Breaking News

जयंत पाटील यांची टोला, सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे बडा घर आणि पोकळ वासा महाराष्ट्र आता थांबणार.. एवढं बोलून चालणार नाही

राज्याचा अर्थसंकल्प काल अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केल्यानंतर अर्थसंकल्पावरील चर्चेला आज विधानसभेत सुरुवात झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे बडा घर पोकळ वासा अशी खोचक टीका करत महाराष्ट्र आता थांबणार नाही एवढं बोलून चालणार नाही असा इशाराही यावेळी देत अजित पवार …

Read More »

शिवेंद्रराजे भोसले यांची घोषणा, मुंबई-गोवा महामार्गाच्या बांधकामाची त्रयस्त यंत्रणे मार्फत चौकशी मुंबई गोवा महामार्ग जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण करणार

मागील काही वर्षापासून रखड़लेल्या मुंबई – गोवा महामार्गाच्या बांधकामाची त्रयस्त यंत्रणे मार्फत इन कॅमेरा चौकशी केली जाईल. यात जे कोणी दोषी असतील त्यांच्या वर कड़क कारवाई केली जाईल. मात्र आता हा महामार्ग जानेवारी २०२६ पर्यन्त पूर्ण केला जाईल असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी आज विधानसभेत दिले. …

Read More »

उच्च न्यायालयाचे कोल्हापूर न्यायालयाला आदेश, कोरटकर प्रश्नी नव्याने सुनावणी घ्या प्रशांत कोरटकरांच्या अटकपूर्व जामिनावर नव्याने सुनावणीचे आदेश

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करून इतिहासकार इंद्रजीत सावंतांना जीवे मारण्याची धमकी देण्याचा आरोप असलेले नागपूरातील पत्रकार प्रशांत कोरटकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर पुन्हा नव्याने सुनावणी घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी कोल्हापूर सत्र न्यायालयाला दिले. उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले की, पोलिसांची बाजू न ऐकताच …

Read More »

रस्ते अपघात रोखण्यासाठी ‘अल्कोहोल’ सोबतच आता ‘ड्रग्स’ सेवन तपासणीही करणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची विधानसभेत माहिती

राज्यामध्ये रस्ते अपघातांवर नियंत्रण मिळवून अपघाती मृत्यू रोखण्यासाठी शासन विविध उपाय योजनांची अंमलबजावणी करीत आहे. रस्ते अपघात रोखण्यासाठी पोलिसांमार्फत नियमितपणे वाहन चालकांची अल्कोहोल सेवन तपासणी करण्यात येते. मात्र यापुढे आता ‘अल्कोहोल’ सोबत ड्रग्स सेवनाची तपासणीही करण्यात येईल. ड्रग्स सेवन तपासणीच्या मशीन लवकरच उपलब्ध करून देण्यात येतील, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत …

Read More »

नाना पटोले यांची मागणी, धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करु पाहणाऱ्या मंत्र्याला तंबी द्या मटनाच्या दुकानांना सर्टिफिकेट देण्याचा मंत्र्याचा नवा धंदा आहे का? त्यांना कोणी अधिकार दिला?

कोणते मटन कोणत्या दुकानातून व कोणाकडून घ्यावे अशा प्रकारचे फतवे मंत्री काढत असतील तर ते योग्य नाही. मंत्रीच अशा पद्धतीने धर्माधर्मात वाद निर्माण करण्याचे काम करत आहेत, यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल व ते महाराष्ट्रासाठी योग्य नाही. दुकानदारांना सर्टिफिकेट वाटण्याचा अधिकार मंत्र्याला कोणी दिला? हा नवीन धंदा स्वतःचे खिसे …

Read More »

अंबादास दानवे यांचा आरोप, सर्वसामान्य जनता, शेतकऱ्यांना फसवणारे सरकार पीक विम्यात मोठ्या प्रमाणात घोटाळा

सर्वसामान्य जनता, शेतकरी यांची सरकारने  दिशाभूल केली असून  गुलाबी स्वप्नं दाखवत घोषणांचा मोठया प्रमाणात पाऊस सरकारने केल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी २६० अनव्ये विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर बोलताना केला. पुढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, या सरकारच्या काळात शेतकरी सुखी नाही त्यामुळे राज्य सुखी सुखी नाही. शेतमालाला हमीभाव …

Read More »

अजित पवार यांची घोषणा,.. तरच गृहनिर्माण सोसायटीच्या व्यावसायिक गाळ्यात बियर किंवा दारुदुकान सोसायटीचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ बंधनकारक विधानसभेत केली घोषणा

राज्यात गृहनिर्माण सोसायट्यांच्या व्यावसायिक गाळ्यात बियर किंवा दारुचे दुकान सुरु करायचे असेल तर यापुढे संबंधित सोसायटीचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ बंधनकारक राहील. सोसायटीच्या ‘ना हरकत प्रमाणपत्रा’शिवाय राज्यात नवीन बियर शॉपी किंवा दारु दुकान सुरु करता येणार नाही, अशी रोखठोक आणि स्पष्ट भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत जाहीर केली. अजित पवार …

Read More »

मणिपूर प्रश्नी पंतप्रधान मोदींवर टीकाः काँग्रेस खासदार गोगई आणि अर्थमंत्री सीतारामण यांच्यात खडाजंगी अर्थसंकल्पातील तरतूदींवर न बोलता इतर विषयांवर वाद

पंतप्रधान मोदी सतत सभागृहाला त्यांच्या उपाययोजनांबद्दल माहिती देत ​​असल्याबद्दल अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विधानाला उत्तर देताना, काँग्रेस खासदार गौरव गोगोई म्हणाले की, त्यांना पंतप्रधान मोदींचा खूप आदर आहे, परंतु त्यांनी सरकारवर आरोप केले आहेत, परंतु माजी पंतप्रधानांविरुद्ध टिप्पणी केली आहे. या विधानाला उत्तर देताना, अर्थमंत्री निर्मला सीतारामण म्हणाले की, विरोधकांनी …

Read More »

राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा म्हणतात, फेव्हरिट अँक्टर नरेंद्र मोदी मोदी हे नेते नाहीत तर अभिनेते

राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी अलीकडेच नरेंद्र मोदींना त्यांचा आवडता अभिनेता कोण आहे या प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर, विरोधकांनी पंतप्रधान आणि भाजपा दोघांवरही निशाणा साधण्याची संधी साधली आहे. रविवारी रात्री जयपूर येथे आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी (आयफा) पुरस्कार सोहळ्यात पत्रकारांशी संवाद साधताना सीएम शर्मा यांनी ही टिप्पणी केली. त्यांच्या आवडत्या अभिनेत्याबद्दल …

Read More »

वाणिज्य सचिव सुनिल बर्थवाल म्हणाले, अमेरिकेशी अद्याप व्यापारी चर्चा सुरु टेरिफबाबत अद्याप निर्णय नाही

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताने त्यांच्यावरील कर कमी करण्यास “सहमत” असल्याचे म्हटल्यानंतर काही दिवसांनीच, वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांनी सोमवारी परराष्ट्र व्यवहारावरील संसदीय स्थायी समितीला माहिती दिली की दोन्ही देशांमधील वाटाघाटी अजूनही सुरू आहेत आणि व्यापार करबाबत अद्याप कोणताही करार झालेला नाही. सुनिल बर्थवाल यांनी काँग्रेस खासदार शशी थरूर …

Read More »