अहमदनगर: प्रतिनिधी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासन करीत असलेल्या प्रयत्नांना श्री साईबाबा विश्वस्त संस्थानच्या ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प आणि आरटीपीसीआर प्रयोगशाळेमुळे बळकटी येणार आहे. श्री साईबाबांनी दिलेली मानवतेची आणि गोरगरीबांना अडचणीच्या काळात मदतीची शिकवण संस्थानने हा प्रकल्प उभारुन जपली असल्याचे कौतुकोद्गार मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काढले. तसेच, सध्याच्या परिस्थितीत ऑक्सीजनसाठी …
Read More »अनुदानासाठी चंद्रकांत पाटलांचे भाजपा किसान मोर्चाच्या अध्यक्षांनाही पत्र केंद्र सरकारकडे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मागणी
पुणे: प्रतिनिधी मान्सूनच्या तोंडावर खतांच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय केंद्राने घेतला. खताच्या किंमती वाढीचा निर्णय मागे घेण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलेली असतानाच खत दरवाढ रद्द करण्याऐवजी खत खरेदीसाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्याची मागणी भाजपाने केली. विशेष म्हणजे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंत्री सदानंद गौडा यांच्याबरोबरच भाजपाच्या …
Read More »पंतप्रधान मोदींचा आता शेतकऱ्यांना झटका: पवार म्हणाले, निर्णय तात्काळ मागे घ्या कृषी खतांच्या किंमती कमी करा
मुंबई: प्रतिनिधी देशात एकाबाजूला जवळपास सर्वच राज्यांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लॉकडाऊन लागू असताना सर्वसामान्य नागरीक, शेतकरी आदींना मदतीचा हात देण्याऐवजी केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी महत्वाचे असलेल्या खतांच्या किंमतीत भरमसाठ वाढ करून शेतकरी वर्गाला आणि सर्वसामान्य नागरीकांना महागाईच्या खाईत लोटू पहात असल्याने हा निर्णय योग्य नसल्याचे सांगत ही भाववाढ तातडीने रोखण्याच्या अनुषंगाने …
Read More »वाचा, राज्य मंत्रिमंडळाने घेतलेले महत्वाचे निर्णय राज्यातील ऑक्सिजन उत्पादन, पुणे मेट्रो आणि इतर महत्वाचे निर्णय
मुंबई: प्रतिनिधी राज्यात ३ हजार मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादनाचे उद्दीष्ट ठेवण्यात आले असून महाराष्ट्र मिशन ऑक्सिजन स्वावलंबन अंतर्गत उद्योग घटकांना विशेष प्रोत्साहन मंजूर करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. सद्यस्थितीत महाराष्ट्रासह संपूर्ण भारत देश कोरोना-19 महामारीच्या दुसऱ्या लाटेचा सामना करीत आहे. त्यातच …
Read More »शेतकऱ्यांना धानाच्या भरडाईकरिता विशेष अनुदान मंजूर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
मुंबई : प्रतिनिधी कोरोना महामारीची स्थिती लक्षात घेऊन तसेच अवकाळी पावसामुळे धानाची नासाडी होऊ नये म्हणून एकवेळची विशेष बाब म्हणून धानाच्या भरडाईकरिता अनुदान मंजूर करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. एकूण २४४ कोटी रुपये इतक्या रकमेच्या खर्चास मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. पणन हंगाम …
Read More »महसुली वाढीसाठी वाटप झालेल्या सरकारी जमिनींची किंमत- दंडाची एकरकमी वसुली राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
मुंबई : प्रतिनिधी नागरी जमीन कमाल धारणा व विनियमन निरसन अधिनियमाच्या पार्श्वभूमीवर एकरकमी दंडात्मक रक्कम तसेच अधिमूल्य रक्कम आकारण्याबाबत आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. १ ऑगस्ट २०१९ शासन निर्णयप्रमाणे निश्चित केलेल्या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या दुष्टीकोनातून योजनाधारकांकडून, कलम २० च्या आदेशामध्ये नमूद …
Read More »मोदी मत्सर हीच राज्याची प्राथमिकता आहे काय? भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांचा सवाल
मुंबई: प्रतिनिधी राज्यात जनहितार्थ आम्ही सरकार सोबत आहोत पण दुर्दैवाने राज्य सरकार जे निर्णय घेतले जातात त्यामध्ये दोनच बाबीं वारंवार दिसतात. एक म्हणजे मोदी मत्सरात हीच प्राथमिकता मानून निर्णय होतात की काय? आणि केंद्र सरकारला बदनाम करण्यासाठीच निर्णय होतात की काय? असे प्रश्न आम्हाला पडतात, अशा शब्दांत राज्यातील आघाडी सरकारवर …
Read More »एसआरपीएफ जवानांसाठी आनंदाची बातमी: बदलीकरता आता १५ वर्षांची अट रद्द पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय
मुंबई : प्रतिनिधी राज्य राखीव पोलीस दलातील जवानांच्या प्रश्नांबाबत आज मंत्रालयात गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. या जवानांच्या जिल्हा पोलीस दलातील बदलीकरता आवश्यक सेवेची अट १५ वर्षांवरून १२ वर्षे करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच जिल्हा पोलीस दलातील बदलीनंतर …
Read More »शेतकऱ्यांना खत पुरवठ्यासाठी युरीयाचा दीड लाख मेट्रीक टन साठा खरीप हंगामासाठी खतं पुरवठ्याबाबत कृषीमंत्र्यांकडून आढावा
मुंबई : प्रतिनिधी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रथमच दीड लाख मेट्रीक टन युरियाचा साठा करण्यात येत आहे. एकाच वेळी मागणी वाढली तर तुटवडा जाणवू नये आणि वेळेवर पुरवठा व्हावा यासाठी प्रत्येक जिल्ह्यात बफर स्टॉक केला जात आहे. येत्या १५ दिवसांमध्ये त्याची कार्यवाही पूर्ण करावी. संघभावनेने काम करून खरीपासाठी शेतकऱ्यांना दिलासा …
Read More »टास्कफोर्स स्थापून सर्वोच्च न्यायालयाकडून मोदींच्या अपयशावर शिक्कामोर्तब कोरोना प्रतिबंधक लसीचे 'राष्ट्रीय धोरण' जाहीर करावे : नाना पटोले
मुंबई : प्रतिनिधी केंद्रातील मोदी सरकार कोवीड परिस्थिती हाताळण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. केंद्र सरकारच्या गलथानपणामुळे लसीकरण मोहिमही फसली आहे. देशभरात लसीकरण केंद्राबाहेर लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. १७ कोटी जनतेला लस दिल्याचे मोदी सरकार सांगते पण लाखो लोकांची दुसऱ्या डोसची कालमर्यादा उलटून गेली तरी अजून त्यांना दुसरा डोस …
Read More »
Marathi e-Batmya