समाजातील सर्व घटकांना न्याय देणारे हे सरकार आहे. माथाडी कामगाराच्या घरांचा, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा तसेच वैद्यकीय सुविधांचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. मराठा समाजात नव उद्योजक तयार व्हावेत यासाठी स्व. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या निधीत वाढ केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. माजी …
Read More »शाहरूख खानने शायरी सोबत ट्विट केलेल्या फोटोला तासात ४१ हजार जणांनी केले लाईक पठाण चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सिलसिला चित्रपटातील तुम होती तो ऐसा होता…
मागील काही दिवसांपासून काही निवडक चित्रपटांच्या विरोधात ट्रेडिंग करून फ्लॉप करण्याचे प्रकार सुरु आहेत. या ट्रेडिंगमुळे आमिर खानचा बहुचर्चित लालसिंग चढ्ढा हा चित्रपट फ्लॉप करण्यात आला. त्यापाठोपाठ शाहरूख खान याच्या मोस्ट अवेटेड पठाण या चित्रपटाला फ्लॉप ठरविण्यासाठी काही ट्रेडिंगवाले तयारीत आहेत. मात्र शाहरूख खान आणि त्याच्या टीमकडून चित्रपटाबद्दल कोणतीही माहिती …
Read More »नितीन गडकरी यांची घोषणा, सिकलसेल रूग्णांसाठी अर्ध्या किंमतीत उपचार वयोश्री योजनेच्या लाभातून कोणीही वंचित राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
ज्येष्ठ नागरिक हे प्रत्येक पिढीचे वैभव असते. त्यांनी खस्ता खाल्ल्या म्हणून आजचे चांगले दिवस आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे जबाबदारी म्हणून ‘वयोश्री’ योजनेतील साहित्य वाटपातून कोणीही वृद्ध वंचित राहणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय, दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग, सामाजिक न्याय व सक्षमीकरण …
Read More »नवे पालकमंत्री जाहीर: मात्र बहुतांश जिल्हे भाजपा मंत्र्यांकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा
राज्य विधिमंडळाचे अधिवेशन पार पडल्यानंतर आणि अधिवेशन काळात नैसर्गिक संकट असल्याने पालकमंत्री नेमा अशी मागणी सातत्याने विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारकडे करण्यात येत होती. मात्र आता नैसर्गिक संकट काही प्रमाणात ओसरले असले तरी अद्यापही काही ठिकाणी पावसाची हजेरी आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर आज उशीराने का होईना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्र्यांची नियुक्त्या …
Read More »पुण्यातील त्या घोषणेवरून मुख्यमंत्री शिंदेंचा इशारा, असले नारे खपवून घेणार नाही.. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, त्यांना सोडणार नाही
पुण्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. या घटनेची दखल राज्य सरकार व गृहविभागाने गांभीर्याने घेतली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “ज्यांनी पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा दिल्या त्यांना सोडणार नाही,” असं म्हणत गंभीर इशारा दिला आहे. तर, आता या गंभीर …
Read More »मुख्यमंत्री पुत्राच्या त्या फोटोला प्रत्युत्तर देण्याच्या नादात शीतल म्हात्रे आल्या अडचणीत सुप्रिया सुळे यांचा मार्फिंग फोटो ट्विट केल्याने पोलिसात गुन्हा दाखल
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसून काम करत असल्याचा फोटा नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसने ट्विट करत टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या राजकिय कृत्याला प्रत्युत्तर म्हणून एकनाथ शिंदे गटाच्या समर्थक शीतल म्हात्रे यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसलेला मॉर्फिंग केलेला फोटो ट्विट …
Read More »नाना पटोले यांचा सवाल, मग केंद्र सरकार त्या संघटनांवर बंदी का घालत नाही? पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांवर कडक कारवाई करा
दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवल्याच्या आरोपाखाली एनआयए, ईडी या केंद्रीय यंत्रणांनी पुण्यासह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी छापेमारी करून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) संघटनेच्या अनेकांची धरपकड करताना पुण्यात काही लोकांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या हे अत्यंत निषेधार्ह आहे. अशा घोषणा देणाऱ्या व दहशतवाद्यांचे समर्थन करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. कोणतीही संघटना धार्मिक …
Read More »आदित्य ठाकरे म्हणाले, आम्हाला गाजरं, चॉकलेट नको…मुख्यमंत्री फक्त स्वत:साठी दिल्लीत प्रकल्पाची कोणतीच माहिती मुख्यमंत्र्यांना नाही
मागील काही दिवसांपासून वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यापाठोपाठ बल्क ड्रग पार्क आणि मेडिकल डिव्हाईस प्रकल्प एकामागो एक महाराष्ट्रातून गेले. तसेच मुंबईतल्या वांद्रे सी लिंक प्रकल्पासाठी लागणाऱ्या अभियंत्याच्या मुलाखती महाराष्ट्राऐवजी चेन्नईत घेण्यात येत असल्यावरून युवासेना नेते आदित्य ठाकरे यांच्याकडून शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर आज आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तळेगांव …
Read More »पालघरचे शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव संख्ये, जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिंदे गटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्या गटाला धक्का
पालघरचे शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव संख्ये आणि पालघर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सचिन पाटील यांच्यासह पालघर जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठ शिवसैनिकांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन युती सरकारला आपला पाठींबा जाहीर केला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना त्यांच्या भावी राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, तसेच …
Read More »आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेच्या मदतीतून वैद्यकीय महाविद्यालये आणि अतिविशेषोपचार रूग्णालय वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांची माहिती
सर्वसामान्यांना शासकीय वैद्यकीय रूग्णालयात दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याला प्राधान्य देण्यात येत असून यासाठी आगामी काळात आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांची मदत घेण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रूग्णालये स्थापन करण्याची व श्रेणीवर्धन करण्याची कार्यवाही आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेच्या (आयएफसी) मदतीने सुरू असून, यासंदर्भातील कामाबाबत …
Read More »
Marathi e-Batmya