Breaking News

परमबीर सिंग यांच्याविरोधात खंडणी वसुलीप्रकरणी गुन्हा दाखल ८ पैकी २ पोलिस अधिकाऱ्यांना अटक बाकिच्यांनाही लवकरच अटक

मुंबई: प्रतिनिधी १०० कोटी रूपये खंडणी वसुलीप्रकरणी आरोप करून चर्चेत आलेले माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात खंडणी वसुली आणि मालमत्ता अपहारप्रकरणी मरीन लाईन्स पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. तसेच त्यांच्यासह आठजणांहून अधिक पोलिस अधिकाऱ्यांच्या विरोधात हा गुन्हा नोंदविण्यात आल्याने परमबीर सिंग यांना केव्हाही अटक होवू शकते अशी चर्चा पोलिस …

Read More »

भाजपाच्या त्या १२ आमदारांनी घेतली सर्वोच्च न्यायालयात धाव वर्षभरासाठी निलंबित करण्याच्या विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात धाव घेतली

नवी दिल्ली: प्रतिनिधी ओबीसी समाजाचे संपुष्टात आलेले आरक्षण पुन्हा मिळविण्यासाठी राज्य सरकारला आवश्यक असलेली माहिती केंद्रातील भाजपा सरकारने द्यावी असा ठराव विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशना दरम्यान विधानसभेत राज्य सरकारने मांडला. त्यावेळी वेळी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्याबरोबर विधानसभा अध्यक्षांच्या दालनात भाजपा आमदारांनी केलेल्या गैरवर्तनाबद्दल १२ जणांना वर्षभरासाठी निलंबित केल्याप्रकरणी भाजपाच्या त्या …

Read More »

पेगॅसस हेरगिरी प्रकरणाची सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी करा केंद्र सरकारविरोधात काँग्रेस नेत्यांची राजभवनसमोर निदर्शने, राज्यपालांना निवेदन सादर

मुंबई: प्रतिनिधी देशातील राजकीय नेते, मंत्री, पत्रकार, वकील, सामाजिक कार्यकर्ते यांचे फोन पेगॅसस सॉफ्टवेअरच्या माध्यमातून हॅक करून हेरगिरी केली जात आहे. काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील सहकारी, इतर विरोधी पक्षांचे नेते यांचीही हेरगिरी करण्यात आलेली आहे. संविधानाने दिलेल्या व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या अधिकारावरचा हा हल्ला तर आहेच, परंतु लोकशाही …

Read More »

रत्नागिरी, रायगडमधील परिस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांनी दिल्या प्रशासनाला या सूचना जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबई : प्रतिनिधी गेल्या २४ तासांत अतिवृष्टीमुळे विशेषतः रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत निर्माण झालेल्या पूर परिस्थितीबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका तातडीच्या बैठकीत आढावा घेतला. हवामान विभागाने पुढील तीन दिवस कोकण किनारपट्टीच्या भागात जोरदार पावसाचा इशारा दिला असून रेड आणि ऑरेंज अलर्ट दिला. मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच इतर संबंधित …

Read More »

जलयुक्त शिवार योजना ही झोलयुक्त योजनाच काँग्रेस ने केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर कॅगनंतर चौकशी समितीचेही शिक्कामोर्तब

मुंबई: प्रतिनिधी देवेंद्र फडणवीस सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेसने वारंवार केला होता. ही योजना कंत्राटदारांचे कुरण झाली होती. त्यावर कॅगच्या अहवालातही शिक्कामोर्तब करत गंभीर ताशेरे ओढले होते. महाविकास आघाडी सरकारने याची दखल घेत माजी सनदी अधिकारी विजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती. या समितीने …

Read More »

भाजपाने दिला लोणकर कुटुंबियांना कर्जफेडीसाठी आर्थिक मदतीचा हात स्वप्निल लोणकरच्या कुटुंबीयांच्या १९.९६ लाखांच्या थकित कर्जाची परतफेड

मुंबई: प्रतिनिधी एमपीएससी परीक्षा पास होऊन सुद्धा मुलाखती होत नसल्याने नैराश्यातून आत्महत्या केलेल्या स्वप्निल लोणकरच्या कुटुंबियांवर असलेल्या १९ लाख ९६ हजार ९६५ रूपयांच्या कर्जाची परतफेड करणारा धनादेश आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुपूर्द केला. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा …

Read More »

टाळेबंदी आणि निर्बंधांशिवाय सूचत नाही? सहनशक्ती संपत चाललीय….कडेलोट होईल किमान दोन लसीचे डोस घेतलेल्यांसाठी तरी लोकल सुरु करण्याबाबत राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाला रोखण्यासाठी देशात आणि महाराष्ट्रात अनेक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. त्याचे पालनही सर्वजण करत आहेत. मात्र हे निर्बंध कोणासाठी लागू आहेत? असा प्रश्न सध्या पडत असल्याचा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला करत टाळेबंदी आणि निर्बंधाच्या पलीकडे काही सूचत नाही असे दिसतय. त्यामुळे सर्वसामान्य जनतेची …

Read More »

१० वी निकाल गोंधळानंतरही आता शालेय शिक्षण विभागाची ही वेबसाईट पडली बंद विद्यार्थी झाले हवालदिल ११ वी च्या प्रवेशासाठी अर्ज कसा भरायचा?

मुंबई: विशेष प्रतिनिधी नुकताच १० वी परिक्षेचा निकाल जाहिर झाल्यानंतर ज्या वेबसाईटवरून निकाल जाहिर ती वेबसाईटच ५ ते ६ तास बंद पडल्याने विद्यार्थी-पालकांना सोसाव्या लागलेल्या मनस्तापानंतर आता ११ वी प्रवेशासाठी सीईटीची परिक्षेसाठी अर्ज भरण्यासाठीची वेबसाईट कालपासून बंद पडल्याची नवी माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे यासंदर्भात मंत्री वर्षा गायकवाड, शिक्षण …

Read More »

सुप्रिया सुळेंच्या पुढाकाराने राष्ट्रवादीची अजित पवारांना वाढदिनाची अशीही भेट कोरोना काळात अनाथ झालेल्या मुलांसाठी राष्ट्रवादीची 'राष्ट्रवादी जीवलग' योजना - खासदार सुप्रियाताई सुळे

मुंबई: प्रतिनिधी कोरोनामुळे अनेक मुलांना आपल्या पालकांना गमावावे लागले अशा ४५० मुलांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून ‘राष्ट्रवादी जीवलग’ ही अभिनव योजना सुरू करण्यात येत असल्याची घोषणा राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आज दिल्ली येथून फेसबुक लाईव्हवरुन करत आपले बंधु अजित पवार …

Read More »

आरक्षणप्रश्नी भाजपा नव्हे तर काँग्रेसचा नेता करतोय शिष्टाई आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथील करण्यासाठी अशोक चव्हाणांचे नवी दिल्लीत भेटसत्र

नवी दिल्ली : प्रतिनिधी ओबीसी समाजाचे राजकिय आरक्षण संपुष्टात आल्यानंतर पुन्हा ओबीसींना आरक्षण मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी घोषणा भाजपाच्या अनेक नेत्यांनी करत चक्काजाम आंदोलन करत आहे. मात्र याप्रश्नी भाजपाचा एकही नेता संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु झाल्यानंतर दिल्लीत एकाही केंद्रीय मंत्र्याला किंवा भाजपाच्या वरिष्ठ नेत्याला भेटायला गेला नाही. मात्र …

Read More »