Breaking News

देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, राज्यातील ‘या’ पोलिसांना दिडपट वेतन

राज्यातील नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात आणि गडचिरोलीसारख्या नक्षल भागात पोलिसांच्या दीडपट वेतनाचा प्रश्न प्रलंबित आहे. मात्र, त्यासंदर्भातील आदेश देण्यात आले असून, येत्या सोमवारपर्यंत त्याचा शासन आदेश गडचिरोलीत पोहोचेल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गडचिरोलीत दिली. गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आज शनिवारी …

Read More »

सुप्रिया सुळे म्हणाल्या, प्रशासन नेमकं कोण चालविते ते देवालाच ज्ञात ओरबाडून सत्तेवर आलेलं सरकार

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार येवून जवळपास तीन महिने झाले. मात्र या सरकारच्या कारभारावरून सातत्याने विरोधकांकडून टीकेची झोड उठविण्यात येत आहे. विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या सातत्याने कधी राज्य सरकारच्या पालकमंत्री नियुक्तीवरून तर कधी राज्याच्या कारभारावरून शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य करत असतात. सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, राज्याचे …

Read More »

शिंदे गटात जाण्याच्या चर्चेवर मिलिंद नार्वेकर यांनीच ट्विट करत दिली ‘ही’ माहिती मी भाग्यवान कारण मला गरूड वहनाच्या पुजेला सहभागी होता आलं

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर सुरुवातीला उध्दव ठाकरे यांचे खास दूत म्हणून मिलिंद नार्वेकर हे सूरतला गेले होते. त्यानंतर शिवसेनेच्या अनेक सक्रिय घटनांपासून मिलिंद नार्वेकर हे लांब राहिले असल्याचे चित्र मागील काही दिवसांपासून दिसत आहे. तसेच मातोश्रीवरही मिलिंद नार्वेकर दिसेनासे झालेले आहेत. यापार्श्वभूमीवर शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव …

Read More »

अरविंद सावंत यांची शिंदे गटाला कचरा बेईमान विशेषण…

राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिंदे गट आणि शिवसेनेमध्ये जोरदार संघर्ष सुरु असून, दसरा मेळाव्याच्या निमित्ताने दोन्ही गट जास्त आक्रमक झाले आहेत. शिंदे गट आणि शिवसेनेकडून दसरा मेळाव्यासाठी जय्यत तयारी सुरु आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी मेळाव्याचा टीझर प्रदर्शित केल्यापासून समर्थकांमधील उत्सुकता वाढली आहे. यादरम्यान दोन्ही गटाच्या नेत्यांकडून एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोपाच्या …

Read More »

अजित पवार म्हणाले, अरे मी सातवेळा बारामतीतून का निवडूण आलो? कारण… आमदारांना पाडा आणि विकास काम करा

एका कार्यकर्त्याने विरोधी पक्षनेते अजित पवारांना चिट्ठी देत वाचून घ्या म्हटलं. यावर अजित पवारांनी मिश्किल टिपण्णी केली. या चिट्ठीत म्हटलं होतं की, बारामती, माढ्यात ज्या प्रमाणे विकास झाला तसा उस्मानाबादचा विकास करा. हे वाचल्यानंतर अजित पवारांनी भरसभेत या कार्यकर्त्याला ‘आमदार पाडा आणि विकास करा’, असा खोचक टोला लगावला. ते शनिवारी …

Read More »

नारायण राणेंच्या चाफ्याला टीकेला शिवसेनेकडून धोतऱ्याच्या फुलाचे प्रत्युत्तर शिवसेना प्रवक्त्या मनिषा कांयदे यांनी प्रत्युत्तर दिले

भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. उगवत नाही, फुलत नाही आणि वासही येत नाही, असा चाफा फक्त मातोश्रीत आहे. बाकी कुठेही नाही, अशी टीका नारायण राणे यांनी केली. ते एका कार्यक्रमात बोलत होते. उद्धव ठाकरे यांना आपण मागील ३९ वर्षांपासून …

Read More »

नाना पटोले यांची मागणी, त्या Tax च्या माध्यमातून होणारी सर्वसमान्यांची दुहेरी लुट थांबवा

महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षात बऱ्याच जिल्ह्यातील राज्य महामार्गांचा दर्जा वाढवून त्यांना राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करण्यात आले आहे. यातील काही महामार्गांची बांधकामे पूर्ण झाली आहेत तर काही महामार्गांची कामे अद्याप सुरु आहेत. या महामार्गाचा वापर सुरू करण्यापूर्वी या रस्त्यावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून रस्त्याच्या बांधकामासाठी झालेला खर्च वसूल करण्यासाठी टोल लावण्यात …

Read More »

..अन् विद्यार्थ्यांसोबत मुख्यमंत्रीही झाले विद्यार्थी फाईव्ह जी तंत्रज्ञानाच्या शुभारंभ प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी ऑनलाईन संवाद

फाईव्ह जी नेटवर्कच्या राष्ट्रव्यापी शुभारंभ कार्यक्रमासाठी निवडलेल्या पनवेलमधील शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वता विद्यार्थी बनले. खुर्ची ऐवजी त्यांनी बेंचवर बसणे पसंत केले आणि विद्यार्थ्यांशी गप्पा मारताना मुख्यमंत्र्यांनी फाईव्ह जी चे महत्व सांगितले. क्रांतीकारक क्षणाचे आपण साक्षीदार असल्याचे सांगत शिक्षण, कृषी, आरोग्य, बॅंकींग यासह सर्वच क्षेत्रात फाईव्ह जी …

Read More »

आचार्य अत्रे यांच्या “तो मी नव्हेच” नाटकाचा हीरकमहोत्सव राज्य सरकार करणार नाटकाच्या हीरक महोत्सव सोहळ्याचे आयोजन-सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आणि नाट्यसंपदा प्रतिष्ठान निर्मित आचार्य अत्रे लिखित “तो मी नव्हेच” या नाटकाच्या हीरक महोत्सवा निमित्ताने ८ ऑक्टोबर, २०२२ रोजी सायंकाळी ६.३० वाजता रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे एका विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. आचार्य …

Read More »

बाल न्याय अधिनियमातील कायद्यानुसार भारतातील पहिले दत्तक विधान नगर मध्ये दत्तक विधानाचे अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांना

२३ सप्टेंबर २०२२ रोजी भारतात कार्यान्वित झालेल्या बाल न्याय अधिनियमातील नवीन बदलानुसार भारतातील पहिले दत्तक विधान आज अहमदनगर मध्ये संपन्न झाले. स्नेहालय संचालित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राने यासंदर्भात पथदर्शी काम केले. भारतातील  दत्तक विधान  प्रक्रियेला मोठा ऐतिहासिक आणि पौराणिक वारसा आहे. तथापी समाजात दत्तक विधानाबद्दल अनेक गैरसमज आणि अंधश्रद्धा होत्या. …

Read More »