शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी सुरु केलेल्या टेंभी नाक्यावरील नवरात्रोत्सव राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात येतो. या उत्सवाला गुरुवारी दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी उपस्थिती लावत महाआरती केली. यानिमित्ताने ठाकरे गटाकडून उत्सवाच्या परिसरात मोठे शक्तीप्रदर्शन करण्यात आले. तसेच महाआरतीनंतर …
Read More »अतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या बाधित शेतकऱ्यांना ७५५ कोटी रुपयांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत निर्णय
अतिवृष्टीसाठी विहित करण्यात आलेल्या निकषांमध्ये बसत नसतानाही जून ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. विशेष बाब म्हणून सुमारे ७५५ कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत आज घेण्यात आला. याचा राज्यातील अंदाजे ५ लाखांपेक्षा अधिक …
Read More »उध्दव ठाकरे म्हणाले, काही लोक ढळली पण खरे अढळ आहेत ते… आपल्याला लढाई जिंकायची आहे
उद्धव ठाकरेंनी ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर पुणे यवतमाळच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दसरा मेळावा, निवडणूक आयोगातील लढाई यावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांनाही लक्ष्य केलं. उध्दव ठाकरे म्हणाले, माझ्यासोबत जुनी माणसं आहेत, पण सोबत नवीन येत आहेत याचा आनंद आहे. शिरुरमधील काही लोक ढळली, पण जे खरे अढळ …
Read More »कोकणात होणार ४ हजार २०० कोटींची गुंतवणूक पेण येथे होणार ९६० मेगावॅटचा पीएसपी प्रकल्प- उद्योगमंत्री उदय सामंत
जेएसडब्ल्यू आणि महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभाग यांच्यामध्ये पेण (रायगड) येथील निओ एनर्जी प्रकल्पासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या माध्यमातून कोकणात सुमारे ४ हजार २०० कोटींची गुंतवणूक आहे. पेण येथे ९६० मेगावॅटचा पीएसपी प्रकल्प उभा राहणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. सह्याद्री अतिथीगृह येथे उद्योग मंत्री सामंत …
Read More »जयंत पाटील म्हणाले, अशोक चव्हाण यांनी जो गौप्यस्फोट केला त्यात तथ्य… मराठा समाजाबद्दलचे तानाजी सावंतांचे वक्तव्य तीच भूमिका मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची...
२०१४ साली अशोक चव्हाण यांची एकनाथ शिंदे यांनी भेट घेऊन शिवसेना – कॉंग्रेस आघाडीबाबत चर्चा केली असा अशोक चव्हाण यांनी गौप्यस्फोट केला असेल तर त्यात तथ्य असणे स्वाभाविक आहे, असे मत व्यक्त करतानाच सध्या मुख्यमंत्र्यांनी जी युती केली आहे ती कशासाठी केली हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे असा टोलाही राष्ट्रवादी …
Read More »गर्भपाताबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिला ‘हा’ महत्वाचा निर्णय प्रत्येक महिलेला सुरक्षित गर्भपाताचा अधिकार
काही दिवसांपूर्वी अमेरिकत गर्भपातासंदर्भात वेगळा निर्णय दिला होता. त्यानंतर जगभरतील अनेक देशांमध्ये याबाबतचा प्रश्न उपस्थित झाला. याच अनुषंगाने भारतातही यासंदर्भात प्रश्न उपस्थित करत एक याचिका दाखल झाली होती. त्यावर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने सुरक्षित गर्भपाताचा अधिकार विवाहीत असो किंवा अविवाहीत असो त्या सर्व महिलांना असल्याचा महत्वपूर्व निकाल दिला. एका २५ …
Read More »सेवा पंधडरवडा अंतर्गत मुंबई भाजपाकडून १०० ठिकाणी महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथून स्वच्छता अभियानाची सुरूवात
छत्रपती शिवाजी महाराज पार्क मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि सावरकर स्मारक येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुतळ्याची स्वच्छता करून मुंबई भाजपा अध्यक्ष ॲड. आशिष शेलार यांनी पुतळा स्वच्छता अभियानाची सुरुवात केली. तसेच दोन्ही पुतळयांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तर पर्यटन व महिला बालकल्याण मंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा यांच्या …
Read More »राज्य मंत्रिमंडळाने निर्णय फिरवताच राज्यपालांकडून निवड समिती स्थापन
महाविकास आघाडी सरकारच्या काळात विद्यापीठ कुलगुरू निवडीचे अधिकार राज्यपालांऐवजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांना बहाल करण्यात आले. तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री जी नावे सुचवतील त्यातील एका नावास पसंती देण्याचा पर्यायही राज्यपालांना देण्यात आला होता. मात्र राज्यात सत्तांतर होत शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर स्थानापन्न झाले. नुकत्यात झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांना कुलगुरू …
Read More »सुप्रिया सुळे म्हणाल्या, आता आपले सण उत्सव हे बंधन घालूनच साजरे करावे लागणार गॅस सिलेंडर दरात भरमसाठ वाढ करायची आणि दुसरीकडे सिलेंडर वापरावर मर्यादा आणायची;यातून केंद्रसरकार असंवेदनशील दिसते...
देशवासियांच्या घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर वापरावर बंधन घालून केंद्रातील भाजपा सरकारने थेट नागरिकांच्या जेवणावर… सण – उत्सव साजरे करण्यावर… आणि एकंदरीत मुलभूत हक्कांवरच बंधन घातले आहे. त्यामुळे या निर्णयाचा एक गृहिणी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जाहीर निषेध केला. दरम्यान ऐन नवरात्रौत्सवात देशातील महिलांच्या हिताचा निर्णय घेण्याऐवजी …
Read More »‘आदर्श’ घालून देणाऱ्या नेत्याच्या विधानांना फारसे महत्व देण्याची गरज नाही देवी कुणाच्या पाठीशी ते सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने स्पष्ट झाले, खैरे, दानवेंच्या टीकेला म्हस्के यांचं सडेतोड प्रत्युत्तर
शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आणि प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केलेल्या विधानाचा खरपूस समाचार घेतला आहे. ज्या चव्हाणांनी संपूर्ण महाराष्ट्रासमोर ‘आदर्श’ घालून दिला त्यांनी केलेल्या वक्तव्याला महत्व देत नसल्याचे मत म्हस्के यांनी व्यक्त केले आहे. त्यासोबतच ज्यांच्या स्वतःबद्दल गेल्या काही दिवसात ते नाराज असून इकडे तिकडे जाणार …
Read More »
Marathi e-Batmya