सोलापूरने केला २०० चा टप्पा पार २१६ वर संख्या पोहोचली, मृतकांची संख्या १४ वर

सोलापूर: प्रतिनिधी
शहरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने आज २०० चा टप्पा पार केला असून २१६ वर ही संख्या पोहोचली. आज २० रूग्णांची भर पाडली. आतापर्यंत मृतकांच्या संख्येतही वाढ झाली असून ही संख्या १४ वर पोहोचली.
शहरातील शास्त्री नगरमध्ये ६, कुमठा नाका २, नई जिंदगी १, अशोक चौक १, एकता नगर २, निलम नगर २, केशव नगर १, मनोरमा नगर विजापूर रोड १, सदर बझार लष्कर १, कुंभार गल्ली लष्कर १, साईबाबा चौक १, बापुजी नगर १ असे रूग्ण आढळून आले आहेत. दरम्यान एका महिलेचा ७ तारखेला कोरोनामुळे मृत्यू झाला.
घरगुती विलगीकरणात ६ हजार १८१ जणांना ठेवण्यात आले. तर संस्थात्मक विलगीकरणात३ हजार २१७ जणा ठेवण्यात आले आहे. तसेच १४ दिवसाचा विलगीकरणाचा कालावधी ४ हजार १३६ जणांनी पूर्ण केला आहे. २ हजार ९९३ जणांची तपासणी करण्यात आली असून यातील २ हजार ८४० जणांचे अहवाल नकारात्मक आले आहेत. तर १५३ जणांचे प्रलंबित आहेत. त्याचबरोबर आज दिवसभरात १७५ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी १५५ जणांचे अहवाल नकारात्मक आले.

About Editor

Check Also

प्रकाश आबिटकर यांची माहिती, एसएनसीयू व बालकांवरील उपचारांसाठी सर्वतोपरी उपाययोजना आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करणार

राज्यातील नवजात बालकांना वेळेवर, दर्जेदार आणि अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, तसेच एस एन सी यू …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *