Breaking News

विधान परिषदेत अबु आझमी, कोरटकर, सोलापूरकर यांच्या वक्तव्याचा मुद्दा विरोधकांकडून उपस्थित सत्ताधाऱ्यांकडून माईक बंद करण्याचा प्रयत्न- अंबादालन दानवे यांचा आरोप

विधान परिषदेचे कामकाज सुरु झाल्यानंतर भाजपाच्या प्रविण दरेकर यांनी अबु आझमी यांनी औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे वक्तव्य केल्याचा मुद्दा उपस्थित करत अबु आझमी यांच्यावर राज्य सरकारच्यावतीने कारवाई करावी अशी मागणी केली. त्यानंतर शिवसेना उबाठाचे तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अबु आझमी यांच्या वक्तव्यासह शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी …

Read More »

अबू आझमी यांच्या त्या वक्तव्यावरून विधानसभेत गोंधळः निलंबनाच्या मागणीवर सत्ताधारी ठाम गोंधळामुळे अखेर विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सध्या सुरु आहे. आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सत्ताधारी बाकावरील आमदारांनी समाजवादी पार्टीचे आमदार अबु आझमी यांच्या औरंगजेबबद्दलच्या वक्तव्यावरून एकच गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तसेच अबू आझमी यांच्या निलंबनाची मागणीवरून भाजपा दोन्ही शिवसेनेकडून एकच गोंधळ घालण्यात येऊ लागला. त्यामुळे विधानसभा सभागृहाचे कामकाज सुरुवातीला १० मिनिटासाठी नंतर अर्ध्यातासासाठी …

Read More »

धनंजय मुंडे यांचा राजीनामा संतोष देशमुख हत्या प्रकरणी नव्हे तर वैद्यकीय… करूणा मुंडे यांच्या भाकितानुसार धनंजय मुंडे यांनी ३ च्या ऐवजी ४ तारखेला राजीनामा

मागील काही महिन्यापासून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचा हात असल्याची माहिती पुढे आली. वाल्मिक कराड यांच्या अटकेनंतर बीडमधील अनेक खून प्रकरणांना वाचा फुटली. त्यातच वाल्मिक कराड यांचे आका धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणीही होऊ लागली. परंतु धनंजय मुंडे …

Read More »

माधबी पुरी बुच प्रकरणी बीएसई आणि सेबीच्या याचिकांवर उच्च न्यायालयात सुनावणी एफआयआर नोंदविण्यास प्रतिबंद करणारा तोंडी आदेश

कॅल्स रिफायनरीज प्रकरणात एफआयआरच्या निर्णयाबाबत सेबी आणि बीएसईने केलेल्या अपिलांवर जलद सुनावणी करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने ३ मार्च रोजी संमती दिली. सीएनबीसी-टीव्ही१८ च्या वृत्तानुसार, ४ मार्च रोजी याचिकांवर सुनावणी होईपर्यंत उच्च न्यायालयाने एफआयआर नोंदवण्यास प्रतिबंध करण्याचे तोंडी निर्देश दिले. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सेबी अधिकाऱ्यांचे प्रतिनिधित्व केले, तर वरिष्ठ …

Read More »

शेअर बाजारात कोसळलाः ९४ लाख कोटी रूपये स्वाहाः बीएसई १३ हजार अंशानी घसरला तर निफ्टी ४ हजार अंकानी कोसळला

Share Market

काही महिन्यांत बरेच काही बदलू शकत होते. मात्र गेल्या वर्षी सप्टेंबरपर्यंत, भारतीय शेअर बाजार दररोज नवीन विक्रम प्रस्थापित करत होता. परंतु तेव्हापासून, सर्व प्रमुख निर्देशांक सतत घसरत होते. आज मात्र भारतीय बाजार पूर्णतः कोसळला. आणि गुंतवणूकदारांचे ९४ लाख कोटी रूपये स्वाहः झाले. या घटनेमुळे शेअर बाजारात ब्लडबाथ झाल्याचे बोलले जात …

Read More »

सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडून अपेक्षेपेक्षा जास्त लाभांश केंद्र सरकारला ५९ हजार ६३८ कोटी रूपयांचा लाभांश

केंद्राने आर्थिक वर्ष २५ मध्ये आतापर्यंत केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (CPSEs) मधील त्यांच्या वाट्यातून ५९,६३८ कोटी रुपये लाभांश गोळा केला आहे, जो अधिकृत आकडेवारीनुसार ५५,००० कोटी रुपयांच्या सुधारित लक्ष्यापेक्षा जास्त आहे. सरकारच्या एकूण DIPAM प्राप्ती आता ६८,२६३ कोटी रुपये आहेत, ज्यामध्ये निर्गुंतवणुकीतून मिळालेल्या ८,६२५ कोटी रुपयांचा समावेश आहे. जून २०२४ …

Read More »

रिलायन्स आणि राजेश एक्सपोर्टला दंडः शेअर्सच्या किंमतीत झाली घसरण बीएसई आणि एनएसईने मागितले स्पष्टीकरण

सोमवारी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) आणि राजेश एक्सपोर्ट्स लिमिटेडचे ​​शेअर्स घसरले कारण या दोन्ही कंपन्यांना “बॅटरी प्लांटमध्ये विलंब झाल्याबद्दल दंड” सहन करावा लागत आहे असे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर. बीएसई BSE आणि एनएसई NSE या शेअर्सनी रिलायन्स RIL आणि राजेश एक्सपोर्ट्सकडून याबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. ही बातमी प्रकाशित करताना दोन्ही कंपन्यांनी …

Read More »

टाटा $११ अब्ज किंमतीपर्यंतचा आयपीओ आणणार आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ टाटाचा ठरणार

टाटा समूह त्यांच्या वित्तीय सेवा शाखा, टाटा कॅपिटलसाठी $११ अब्ज पर्यंत मूल्यांकन करण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे, जे भारतातील वर्षातील सर्वात मोठे प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग अर्थात आयपीओ IPO असू शकते, असे ब्लूमबर्गने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले. कंपनीच्या बोर्डाने अलीकडेच विद्यमान भागधारकांकडून विक्रीसाठी ऑफरसह २३० दशलक्ष शेअर्सची सूचीकरण करण्यास मान्यता दिल्याने, आयपीओ IPO …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचा समय रैना आणि रणवीर अलाहबादिया प्रकरणी महत्वाचा निर्णय ओव्हर स्मार्ट म्हणत लगावली चपराक

सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी रणवीर अलाहबादिया यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना त्यांचा सहकारी युट्यूबर समय रैनाने कॅनडामध्ये त्यांच्या लाईव्ह शो दरम्यान ‘इंडियाज गॉट लेटेंट’ वादाबद्दल केलेल्या वक्तव्याची दखल घेतली. रैनाच्या युट्यूब शोमधील एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दोन्ही युट्यूबर्सवर टीका झाली होती, ज्यामुळे व्यापक निषेध आणि संताप व्यक्त झाला होता. वेगवेगळ्या …

Read More »

वृद्ध सावत्र आईला घराबाहेर काढणाऱ्या मुलाला उच्च न्यायालयाचा दणका पालकांच्या हयातीत सावत्र मुलांचाही मालमत्तेवर कायदेशीर हक्क नाही

पालकांच्या हयातीत त्यांची मुले त्यांच्या मालमत्तेवर कोणत्याही प्रकारचा मालकी हक्क सांगू शकत नाहीत किंवा ती ताब्यात घेण्याचा प्रयत्न करू शकत नाहीत. हा नियम सावत्र मुलांनादेखील लागू असल्याचे महत्वपूर्ण निरीक्षण उच न्यायालयाने नुकतेच नोंदवले आणि वयोवृद्ध सावत्र आईला घराबाहेर काढणाऱ्या सावत्र मुलाला दणाक देऊन सावत्र आईचे घर १५ दिवसांत रिकामे करण्याचे …

Read More »