Breaking News

१३९ नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर: जाणून घ्या कोणासाठी कोणती राखीव अनुसूचित जातीसाठी १७, अनुसूचित जमातीसाठी १३ तर खुल्या प्रवर्गासाठी १०९ पदे राखीव

मराठी ई-बातम्या टीम राज्यातील १३९ नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांच्या हस्ते मंत्रालयात आज आरक्षण सोडत काढण्यात आली. या सोडतीमध्ये १३९ नगरपंचायतीपैकी अनुसूचित जातीसाठी १७, अनुसूचित जमातीसाठी १३ तर खुल्या प्रवर्गासाठी १०९ नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित करण्यात आले. नगरपंचायतीच्या अध्यक्ष पदाच्या आरक्षण सोडतप्रसंगी …

Read More »

राज्य सरकारचा मोठा निर्णय: आता या दुकानातून वाईन मिळणार अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली माहिती

मराठी ई-बातम्या टीम मागील काही महिन्यापासून राज्यातील जनरल स्टोअर, सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्यास परवानगी देण्याबाबतचा विचार राज्य सरकारकडून करण्यात येत होता. त्यानुसार आज अखेर राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेत राज्यातल्या सुपर मार्केटमध्ये आता वाईनची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर १००० चौरस फुटाच्या दुकानातच वाईन …

Read More »

टिपू सुलतान वादावरून मलिक म्हणाले, दरेकर हे मजूर सोसायटीचे कामकाज नाही चुकीचं बोललो असेन तर राष्ट्रपतींना जाऊन विचारा - नवाब मलिक

मराठी ई-बातम्या टीम मालवणी येथील क्रिडा संकुलास टिपू सुलतान यांचे नाव देण्यावरून भाजपा नेते तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर निशाला साधल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी दरेकरांच्या टिकेला प्रतित्युर देत प्रविण दरेकर हे मजूर सोसायटीचे कामकाज नाही असा उपरोधिक टोला लगावला. टिपू सुलतान …

Read More »

मालेगावच्या महापौरांसह काँग्रेसच्या २८ नगरसेवकांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत बांधले हाती घड्याळ

मराठी ई-बातम्या टीम   मालेगाव महानगरपालिकेतील कॉंग्रेसच्या महापौरांसह २८ नगरसेवकांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या सर्व नगरसेवकांचे स्वागत केले. तसेच पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. मालेगावमधील या पक्षप्रवेशामुळे आता पुढील विधानसभा …

Read More »

आमदार नितेश राणेंच्या जामीन अर्जावरील निकालानंतर मिलिंद नार्वेकरांची खोचक पोस्ट लघु सुक्ष्म दिलासा

मराठी ई-बातम्या टीम सिंधुदूर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूकीच्या काळात जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केलेल्या भाजपा आमदार नितेश राणे यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा देण्यास नकार देत योग्य १० दिवसात त्या संबधित न्यायालयात शरण जा असे निर्देश दिल्यानंतर शिवसेनेचे नेते तथा शिवसेना …

Read More »

टिपू सुलतान नामकरणप्रकरणी महापौरांनी भाजपाला आव्हान देत केला हा खुलासा मालाड मालवणीतील त्या मैदानाला नाव देण्याचा कोणताही अधिकृत प्रस्ताव नाही

मराठी ई-बातम्या टीम मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या मालवणी येथील टिपू सुलतान क्रिडा संकुलावरून आता शिवसेनेने सावध भूमिका घेत या नामकरणाचा कोणताही अधिकृत प्रस्ताव मुंबई महापालिकेत किंवा राज्य सरकारकडून आलेला नसल्याचे सांगत ते नाव अधिकृत नाही. या अनुषंगाने भाजपाच्या नेत्यांनी २०१६ आणि २०१७ मध्ये पत्र व्यवहार केला …

Read More »

टिपू सुलतान प्रकरणावरून राज्यात दंगली घडवण्याचा भाजपाचा डाव राज्यातील भाजपा नेत्यांनी इतिहासाचा अभ्यास करुन बोलावे

मराठी ई-बातम्या टीम मुंबईतील मालाड मालवणी भागातील एका क्रीडासंकुलाच्या ‘वीर टिपू सुलतान क्रींडागण’ या नावावरून भारतीय जनता पक्ष जाणीवपूर्वक मुंबई व राज्यातील वातावरण बिघडवत आहे. भाजपा नेते राज पुरोहित यांचे राज्यात दंगली घडतील हे विधान गंभीर व भडकावू आहे. राजकीय पोळी भाजण्यासाठी धार्मिक विद्वेष परवण्याचा भाजपा डाव असल्याचा आरोप महाराष्ट्र …

Read More »

नितेश राणे यांना अटक अटळ: सर्वोच्च न्यायालयाने दिले १० दिवस संतोष परब हल्ल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानाकडूनही दिलासा नाहीच

मराठी ई-बातम्या टीम सिंधुदूर्ग जिल्हा निवडणूक प्रचाराच्यावेळी बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी भाजपा आमदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांचा अटकपूर्व जामिन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने आणि मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. परंतु सर्वोच्च न्यायालयानेही राणे …

Read More »

३५ हजार आज कोरोनाबाधित तर ३९ हजार बरे होवून घरी १५ लाख होम क्वारंटाईन तर ७९ जणांचा मृत्यू

मराठी ई-बातम्या टीम राज्यात आज ३५ हजार ७५६ नवे कोरोनाबाधित आढळून आले असून ३९ हजार ८५७ इतके रूग्ण बरे होवून घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यात ९४.१५ टक्के रूग्ण बरे होण्याचे प्रमाण एवढे झाले आहे. तर ७९ इतक्या रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर आज ओमायक्रॉनचा एकही रूग्ण आढळून आला नाही. …

Read More »

टिपू सुलतान वाद: चंद्रकांत पाटील यांचा इशारा, तर महाराष्ट्रभर आंदोलन टिपू सुलतान नामकरण वाद पेटला

मराठी ई-बातम्या टीम मालाडमधील क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचे नाव देण्याविरोधात भाजपा, बजरंग दलाने नामकरणाला विरोध करत तीव्र आंदोलन केले. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते या मैदानाचे नामकरण करून उद्घाटन करण्यात आले. यावरून आता भाजपा आक्रमक झाली असून महाराष्ट्रभर यासंदर्भात …

Read More »