मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमिटेशन) विधेयकावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने पाठिंबा दिल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत असतानाच खासदार सुप्रिया सुळे यांनी या वृत्तांचे जोरदार खंडण केले. “बिल आलेच नाही, मग आमची भूमिका कशावरून सांगायची? जे अस्तित्वातच नाही, त्यावर चर्चा करून अफवा पसरवण्याला काही अर्थ नाही,” अशा शब्दांत सुरू असलेल्या अफवांचा समाचार …
Read More »जयंत पाटील यांची माहिती, काल मध्यरात्री वर्षा बंगल्यावर काय घडले मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीला गेल्यावर काय घडलं याची सांद्यत माहिती जयंत पाटील यांनी दिली
काल मंगळवारी मध्यरात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आमदार जयंत पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल अचानक वर्षा बंगल्यावर पोहोचले. यावरून महाविकास आघाडीत फूट पडल्याचे वृत्त पसरताच जयंत पाटील यांनी आपल्या मतदारसंघातील ईश्वरपुर …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, शेतकऱ्यांची ४८ हजार कोटींची वीजबिल थकबाकी माफ शेतकऱ्यांच्या कृतज्ञता सोहळयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
राज्यातील शेतकऱ्यांना साडेसात अश्वशक्तीपर्यंत वीजबिल आकारले जात नाही. मात्र, त्यांची वीज वापराची ४८ हजार कोटींची जुनी थकबाकीही आता माफ केली जाणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मुंबईत सत्कार सोहळ्यात बोलताना जाहीर केले. तुतारींच्या गजरात राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शेकडो शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेचे उत्स्फूर्त स्वागत केले. शेतकऱ्यांची पाटी कोरी व्हावी आणि या …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा, भाजपा सरकारला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय शेतकरी गप्प बसणार नाही देशाचा कारभार ‘बंच ऑफ थॉट’नुसार चालतो; दिल्लीतील सरकार ‘हम दो, हमारे दो’साठी; शेतकरी प्रश्न, महागाई, बेरोजगारीवर पंतप्रधान मोदी गप्प
मागील १२ वर्षापासून ‘चौकीदार ही चोर है’ अशी पार्श्वभूमी आपल्या देशाला लाभली असून नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून शेतकरी संकटात सापडलेला आहे. शेतमालाला भाव नाही, शेती करणे महाग झाले आहे, शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत, बेरोजगारी वाढलेली आहे पण पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र शेतकरी, महिला अत्याचार, बेरोजगारी, महागाई यावर गप्प आहेत. अमेरिकेसमोर नरेंद्र मोदी सरेंडर झाल्याने आता आपला …
Read More »आदिती तटकरे यांचे निर्देश, ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी बालगृहांची सुविधा उपलब्ध करा मुलींचे शिक्षण, बालविवाह रोखण्यासाठी सकारात्मक कार्यवाहीचे निर्देश
राज्यातील ऊसतोड कामगार स्थलांतरित होत असताना त्यांच्या मुलांना संबंधित जिल्ह्यांतील बालगृहांमध्ये तात्पुरता निवारा उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक कार्यवाही करावी, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. राज्यातील बालगृहांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महिला व बालविकास मंत्री आदिती …
Read More »दत्तात्रय भरणे यांची माहिती, शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे बियाणे मिळण्यासाठी सर्वसमावेशक धोरण बियाणा व्यवस्थेतील प्रत्येक टप्पा अधिक सक्षम करणे हे शासनाचे उद्दिष्ट
राज्यातील शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे बियाणे उपलब्ध व्हावे, निकृष्ट अथवा बनावट बियाण्यांमुळे त्यांचे नुकसान होऊ नये आणि बियाणे उत्पादन, साठवणूक, तपासणी व विक्री प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि उत्तरदायित्व निर्माण व्हावे, यासाठी सर्व संबंधितांच्या सूचनांचा विचार करून राज्य शासन सर्वसमावेशक धोरण तयार करणार असल्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. मंत्रालयात बियाणे तपासणीच्या उत्तरदायित्वाच्या कार्यपद्धतीत (SOP) बदल करून …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे निर्णय मुख्यमंत्री फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री आदींसह जवळपास सर्व मंत्री उपस्थित
राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत एकूण ९ निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये केंद्र पुरस्कृत ‘अबर्न चॅलेंज फंड’ अभियान राज्यात राबविणार, बीड जिल्हा क्रीडा संकुलाच्या २४.९५ कोटींच्या कामांना मान्यता, अपराधी परिविक्षा अधिनियमांतर्गत कैदेतील बंदींजनांच्या पुनर्वसन अर्थ सहाय्यात २५ हजार रुपयांची वाढ, एसटीच्या जागांच्या विकासासाठी पीपीपी धोरणातून सवलत, गौण खनिज उत्खनन नियमात सुधारणा …
Read More »महापालिका, नगरपरिषद, नगरपंचायतींना मालमत्तांच्या माध्यमातून उत्पन्नाचे स्त्रोत सुरु करण्यासाठी मुद्रीकरण धोरण राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
राज्यातील महानगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतींना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम व स्वावलंबी करण्यासाठी त्यांच्या मालकीच्या मालमत्तांच्या विनियोगातून उत्पन्न मिळविता येईल, अशा मुद्रीकरण (Asset Monetisation) धोरणास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालकीच्या जागा, इमारती, व्यावसायिक संकुले, बाजारपेठा, सार्वजनिक सुविधा, तसेच इतर …
Read More »शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी मोठा दिलासा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ च्या निकषात सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या निकष सुधारणेमुळे २०१९ च्या कर्जमाफी योजनेतील सुमारे १३ लाख शेतकऱ्यांसाठीची पन्नास हजार रुपयांपर्यंतची मर्यादा रद्द करून, नियमित कर्जमाफी मिळणार आहे. तर सन २०२६-२७ मधील नियमित …
Read More »माधुरी मिसाळ यांचे निर्देश, नगरपरिषद व नगरपंचायतीतील सेवाप्रवेश नियमांचा प्रस्ताव तातडीने सादर करा सेवाप्रवेश नियम सुधारण्यास गती, रिक्त पदभरती आणि बदली धोरणावर शासन सकारात्मक
राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतीमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक पावले उचलत सेवाप्रवेश नियम संविधानाच्या अनुच्छेद ३०९ अन्वये सुधारित करण्याचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र राज्य नगरपरिषद संवर्ग अधिकारी संघटनेच्या समस्यांबाबत आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. नगरविकास राज्यमंत्री माधुरी …
Read More »
Marathi e-Batmya