अरविंद सावंत यांची शिंदे गटाला कचरा बेईमान विशेषण…

राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिंदे गट आणि शिवसेनेमध्ये जोरदार संघर्ष सुरु असून, दसरा मेळाव्याच्या निमित्ताने दोन्ही गट जास्त आक्रमक झाले आहेत. शिंदे गट आणि शिवसेनेकडून दसरा मेळाव्यासाठी जय्यत तयारी सुरु आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी मेळाव्याचा टीझर प्रदर्शित केल्यापासून समर्थकांमधील उत्सुकता वाढली आहे. यादरम्यान दोन्ही गटाच्या नेत्यांकडून एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यातच शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी अप्रत्यक्षपणे शिंदे गटाला लक्ष्य करत एक ट्वीट केले.

अरविंद सावंत यांनी ट्वीट करत शिंदे गटावर लाचार, बेईमान, कचरा अशी टिप्पणी केली आहे. यावेळी त्यांनी विकलेल्या निष्ठा माहिती नाही अशी टीका करताना आक्षेपार्ह उल्लेखही केला.

दरम्यान, दसरा मेळाव्यासाठी शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जोरदार तयारी करण्यात येत असून वांद्रे-कुर्ला संकुलातील शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी एक लाख खुर्च्यांची व्यवस्था आहे, तर शिवसेनेच्या शिवाजी पार्कमधील मेळाव्यात ४० हजार खुर्च्या असतील, असा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. पोलिसांच्या अंदाजापेक्षा दुप्पट गर्दी होईल, असा दावा शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावस्कर यांनी केला, तर शिवाजी पार्क मैदान पूर्ण भरून बाहेरही कार्यकर्ते उभे असतील, असे शिवसेना नेते अ‍ॅड. अनिल परब यांनी स्पष्ट केले. यावरून गर्दी कोणत्या मेळाव्यात अधिक होणार यावरून दोन्ही बाजूने दावे-प्रतिदावे केले जात आहेत.

About Editor

Check Also

प्रताप सरनाईक यांची माहिती, वाहनचालक परवान्यासाठी १ ऑगस्टपासून महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य विधानसभेत मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती

राज्यात वाहनचालक परवाना मिळविण्यासाठी १ ऑगस्ट २०२६ पासून नवीन नियमावली लागू करण्यात येणार असून त्यानुसार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *