Breaking News

ईडी कारवाईवर पवार म्हणाले, विरोधकांविरोधात सरकारी तपास यंत्रणांचा वापर सरनाईक कुटुंबियांच्या विरोधात ईडी कारवाईवर पवारांची प्रतिक्रिया

मुंबईः प्रतिनिधी महाविकास आघाडीचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे प्रवक्ते आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपावर थेट निशाणा साधत म्हणाले की, लोकांच्या प्रश्नाची उत्तरं देण्याऐवजी राजकीय विरोधकांविरोधात सरकारी तपास यंत्रणांचा वापर केला जात असल्याची टीका केली. महाराष्ट्रात पुन्हा सत्ता मिळत नाही …

Read More »

शिवसेना प्रवक्ते प्रताप सरनाईक यांच्या मुलाला ईडीने घेतले ताब्यात आघाडीतील सहयोगी पक्षांकडून भाजपावर टीकेचा सूर

मुंबईः प्रतिनिधी आर्किटेक्चर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी सातत्याने आवाज उठविल्याप्रकरणी शिवसेनेचे प्रवक्ते प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर ईडीने आज सकाळी धाडी टाकत सरनाईक यांचे सुपुत्र विहंग यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. नाईक प्रकरणात सरनाईक यांनी सातत्याने आवाज उठविला. त्यामुळे या प्रकरणाची बंद झालेली फाईल राज्य सरकारने पुन्हा उघडली. तसेच पुढील …

Read More »

९ हजार शाळांमध्ये ३ लाख विद्यार्थ्यांनी लावली उपस्थिती राज्यातील १ लाख ८६ हजार शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी १६४३ कोरोना पॉझिटीव्ह

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील ९ वी ते १२ वी पर्यंतचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर कोरोनाची बाधा विद्यार्थ्यांना होवू नये या उद्देशाने या वर्गांना शिकविणाऱ्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानुसार राज्यातील १ लाख ८६ हजार शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी १६४३ जणांचे अहवाल …

Read More »

२४-२५ कोटी लस वाटपासाठी टास्क फोर्स पण राजकारण न करण्याची सूचना द्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची पंतप्रधान मोदींकडे तक्रार

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाची लाट पुन्हा येत आहे, अशा परिस्थितीत केंद्राच्या सूचनेनुसार तसेच योग्य त्या सावधतेने आम्ही जनजीवन पूर्वपदावर आणत आहोत. मात्र काही राजकीय पक्ष जनतेच्या जीवाशी खेळत आरोग्याचे नियम मोडत रस्त्यावर उतरून राजकीय आंदोलने करीत आहेत त्यांना परिस्थितीची कल्पना देऊन योग्य ती समज द्यावी अशी सूचना द्यावी अशी मागणी …

Read More »

खुशखबर : मनोरीच्या प्रकल्पातून समुद्राचे गोड पाणी मुंबईकरांना मिळणार प्रकल्पाचे पुढील काम करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आदेश

मुंबई : प्रतिनिधी मुंबईत मे व जून महिन्यातील पाणी कपात टाळण्यासाठी मनोरी येथे समुद्राचे २०० एमएलडी खारे पाणी गोडे करणाऱ्या नि:क्षारीकरण प्रकल्प उभारणीचा आढावा घेऊन प्रकल्पाची पुढची प्रक्रिया सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी दिले.वर्षा या शासकीय निवासस्थानी २०० एमएलडी नि:क्षारीकरण प्रकल्प उभारणीबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी …

Read More »

कोरोना : कालच्या तुलनेत बाधितांमध्ये हजाराने घट मात्र घरी जाणाऱ्यांपेक्षा जास्त ४ हजार १५३ नवे बाधित तर ३ हजार ७२९ बरे झाले तर ३० मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यात आज आढळून आलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येपेक्षा कालच्या तुलनेत १ हजाराने घट आलेली आहे. काल ही संख्या ५ हजार ७६० इतकी संख्या आढळून आली होती. त्यात हजाराने घट होत ४ हजार १५३ इतके बाधित आढळून आलेले आहेत. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या १७ लाख ८४ हजार ३६१ वर तर …

Read More »

राज्याचे खरे मुख्यमंत्री कोण? उध्दव ठाकरे कि अजित पवार अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांचा उध्दव ठाकरे यांना सवाल

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे लोकनियुक्त मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आहेत की अजित पवार असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत उपस्थित करून खळबळ माजवली. खुद्द राज्य सरकारच्या महावितरण महामंडळाने घरगुती वापराच्या वीजबिलावर ५० टक्के सवलतीचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना सादर केलेला प्रस्ताव उपमुख्यमंत्री अजितदादा …

Read More »

महाराष्ट्रात येवू इच्छिणाऱ्या दिल्ली, गोवा, राजस्थान, गुजरातवाल्यांची कोरोना टेस्ट आवश्यक राज्य सरकारकडून missionbegainagain नवे निर्देश

मुंबईः प्रतिनिधी देशातील नवी दिल्ली, राजस्थान, गोवा, गुजरात राज्यांमध्ये दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या चारही राज्यातून महाराष्ट्रात विमान, रेल्वे आणि रस्त्याने येवू इच्छिणाऱ्यांची कोरोना चाचणी अहवाल निगेटीव्ह असणे राज्य सरकारने बंधनकारक करण्यात आले आहे. यासंदर्भातील आदेश missionbegainagain अंतर्गत जारी करण्यात आले आहे. या आदेशानुसार ज्यांच्याकडे …

Read More »

मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने औरंगाबाद खंडपीठाचा महत्वपूर्ण निर्णय तुर्तास ईडब्लूएसचा दर्जा देण्यास होकार

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ईडब्ल्युएसचे प्रमाणपत्र सादर केल्याने सदर मराठा समाजातील व्यक्तीला ईडब्ल्युएस अंतर्गत असलेले फायदे देण्याचा महत्वपूर्ण निकाल देत पुढील सुणावनी १ डिसेंबर रोजी घेणार असल्याचे स्पष्ट केले. बीड जिल्ह्यातील मराठा समाजातील एका ज्ञानेश्वर पिराजी …

Read More »

महापरिनिर्वाण दिनी चैत्यभुमीवर गर्दी नको, घरातूनच अभिवादन करा अभिवादन, मानवंदनेचे थेट प्रक्षेपण; ऑन-लाईन माध्यमातून दर्शन

मुंबई : प्रतिनिधी महापरिनिर्वाण दिन हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा दिवस आहे. या अभिवादनासाठी ज्या-ज्या गोष्टी करायच्या, त्या सर्व गोष्टी केल्या जातील. त्यामध्ये कुठेही कमीपणा येऊ देणार नाही. पण कोरोना संकटामुळे यावर्षी मात्र जनतेने अभिवादनासाठी मुंबईतील चैत्यभूमीवर गर्दी करू नये. परिस्थितीचे भान ओळखून या अनुयायांनी आपल्या कृतीतून …

Read More »