सोलापूरची संख्या ३ ने वाढत ६८ वर मात्र ते सारीचे रूग्ण एकाचा मृत्यू

सोलापूर: प्रतिनिधी
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच सोलापूरातील कोरोना रूग्णांच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे. आज ५८ जणाची तपासणी करण्यात आली होती. यापैकी ३ जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले असल्याने एकूण रूग्णांची संख्या ६८ वर पोहोचली आहे. तर एका रूग्णाचा मृत्यू झाला असून एकूण मृतकांची संख्या ६ वर पोहोचल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
याशिवाय आणखी ३३६ जणांचे कोरोना चाचणीचे अहवाल बाकी असल्याची माहिती त्यांनी दिली. निदान झालेले रूग्ण हे सिध्देश्वर पेठ, रेल्वे स्टेशन, बापूजी नगर येथील असून त्यांना सारी या आजाराचे निदान झाले आहे.
सद्यपरिस्थितीत ३ हजार ८३२ जण होम क्वारंटाईनमध्ये असून १८५९ जणांचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण केलेला आहे. तर संस्थात्मक विलगीकरणात १८३७ जण असून १४ दिवसांचा कालावधी पूर्ण केलेले ९६७ जण असल्याचेही त्यांनी सांगितले.

About Editor

Check Also

प्रकाश आबिटकर यांची माहिती, आरोग्य विभागाचे प्रशिक्षण धोरण जाहीर प्रशिक्षण धोरणात आमुलाग्र बदलाने कौशल्यवृद्धीला चालना

राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणावर भर देण्यात येत आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *