरील कार्यशाळेत दिली. नवी दिल्ली येथे आयोजित या …

Read More »

नाना पटोले यांचा टोला, काँग्रेसला दोष देऊन एकनाथ शिंदेंना गद्दारीचे पाप लपवता येणार नाही बीकेसीवरील मेळाव्यात एकनाथ शिंदेंनी वाचली भाजपाची स्क्रिप्ट

मुंबईतील बीकेसी मैदानावरील एकनाथ शिंदे गटाच्या मेळाव्याला राज्यातील विविध भागातून सामान्य जनतेला खोटी माहिती देऊन भाडोत्री गर्दी जमवण्यात आली होती परंतु या जनतेने शिंदेंचे भाषण न ऐकताच काढता पाय घेतला. राज्याचा मुख्यमंत्री हा भारतीय जनता पक्षाच्या हातचे बाहुले असल्याचे राज्यातील जनतेने काल पाहिले. एकनाथ शिंदे यांनी आपल्या गद्दारीचे समर्थन करत …

Read More »

बीकेसीत शिंदेंच्या समर्थनार्थ ठाकरे कुटुंबिय, जयदेव ठाकरे म्हणाले, एकटे सोडू नका एकनाथ शिंदे याचे चार-पाच निर्णय आपल्याला आवडले

खरी शिवसेना कोणाची यावरून अस्तित्वाची लढाई सुरु झाली आहे. त्याचा निकाल निवडणूक आयोगाच्या आधी आज ५ सप्टेंबर रोजी शिवसेना विरुद्ध शिंदे गटाने केलेल्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने जनतेच्या दरबारात लागेल. शिंदे गटाने बीकेसी मैदानावरील मेळाव्यासाठी जोरदार तयारी केली. त्यातच आता या मेळाव्याला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे थोरले सुपुत्र जयदेव ठाकरे यांनी …

Read More »