Breaking News

डोक्यावरून पाणी गेल्यावर मुख्यमंत्र्यांना लक्षात आले राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांचा उपरोधिक टोला

शिर्डी: प्रतिनिधी राज्यात संकट आले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची महाजनादेश यात्रा थांबवायला पाहिजे होती. मात्र त्यांची यात्रा सुरुच असून आम्ही आक्षेप घेतल्यावर त्यांनी एक दिवस बंद ठेवली. जर मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना वेळीच सुचना द्यायला हव्या होत्या. मात्र डोक्यावरुन पाणी वाहायला लागल्यावर त्यांच्या लक्षात आल्याचा उपरोधिक टोला अजितदादा पवार यांनी …

Read More »

आरोग्य विभाग म्हणते आम्ही कर्मचारी भरणार पण १६०० अधिपारिचारीकांना नाही अधिपरिचारिकाचे आझाद मैदानावर बेमुदत उपोषण

मुंबईः प्रतिनिधी एकीकडे राज्य सरकारने सरकारी नोकर मेगा भरतीचे आश्वासन महाराष्ट्रातील जनतेला दिले आहे. तर दुसऱ्यापासूला बंधपत्रित अधिपारिकांना नोकरीत कायम न करण्याचे धोरण आरोग्य विभागाने स्विकारले आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या या फसवणूकीच्या धोरणाच्या विरोधात आणि बंधपत्रित अधिपरिचरिकांना कायम सेवेत समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाकडून आझाद मैदानावर …

Read More »

विधवा-वृद्धांच्या अनुदानात भरीव वाढ राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबईः प्रतिनिधी संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात ६०० रुपयांवरून १००० रुपये वाढ करण्यासह एक अपत्य असणाऱ्या विधवांना ११०० रुपये तर दोन अपत्य असणाऱ्या विधवांना १२०० रुपयांचे अर्थसहाय्य देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या योजनांच्या अंमलबजावणीसाठी प्रतिवर्षी १६४८ कोटींच्या खर्चासही …

Read More »

सरकार प्रकल्पांसाठी १५ हजार कोटींचे कर्ज नव्याने घेणार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील ३१३ बांधकामाधीन पाटबंधारे प्रकल्पांपैकी ५२ प्रकल्पांसाठी १५ हजार कोटी रूपयांची गरज आहे. हे कर्ज घेण्यासाठी आझ झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. सद्यस्थितीत राज्यातील ३१३ बांधकामाधीन प्रकल्पांवर आहेत. या प्रकल्पांवर ८३ हजार ३०० कोटी रूपयांचा खर्च झालेला आहे. उर्वरित कामासाठी ९३ हजार ५७० कोटी रूपयांची गरज …

Read More »

राज्यातील पूरस्थिती हाताळण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी राज्याच्या बहुतांश भागामध्ये अभूतपूर्व पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक शहरांमध्ये आणि गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने हजारो लोक बेघर झाले आहेत. आतापर्यंत पूरामुळे १६ नागरिकांचा बळी गेला आहे. लाखो जनावरे वाहून गेली आहेत. पूरपरिस्थिती हाताळण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. सरकारने कुठलाही राजकीय अभिनिवेश न बाळगता पूरस्थिती हाताळण्यासाठी सर्वपक्षीय …

Read More »

सुषमा स्वराज अंनतात विलीन वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास

नवी दिल्लीः प्रतिनिधी माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांच्या पार्थिवावर दिल्लीतील लोधी रोड येथील स्मशानभूमीत अंत्यंसस्कार करण्यात आले. त्याआधी त्यांना शासकीय इतमामाप्रमाणे सलामीही देण्यात आली. सुषमा स्वराज यांच्या पार्थिवाला अखेरचा सलाम करताना त्यांच्या पतीचे आणि मुलीचे डोळे पाणावले होते. एवढंच नाही तर स्मशानभूमीत हजर असलेल्या प्रत्येकाचेच डोळे पाणावले. सुषमा स्वराज …

Read More »

राज्यातील पुरस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांना उशिरा जाणीव राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची उपरोधिक टीका

मुंबईः प्रतिनिधी सततच्या पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रात आणि कोकणात गंभीर परिस्थिती असून कोणीही राज्यकर्ता असो या संकटग्रस्त लोकांना बाहेर काढण्याची त्याच्यावर जबाबदारी आहे. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या राजनैतिक कामात गुंतलेले होते. पण उशिरा का होईना ते त्यावर आता काम करतायत हे चांगलं असल्याची उपरोधिक टीका त्यांनी केली. काही निवडक …

Read More »

यात्रा काढा; पण राजधर्म विसरू नका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा उपरोधिक सल्ला

मुंबई : प्रतिनिधी मते मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हव्या तेवढ्या यात्रा काढाव्यात. पण यात्रेच्या नादात राजधर्म विसरून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नये. आणखी कोणत्याही शेतकऱ्यावर धर्मा पाटील होण्याची दुर्दैवी वेळ आणू नका असा उपरोधिक सल्ला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राज्य सरकारला दिला. मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा अकोल्यात येण्याच्या आदल्याच दिवशी जिल्ह्यातील सहा …

Read More »

पुरपस्थितीमुळे इंजिनिअरींग व वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेला मुदत वाढ द्या उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री वायकर यांची परीक्षा आयुक्तांना सुचना

मुंबई : प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पुरग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्याने इंजिनिअरींग व वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेश प्रकियेस तात्काळ मुदत वाढ द्यावी, अशी सूचना उच्च व तंत्रशिक्षण, गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त यांना दिल्या. कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार …

Read More »

यात्रा अर्ध्यावर सोडून पुरग्रस्त लोकांच्या मदतीसाठी जयंत पाटील यांनी घेतली धाव रात्रभर पुराच्या पाण्यात फिरुन ग्रामस्थांना दिला दिलासा

सांगली: प्रतिनिधी सांगली जिल्हयातील अनेक गावांना पुराने वेढा दिला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पुरात अडकलेल्या ग्रामस्थांच्या मदतीला धावून आले आहेत. स्थलांतरीत १४ हजार लोकांना जेवणाची सोय करत जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असल्याचे दाखवून दिले. सांगली जिल्हयाला गेले दोन दिवस पुराने वेढा दिला असून नागरीकांचे मोठया प्रमाणात हाल …

Read More »