Breaking News

धारावी पुर्नवर्सन प्रकल्प अदानीला? शेखलिंक कंपनीवर अधिकाऱ्याची मेहेरनजर

मुंबईः प्रतिनिधी मागील अनेक वर्षापासून शहरातील धारावी झोपडपट्टीच्या पुर्नवर्सनाचे भिजत पडलेले घोंगडे मार्गी लागण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न सुरु केले. मात्र या प्रकल्पाला गती देण्याच्या नादात एका अधिकाऱ्याने मुख्यमंत्र्यांना न विचारताच परस्पर शेखलिंक कंपनीवर मेहेरनेजर दाखविण्यास सुरुवात केल्याने हा प्रकल्प शेखलिंकऐवजी अदानी समुहाला देण्याच्या हालचालींना सुरुवात झाल्याची माहिती विश्वसनीय …

Read More »

मराठा आरक्षणासाठी आचारसंहिता शिथिल करा निवडणूक आयोगाला पत्रः महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील पदवुत्तर वैद्यकीय शिक्षणात मराठा आऱक्षण होण्याबाबत सर्वोच्च आणि उच्च न्यायालयालने दिलेल्या निकालावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र आचारसंहितेमुळे याप्रश्नी तातडीने तोडगा काढण्यात अडचण येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी आचारसंहितेत सूट मिळावी अशा आशयाचे पत्र निवडणूक आयोगाला पाठविण्यात आल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री …

Read More »

राज्यातील गंभीर परिस्थितीवर चर्चा करायचीय, मुख्यमंत्री महोदय वेळ द्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी सातारा, सोलापूर, बीड, अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात १९७२ पेक्षा गंभीर दुष्काळी परिस्थिती आहे. मी या जिल्हयांचा दौरा केल्यानंतर विस्ताराने मांडलेल्या समस्यांकडे राज्याचे प्रमुख म्हणून आपण लक्ष घालावे असे सांगत दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी वेळ द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका …

Read More »

राज्यात मान्सूनचे आगमन जरा उशीराच १० जूनपर्यंत मुंबईत आगमन होणार असल्याचा स्कायमेटचा अंदाज

मुंबईः प्रतिनिधी गतवेळच्या मान्सूनमध्ये पुरेसा पाऊस न पडल्याने जानेवारी-फेब्रुवारी महिन्यातच राज्यातील जनतेला दुष्काळी परिस्थितीचे चटके जाणवू लागले. तर मार्च महिन्यापासून पाणी टंचाईला सामोरे जावू लागले. त्यातच यंदा राज्यातील मान्सून उशीराने दाखल होणार असल्याचा अंदाज स्कायमेट या हवामान कंपनीने व्यक्त केला. मान्सूनचे आगमन केरळमध्ये चार जूनला होण्याची शक्यता व्यक्त करत सरासरीच्या …

Read More »

राफेलमधील चाेरीच्या कागदपत्रांची संरक्षण मंत्रालयाकडून चौकशी माहिती अधिकारात मंत्रालयाची स्पष्टोक्ती

मुंबईः प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयात राफेल खरेदी कराराच्या कागदपत्रांवरून मोदी सरकारकडून वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत. तसेच याप्रकरणातील कागदपत्रे चोरीस गेल्याचा दावा केला करण्यात आला होता. या चोरीस गेलेल्या कागदपत्र प्रकरणाची संरक्षण मंत्रालयाकडून अंतर्गत चौकशी सुरु असल्याची माहिती अधिकार कायद्यांतर्गत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना दिली. माहिती अधिकारातंर्गत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर …

Read More »

टँकर देण्यासाठी २०१८ च्या लोकसंख्येचा आधार घ्या मराठवाड्यातील ३ जिल्ह्याच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी पाण्याचे टँकर सुरू करताना २०११ची लोकसंख्या लक्षात न घेता 2018 ची लक्षात घेऊन पिण्याचा पाणी पुरवठा करावा. जनावरांसाठी याच पद्धतीने पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. वर्षा निवासस्थानातून ऑडिओ ब्रिजच्या माध्यमातून परभणी, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील सरपंच, ग्रामसेवक, गट विकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी …

Read More »

दुर्बल व वंचित घटकांसाठीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरु करा! काँग्रेसची शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे मागणी

मुंबई : प्रतिनिधी शिक्षण हक्क कायद्यानुसार दुर्बल व वंचित घटकासाठी शालेय प्रवेशात राखीव असणाऱ्या २५  % जागांसाठीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सध्या बंद आहे, ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया त्वरित सुरू करून त्याची मुदत शाळा सुरू झाल्यानंतर ३ महिने सुरू ठेवावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे …

Read More »

काळीजादू करणाऱ्यांशी भाजपचा संबंध काय? चौकशी करण्याची काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने भारतीय जनता पक्षाकडून सर्व हातखंडे वापरले जात आहेत. भिवंडीमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूमबाहेर होमहवन, जादूटोणा करण्याचा प्रकार हा त्यातलचा एक आहे. भाजपच्या कोणत्या नेत्याच्या सांगण्यावरून जादूटोणा करणात आला? असा सवाल उपस्थित करत याची चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते …

Read More »

२००५ पूर्वीच्या शिक्षक-प्राध्यापकांनाही नव्या पेन्शन योजनेचा लाभ मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील लाखो शिक्षक आणि प्राध्यापकांची नियुक्ती २००५ पूर्वीची असेल, मात्र ते शिकवित असलेल्या संस्थेला त्यानंतर १०० टक्के ग्रँट मिळालेले असेल तर त्यांना नवी पेन्शन योजनाच लागू होणार असल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने नुकताच दिला. विविध शासकिय आणि खाजगी शाळांमधील जवळपास १५ ते २० शिक्षकांनी राज्य …

Read More »

कौशल्यपूर्ण प्रशिक्षणामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना व्यवसाय संधी राज्यपाल राव यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि नियुक्ती पत्रांचे वाटप

मुंबई : प्रतिनिधी ज्येष्ठांसाठी आरोग्यसेवा देणाऱ्या कौशल्यपूर्ण प्रशिक्षणामुळे आदिवासी विभागातील विद्यार्थ्यांना व्यावसायाच्या सुवर्ण संधी देशातच नव्हे तर विदेशातही उपलब्ध होणार आहेत. रूग्णसेवा करताना त्यांचा आत्मविश्वास वाढून समाजाच्या मुख्य धारेत येण्यास सहकार्य लाभणार आहे, असे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी सांगितले. आदिवासी विकास विभाग आणि ग्रॅण्डेज सर्व्हसिेस यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी …

Read More »